नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. || श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ || || अनंतकोटी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय ||
महाराज आपल्या भक्तांना वेगवेगळ्या रुपात भेटत असतात, आशीर्वाद देत असतात. स्वामींची महती काय वर्णावी, त्यांचे उपदेश, त्यांची शिकवण ही अप्रतिम आहे.
स्वामींचे प्रवचन, सेवा, प्रार्थना, भजन सारं काही मनाला प्रसन्न करून सोडतं. असे आपले स्वामी आपल्या भक्तांना नेहमीच मदत करतात व आपल्या पाठीशी उभे राहतात.
स्वामींची सेवा हीच आपली ईश्वर सेवा होय. स्वामींबद्दल बऱ्याच भक्तांना बरेच चमत्कारिक अनुभव येत असतात, स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूदेत
आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात ठेऊदेत हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करूया. या माऊलीचे नाव आहे काशीबाई आणि त्यांचा मुलगा अक्षय.
या दोघांना स्वामी समर्थांनी खूप सुंदर अनुभव दिलेला आहे. दादा आपल्याला सांगतात की गेल्या 15 वर्षांपासून माझी आई स्वामी समर्थांची सेवा करत आहे आणि करत राहील.
मी 10 वीत असताना स्वामी समर्थांची सेवा करत आहे. त्यानंतर स्वामी समर्थांच्या सेवेत खंड पडला. दादांचे बारावी झाल्यानंतर त्यांनी भरतीसाठी प्रयत्न चालू केले पण दादांना त्यांच्या भरती मध्ये आठ ते नऊ वेळा अपयश आले.
ते सांगतात की माझ्या जवळचे मित्र भरती होत आहेत पण माझ काम काही होत नव्हतं. मी इतकी मेहनत करून देखील माझ्या पदरी अपयश येत होतं.
शेवटी रागाने आईला एक दिवस म्हणाले की तू हे स्वामींची सेवा करतेस इतका स्वामी स्वामी करतेस पण मला अपयश का मिळत आहे? तेव्हा त्या माउलीने त्यांना समजावलं की धीर सोडू नकोस.
स्वामींचे लक्ष सर्वत्र असते. स्वामींनी त्यांच्या आईला आणि दादांना त्यांच्या सेवेचा फळ दिले.आज दादा अभिमानाने सांगत आहेत की इंडियन एअर फोर्स मध्ये सिलेक्शन होऊन एक वर्ष झालेला आहे.
दादा आपल्याला सांगतात की स्वामी समर्थांच्या कृपेने आणि आईमुळे मला भरघोस यश मिळाले. हे कधीही विसरणार नाही. अशक्यही शक्य करतील स्वामी.
दादांच्या माऊली रोज एक अध्याय श्री स्वामी स्तोत्र आणि श्री स्वामी समर्थ सारामृत वाचत असतात.
दादा सांगतात की माझी माऊली स्वामी समर्थांचे खूप मोठी सेवेकरी आहे. स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना माऊलींच्या सर्व इच्छा सर्व स्वप्न पुर्ण कर. आणि सर्वांच्या पाठीशी रहा.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.