श्री स्वामी समर्थ महाराजाना नवस कसा बोलावा? आपली सेवा सुरू कशी ठेवावी ?

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, मनातील इच्छा पूर्ण व्हावी यासाठी देवाकडे नवस बोलण्याची पद्धत पूर्वापार चालत आली आहे. नवस कसा बोलावा, कुठे बोलावा, कधी बोलावा याबाबत मात्र आपल्याला सविस्तर माहिती नसते.

नवस बोलल्यामुळे आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते अशी अनेकांची श्रद्धा असते. अनेकांच्या बाबतीत हे खरे सुद्धा झालेलं पाहायला मिळत. तर अनेकांचा मात्र यावर विश्वास नसतो.

पण नवस बोलणं हा संपूर्णपणे ज्याचा त्याचा श्रद्धेचा भाग आहे.तुम्हाला सुद्धा तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी नवस बोलायची इच्छा असेल तर तो नवस तुम्ही मंदिरात जाऊन बोलू शकता.

तसाच तो घरी सुद्धा बोलू शकता. घरी नवस बोलताना तो आपल्याच देवघरात बसून बोलायचा आहे. त्यासाठी तुम्हाला एक संपूर्ण नारळ लागेल तो सोलायचा नाही.जसा आणला असेल तसाच तो नारळ घ्यायचा.

तुम्ही स्वतः किंवा ज्यांना नवस बोलायचा आहे त्यांनी देवघरात जायचं, देवघरात बसायचं नंतर देवाला नमस्कार करायचा. देवाजवळ धूप आणि दिप लावायचा आणि जो नारळ तुम्ही आणला आहे तो तुम्ही दोन्ही हातांमध्ये धरायचा.

नंतर डोळे बंद करून तुमच्या मनातली इच्छा देवापुढे व्यक्त करायची आहे. तुमची मनोकामना व्यक्त केल्यानंतर नवस पुर्ण झाल्यावर तुम्ही काय करू शकता हे ही बोलायच आहे.

फक्त बोलताना एक गोष्ट लक्षात ठेवा की जे करणं शक्य असेल तेच बोलावे आणि ज्या गोष्टीमुळे इतर कुणालाही नुकसान होणार नाही अशीच गोष्ट बोलावे.कारण तुम्ही जे शक्य नाही ते बोललात तर नवस पूर्ण झाल्यानंतर ते पूर्ण करताना तुम्हाला अडचणी येतील

आणि तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकत म्हणूनच ते तुम्हाला करता येणे शक्य आहे तेच बोला. जस की 11 बालकांना किंवा बालिकांना बोलावून जेवायला देणं, गोर गरिबांना दान करणं,

किंवा मंदिरात दर्शनासाठी जाणं कुलदेवतेला जाण.प्रकारे जे शक्य असेल ते बोलावं आणि तो नारळ देवघरात तसाच ठेवून द्यावा.तो नारळ त्या दिवसापर्यंत ठेवायचा आहे जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही.

जेव्हा तुम्हाला असं वाटेल की तुम्ही जे काही बोलला होता तुमची जी काही इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे .

तेव्हा तो नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये, समुद्रात, तलावात विसर्जित करायचा आणि जे तुम्ही नवसासाठी कबूल केलं होतं ते लवकरात लवकर पूर्ण करायच.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *