5 मिनिटांची ही प्रार्थना कराच, नशिबाचे फासे स्वामी स्वतः बदलतील…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, स्वामी तुमच्या सर्व शुभ इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवू देत हीच स्वामी चरणी प्रार्थना. काही लोकांनी विचारलं की कसा मी देवाशी कनेक्ट होऊ शकतो? कसे आम्ही त्या देवाची प्रार्थना करू शकतो? कसे आपण त्या देवा वरती भक्ती श्रद्धा करू शकतो? देवाचे प्रार्थना करण्यास घर सोडण्याची आवश्यकता आहे का?

किंवा दिवसभर बसून भजन नामस्मरण करणं महत्त्वाचं आहे का? एकदा चैतन्य महाप्रभू ना कोणीतरी विचारलं की भक्त कोणाला म्हणतात? भक्त कोण असतो? तेव्हा चैतन्य महाप्रभू म्हणाले तीन प्रकारचे भक्त असतात.

ज्याने जीवनात फक्त एक तास देवाला हाक मारली तो देखील भक्त आहे, जे देवाला रोज हाक मारतात ते देखील भक्त आहे आणि जे भक्त दिवसभरातील फक्त पाच मिनिट अगदी मनापासून देवाला हाक मारतात ते फक्त सर्वश्रेष्ठ असतात.

पूर्ण दिवस जप करू नका पूर्ण दिवस नामस्मरण करू नका , हे दोन तास नाही किंवा एकही तास नाही, फक्त आणि फक्त पाच मिनिटं जेव्हा रात्री तुम्ही झोपत असाल तेव्हा फक्त आणि फक्त पाच मिनिटं मनाने परमात्म्याला आपल्या ईश्वराला आपल्या परमेश्वराला आपल्या स्वामींना मनापासून शरण जा.

त्यांना सांगा हे ईश्वरा तुमचे खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद! सर्व काही तुम्ही माझ्या आयुष्यात दिल आहे त्यासाठी तुझे मनापासून आभार आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा फक्त आणि फक्त पाच मिनिटांसाठी पुन्हा एकदा आपल्या ईश्वराला आपल्या परमेश्वराला मनापासून धन्यवाद द्या.

त्या देवाचे आभार माना. त्या परमेश्वराला सांगा की तूम्ही पुन्हा नवीन दिवस माझ्या आयुष्यात दिला, एक मोका दिलास माझ्या जिंदगी मध्ये काहीतरी करण्यासाठी… कितीतरी चुका होतात आपल्या जीवनामध्ये भक्तांनो हे पाच मिनिटांचे प्रार्थना खूप शक्ती निर्माण करू शकते.

ही प्रार्थना करून तुमच्या मध्ये एक जिंकण्याची नवीन ताकद निर्माण होईल. आपल्या आयुष्यातील संकलन एक नवीन ऊर्जा आपल्याला या पाच मिनिटांच्या प्रार्थनेने मिळू शकते.

नारदांनी ईश्वराला विचारलं की तुमचा सर्वात मोठा भक्त कोण आहे त्यांना वाटलं पूर्ण दिवस आपण नारायण नारायण करतो तर माझ्यापेक्षा मोठा भक्त कुणी असूच शकत नाही. तेव्हा ईश्वर म्हणाले एक शेतकरी आहे तो शेतकरी पृथ्वी वरती राहतो तो माझा सर्वात मोठा भक्त आहे.

ते ऐकून नारद आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्या मनात प्रश्न पडले आणि त्याने विचार केला की आपण स्वतः जाऊन पहाव. ते त्या शेतकऱ्याचे दिनचर्या पाहतात तेव्हा तो शेतकरी सकाळी एक माळी जप करून आपल्या शेतात काम करायला निघून जात असे.

शेतातून रात्री घरी आल्यानंतर झोपण्यापूर्वी देवाच्या नावाचा पुन्हा एक माळी जप करून झोपत असे आणि पूर्ण दिवस तो कामच करत असे. परमेश्वराचं नाव तो घेत देखील नसे. शेतकरी इमानदारीने आपले जीवन जगत होता. आपल्या आईवडिलांची अगदी मनापासून तो सेवा करत होता.

आपली पत्नी यांच्याशी कर्तव्याने व्यवस्थित रित्या तो पालन करत असे. तो शेतकरी चुकूनही कुणाचं मन दुखवत देखील नसे आणि हे पाहुन नारदमुनी आश्चर्यचकीत झाले होते.

ते मनात म्हणाले की हा मोठा भक्त हा कसा काय असू शकतो आणि पुन्हा ते आपल्या देवा जवळ आले आणि देवाला सर्व काही सांगितले एक माळी जप करतो आणि पूर्ण दिवस शेतामध्ये काम करतो मग तुमचा सर्वात मोठा भक्त तो कसा काय होऊ शकतो?

तेव्हा परमेश्वर तो देव म्हणाला सकाळी जप करतो पण त्या एक माळी जपामध्ये तो जराही दुनियेचा विचार करत नाही आणि तो त्याच्या सर्व कार्यामध्ये परिपूर्ण आहे. त्याच प्रमाणे आपण स्वतः फक्त आणि फक्त पाच मिनिटे देवाला देतो.

त्याने मनापासून हाक मारली फक्त पाच मिनिटं आपल्या देवाचं नाव घेतलं तर त्या पाच मिनिटांच्या प्रार्थनेचा अर्थ पूर्ण आपल्या जीवनात राहतो फक्त लक्षात ठेवा त्या पाच मिनिटांमध्ये एक सेकंड सुध्दा तुम्ही बाहेरच्या दुनियेचा विचार करायचा नाही.

त्या दुनियेकडे आपल्याला लक्ष नाही द्यायचं ते पाच मिनिटात आपल्या परमेश्वराला अगदी मनापासून समर्पित करा. जे जीवन आहे त्याला तुम्ही नोटीस करा लक्षपूर्वक ध्यान द्या.

थोडे दिवस आपल्या जीवनातील ही पाच मिनिटं आपल्या परमेश्वराला समर्पित करा आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की आपल्या जीवनामध्ये काय काय बदल होत आहे. ती शक्ती ती ऊर्जा याचा तुम्ही स्वतःहून अनुभव घ्याल.

प्रार्थना करा धार्मिक होण गरजेचा आहे. प्राणी असू देत , मनुष्य असुद्यात त्या परमेश्वराला आपण फक्त पाच मिनिटे दिलेच पाहिजे . आपल्या मध्ये इतकी देखील ताकद नाहीये की आपण स्वतः श्वास घेऊ शकतो हे सर्व तर आपल्याला आपल्या परमेश्वराने दिलेला आहे.

हे सर्व सोय आपल्या परमेश्वराने आपल्या साठी केलेली आहे. तसेच इतके देखील ताकद नाहीये की जमिनीतून आपल्याला खाण्यासाठी आपण स्वतः धान्य निर्माण करू शकतो फक्त फक्त एक बी असतं पण त्या बियांमध्ये फळ परमेश्वराच्या शक्तीने निर्माण होतात.

भक्तांनो जर आपण इमानदारीने आपली 2 मिनिटं प्रार्थनेसाठी जीवनात दिली तर तुमच्या आयुष्यात अपेक्षा पेक्षा जास्त सुख आनंद नक्कीच मिळवाल.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!