नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, स्वामी तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेऊदेत, हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करूया.
ही वाक्ये इतकी घातक आहेत की जी व्यक्ती ही वाक्य बोलते आणि अमलात आणते तिच्या आयुष्यात बरबादी येते. तुम्हाला जर आयुष्यात मोठे यश, प्रगती करायची असेल तर या दोन वाक्यांना आपल्या डिक्शनरी मधून आजच काढून टाकावा लागेल.
दिसायलाही वाक्य खूप साधी वाटतील परंतु जेव्हा तुम्ही त्याचा खोलात जाऊन विचार कराल तेव्हा तुम्हाला समजेल की खरंच की दोन वाक्य तुमच्यासाठी किती घातक आहेत.
पहिले वाक्य म्हणजे मला हे काम करायचे आहे पण मी उद्यापासून करेल.. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट ठरवता आणि ती गोष्ट तुम्ही उद्यापासून करेल हे तुम्ही बोलता तेव्हा अप्रत्यक्षपणे तुम्ही ठरवलेलं असतं की हे काम मी कधीच करणार नाही.
बघा तुम्ही आतापर्यंत किती काम केलं आहे व किती गोष्टी ठरवल्या होत्या की मी हे काम जे आहे उद्यापासून करेल परंतु तुम्ही त्यातील किती गोष्टी करू शकला आणि किती गोष्टी तुम्ही केल्या आहेत.
त्यापैकी एखादे काम तुम्ही केले देखील असेल याचे कारण म्हणजे जेव्हा आपल्या मनाला एखादी गोष्ट करायची नसते तेव्हा आपले मन हे काम पुढे ढकलते. हा मनाचा स्वभाव असतो.
त्याला एखादी कम्फर्ट झोनच्या बाहेर दिसली की तो ती गोष्ट टाळण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मनाचा हा स्वभाव ओळखा आणि मनापासून एखादी गोष्ट करायची ठरवली असेल तर तिला लगेच सुरुवात करा.
उद्यावर ढकलून देऊ नका. तुम्ही म्हणाल की लगेच कसं शक्य आहे तर शक्य आहे. तुम्हाला एक युक्ती सांगतो, तुम्ही जे पण काम करायचे ठरवले आहे ते आजच पाच मिनिटे का होईना करा.
उदाहरणार्थ एखाद्या पुस्तक वाचायचे ठरवले असेल तर मग तुम्ही एखाद्या पान वाचून काढा तुम्हाला व्यायाम करायचा असेल तर पाच मिनिटे काढा किंवा पाच मिनिटे वॉक करून या.
5 मिनिटापेक्षा जास्त देखील तुम्ही करू शकता. तुमच्या कामाची सुरुवात होते आणि तुमच्या मनाला एक सिग्नल जातो की मी या कामाला सुरुवात केली आहे आणि पुढील काही दिवसात हे काम मला पूर्ण करायचे आहे.
हा प्रयोग तुम्ही नक्की करून बघा काही दिवसात तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. यानंतर चे दुसरे वाक्य म्हणजे मी जे काही करेल ते परफेक्ट करेन, त्याच्या नादात खूप लोक कामाला सुरुवातच करत नाहीत.
त्यांना सर्व काही परिपूर्ण हवे असते त्यांना परफेक्ट चे परिस्थिती येत नाही आणि कामाला सुरुवात करत नाही.
जगातील श्रीमंत माणूस जो अमेझॉन या कंपनीचे सुरुवात एका गैरेज पासून केली होती, बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान त्याने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही कलाकार पासून केली होती,
तर अक्षय कुमार तर बँकॉक मध्ये वेटर म्हणून काम करत होता. अशी उदाहरणे आहेत. या लोकांनी परफेक्ट ची वाट पाहिली नाही.
जिथे होते तिथून सुरुवात केली म्हणून आज ते तिथे पोहोचले आहेत त्यामुळे परिस्थिती अनुकूल होण्याची वाट पाहू नका.
जे काही तुमच्याकडे आहे त्याचा वापर करून सुरुवात करा. कुठे सुरवात करायचे आहे ते नक्की पहा पण जर आपण वाट पाहत तर वेळ निघून गेलेली असते.
ही होते ते दोन वाक्य ज्यामुळे आयुष्यात लोक यश मिळवण्यापासून अडवले जातात. तुम्ही वाक्य आत्तापासून तुमच्या डिक्शनरी मधून आजच काढुन टाका.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.