रोज सकाळी स्वामींच्या या 2 ओळी बोला, दिवसेंदिवस चमत्कार पहाल !

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, || श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ || श्री स्वामी समर्थ, योगीराज, गुरुदेव यांची सेवा करताना मन खूप समाधान राहत, प्रसन्न होतं. सेवा करताना तारक मंत्र कोणता आहे ज्याचा नित्य जप आपण केला पाहिजे, तारक मंत्र कसा जपावा.

त्याचे आपल्या आयुष्यात काय महत्व आहे याची सर्व माहिती असणे गरजेचे आहे, कारण सेवा करत असताना चुकीचं काही व्हायला नको त्यासाठी आपण हे जाणून घेतले पाहिजे.

आपलं बळ कमी पडू नये, आपल्याला ईश्वराने नेहमीच चांगलं आरोग्य द्यावं यासाठी आपली धडपड असते, प्रार्थना करावी. तसेच आपल्या घरातील देवघरात बसून रोज न चुकता सकाळी किंवा सायंकाळी हा उपाय नक्की करा.

त्यामुळे तुमचं जीवन, आरोग्य नक्कीच चांगलं राहील. आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते, हा मंत्र जो आपल्याला तारून नेतो. आपलं संरक्षण करतो.

जो संकटात आहे, त्रासाने ग्रासलेला आहे, स्वामी त्याची दया करतात, य मंत्राचा जप तुमची मानसिकता बदलतो, तुम्हाला संकटाशी दोन हात करण्यासाठी बळ देतो. या मंत्राची महती अनेकांनी अनुभवली आहे.

अनेकजनांनी याचा चमत्कार त्यांच्या आयुष्यात पाहिलेला आहे. कधी अस्वस्थ वाटलं, उदास वाटलं तर याचा जप करा आणि बघा तुम्ही किती फ्रेश होता ते. या तारक मंत्राचा एक एक शब्द अर्थपूर्ण आहे.

मंत्राच्या पहिल्या ओळीतच स्वामींनी सांगितलंय की हे मना तू निःशंक हो, स्वामी नामाची, स्वामी बळाची प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी आहे. स्वामी स्वतः प्रारब्ध घडवतात.

स्वामी आहेत म्हणून आपण आहोत. आपल्या बाळाला काय झाल्यावर जशी आई धावून येते तसे आपले स्वामी भक्त संकटात असल्यावर त्यांच्या मदतीला धावून येतात.

एवढी कनवाळू, दयाळू स्वामी माऊली असताना घाबरण्याचा प्रश्न येतोच कुठे. “खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशील त्याविन तू स्वामी भक्त “, माऊलीवर असणारे प्रेम हे व्यक्त करावे तसेच गुरू माऊलीवर असणारा विश्वास, श्रद्धा, भक्ती, प्रेम पवित्र अंतकरणाने व्यक्त करावे.

ते तारक मंत्राच्या रूपाने त्याचा जप करून व्यक्त करावे. “आठव कितीदा दिली त्यानेच साथ , नको डगमगू स्वामी देईल हात ” स्वामी पडल्या झडलेल्या प्रामाणिक भक्तांना नेहमीच हात आणि साथ दोन्ही देतात.

हे काम आहे, तारक मंत्र जो इथे दिला आहे, तो तुम्ही रोज सायंकाळी वाचायचा,बोलायचा आहे ,

निःशंक हो, निर्भय हो, मना रे प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे , अतर्क्य अवधूत हे स्मर्तू गामी अशक्यही शक्य करतील स्वामी ।।१।।

जिथे स्वामी पाय तिथे न्युन काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय, आज्ञेविणा काळ ना नेई त्याला परलोकही ना भिती तयाला ।।२।।

उगाची भितोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा नको घाबरु तू असे बाळ त्यांचा ।।३।।

खरा होई जागा तू श्रद्धेसहित कसा होशी त्याविण तू स्वामीभक्त, कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ ।।४।।

विभूती नमन नाम ध्यानादी तिर्थ स्वमीच या पंच प्राणाभृतात, हे तिर्थ घे, आठवी रे प्रचिती न सोडेल स्वामी ज्या घेई हाती ।।५।।

रोज सकाळी अंघोळ झाली की हे एक काम नक्की करा कोणतीही मोठी गोष्ट असुद्या, कितीही , कितीही अशक्य वाटणारं काम असुदे तुम्ही ते करू शकता कारण तुमच्या मागे स्वामींचा आशीर्वाद असतो.

त्यामुळे अशक्य ते शक्य करतील स्वामी असे स्वामी समर्थ महाराजांना संबोधले आहे. या मंत्र जपाने तुमचे आयुष्य इतके चांगले होईल की सर्वजण तुम्हाला विचारतील की तू असे काय करतो की अडचणींवर मात करू शकतो.

विश्वाचा स्वामी, मालक तुमच्या पाठीशी असेल तर घाबरन्याचे कारण नाही. हा मंत्र जप करताना एका वाटीत शुद्ध पाणी घेऊन बाजूला अगरबत्ती लावून त्याची राख एका कागदावर पडेल अशी ठेवावी,

असे केल्याने त्या मंत्राचे त्या उदित सामावते व तेच मंत्र म्हणून झाल्यावर तीर्थ म्हणून घरातील सर्वांनी ग्रहण करावे. कपाळी टिळा लावावा.

स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्या पाठीशी उभे राहतात पण स्वामींना पाहण्यासाठी तशी दृष्टी सुद्धा आपल्याला हवी ! आपल्या व कुटुंबाच्या सुखासाठी हे काम नक्की करा.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!