देवघरात 1 तांब्या पाणी ठेवल्याने काय होते?

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, देवघर म्हणजे अशी जागा जी घरातील पावित्र्य राखण्यात मदत करते. घरात देवघराला अत्यंत महत्त्व आहे कारण ही जागा अशी आहे जिथे पूजा केल्याने आपल्या मनाला शांती प्राप्ती होते. तसेच शरीरात सकारात्मकता ऊर्जा निर्माण होत असते. ही जागा अशी असते, जिथे आपण मनमोकळेपणाने देवाशी संवाद साधतो, आपल्या चुका स्वीकारतो आणि त्याची माफी देखील मागतो. परंतू हे सर्व करताना त्याचा शत- प्रतिशत लाभ व्हावा यासाठी योग्य ठिकाणी देवघर असणे अत्यंत आवश्यक आहे.

प्रत्येकाच्या देवघरात एक पाण्याने भरलेला तांब्या आपण रोज पूजा करत असतो. हा तांब्याच्या धातूपासून बनलेला तांब्या आपल्या देवघरामध्ये ठेवायला हवा. कारण प्रत्येक देवघरात एक तांब्याचा तांब्या आणि एक तांब्याचे ताट असणे गरजेचे आहे.

कारण देवपूजा करताना हा तांब्या भरून ठेवत असतो,तसेच याच पाण्याने दुसऱ्या दिवशी आपण तांब्याच्या ताटात देवांना आंघोळ घालत असतो किंवा स्वच्छ करत असतो.

त्यामध्ये असे म्हणतात की, हा तांब्याचा धातू हा सूक्ष्म कीटकबरोबर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जेला सुद्धा नष्ट करत असतो. त्यामुळे आपल्या घरात आणि देवघरात सकारात्मक विचार आणि ऊर्जा निर्माण होत असते. या मागील महत्वाचे कारण हे तांब्याचे धातू असतात. अशा या तांब्याच्या भांड्यातील पाण्याने आपण देव स्वच्छ धुवत असतो.

त्यावेळी ते स्वच्छ तर होतातच सोबत त्यामध्ये रक सात्विक ऊर्जा, जिवंतपणा येतो. मग आपली देव पूजा करून झाल्यानंतर पुन्हा हा तांब्याच्या धातूचा तांब्या पूर्णपणे भरून देवघरात ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी याच पाण्याचा वापर आपण संपूर्ण घरामध्ये तसेच घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पाणी शिंपडायाचे आहे.

यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन, संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा पसरण्यास मदत होते. याशिवाय त्या घरांमध्ये नेहमी आनंदी आणि चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण होत असते. या घरातील लोक हे सुखी आणि समाधानी असतात. व्यवसाय किंवा उद्योगात चांगल्या प्रकारे यश मिळू लागते.

तसेच ज्या घरातील लोक शांती आणि समाधानी असतात, त्या घरावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो. यासह या घरावर धनाची, पैशाची प्राप्ती त्यांना चांगल्या प्रकारे होत असते. त्यामुळे देवपूजा करताना ह्या तांब्याच्या पाण्यानेच आपण देव धुवून पूजले तर अशा प्रकारे हा तांबे धातू आपल्या जीवनामध्ये मोठे बदल घडवू शकतो.

तसेच आपल्या घरातील सर्व प्रकारच्या दोष किंवा वास्तुदोष दूर करण्याचे काम, हा तांब्या करीत असतो. त्यामुळे देवपूजा करताना आपल्या घरात हा तांब्याचा तांब्या आणि तांब्याचे भांडे असणे आवश्यक आहे. या धातूला धर्म शास्त्रात व आरोग्य शास्त्रात खूप महत्व आहे.

अजून एक गोष्ट, आपल्या घरी असणारी गरिबी हाटवणारी अशी एक वस्तू जी तुम्ही तुमच्या देवघरात ठेऊ शकता. ज्यामुळे तुमच्या घरातील धन वाढेल. धनाचे मार्ग खुले होतील, पैसे येण्याचे मार्ग सुरू होतील व सर्व अडथळे दूर होतील. हा उपाय म्हणजे तुमच्या आयुष्यातील धनलाभ होण्यासाठी उत्तम मार्ग आहे.

त्यामुळे हा उपाय साधा, सोपा आहे जो तुम्ही सहज करू शकता मात्र याचे परिणाम तितकेच चांगले आहेत. मंगल कलश किंवा मंगल कुंभ भारतीय ज्योतिष प्रयोगांमध्ये कलशाला स्वत: चे महत्त्व आहे. त्याच्या मुखावरती भगवान विष्णू, गळ्यात भगवान शिव आणि मूळात भगवान ब्रह्मा यांचे वास्तव्य आहे.

कलशातील मांगलिक शक्ती जी पूजेचे पूर्ण फळ देते. ज्योतिष शास्त्रात असे वर्णन आहे की मंगल कलश सर्व देवी-देवतांनी वसविला आहे. घरातील पूजेत ठेवलेले कलश समृद्धीचे प्रतीक आहे. सर्व देवी-देवता त्याच्या स्थापनेमुळे खूष आहेत .

सर्वांच्या घरातील देवघरात एक तरी मंगल कलश जो पाणी भरून ठेवलेला असतो तो असतोच. तसेच याची आपल्या हिंदू धर्म शास्त्रानुसार अनेक कारणे आहेत. अनेक साऱ्या कारणांसाठी , गोष्टींसाठी याची पूजा केली जाते, स्थापना केली जाते.

आपले वास्तू दोष दूर करण्यासाठी कलशाची पूजा केली जाते. या मंगल कलश पूजनाने मनाला सुख, समाधान मिळते. घरात शांती, समृद्धी नांदते. त्यामुळे या मंगल कलशाची स्थापना व उपाय नक्की करा.

देवघरात मंगल कलश, तांब्याचा कलश पाण्याने नेहमी भरून ठेवा. असे केल्याने घरातील वास्तू दोष निघून जातात. देवघरात स्वच्छ दिवा लावा. तसेच देवघर नेहमी प्रसन्न राहील याची काळजी घ्या. घरातील नकारात्मक ऊर्जा हटवण्यासाठी गोमूत्र शिंपडा व तसेच सायंकाळी तुळशीत दिवा लावा.

मंगल कलश हे मंगल गोष्टी घडण्याचा संकेत असतो, कलशातील पाणी दररोज देवपूजा करताना बदलावे, कलश नेहमी स्वच्छ घासून घ्या. कलशात शुद्ध स्वच्छ पाणी भरून ठेवा. हा कलश देवघरातील तुम्ही समोर तुमच्या डाव्या बाजूला ठेवा.

तसेच भरलेला कलश म्हणजे तुमची कुलदेवता असते, आपल्या कुलदेवतेची रोज पूजा व्हावी म्हणून हा पर्याय शास्त्रामध्ये सांगितला आहे. तिचे प्रतिक म्हणून तिची स्थापना व पूजा करा कशी करावी याची माहिती प्रत्येकाला असावी.

आपल्या कुलदेवतेचा वार कोणता आहे ते पाहून त्या दिवशी तिची स्थापना करावी. तांब्याचा मंगल कलश घेऊन त्यामध्ये स्वच्छ जल भर व एक चांगला नारळ त्यावरती ठेवा, त्यापूर्वी काही आंब्याची पाने किंवा विड्याची पाने असतील तर शुभच मानले जाते, तसेच एक सुपारी देखील त्यात टाकावी.

कुलदेवतेचा जप करीत स्थापना करा, हार, फुले, गंध, धूप, नैवेद्य दाखवा, मंगल आरती बोला. तिचा जमेल तितका जप करा. तुमची कुलदेवता तुम्हाला प्रसन्न होऊन आशिर्वाद देईल. रोज देवपूजा करताना यातील पाणी बदला बाकी नारळ व सुपारी तशीच धुवून पुन्हा ठेवून द्या.

कधी नारळ जर खराब झाला तर तो नदीपात्रात प्रवाहित करा व दुसरा नारळ त्यावरती ठेवा. यामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी कमी होतील व जगण्यासाठी मार्ग मिळेल. कुलदेवतेचा आशीर्वाद कायम तुमच्या सोबत राहील.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!