अंगात संचारल्यवर सर्व काही समजते का? काय होत ते जाणीव असते?

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, अनेक धार्मिक ठिकाणी, विशेषतः जी देवळे “स्वयंभू” किंवा “जागृत” स्वरूपाची मानली जातात तेथे अनेक भक्तांगणाच्या “अंगात” येण्याची प्रथा आहे. बहुदा ही गोष्ट स्त्री व्यक्तींच्या बाबतीतच घडत असते आणि तरुण युवती आणि मध्यमवर्गीय महिलांच्या बाबतीत ती दिसून येते. हे अंगात येणे म्हणजे नेमके काय असते?

अंगात येण्याचा हा प्रकार बहुदा देवाच्या, देवीच्या ऐन आरतीच्या वेळी किंवा पालखीच्या वेळी घडताना दिसतो. ज्या बाईच्या अंगात येते ती सुरुवातीला स्तब्ध होते, डोळे जडावल्यासारखे दिसायला लागतात. डोके व शरीराचा वरचा भाग हळूहळू अचानक फिरायला लागतो.

हात आपोआप वरतीखालीउचलले जातात. तोंडातून ह्युं S S ह्युं S S असा आवाज यायला लागतो. थोडयाच वेळात या सर्व हालचालींचा वेग वाढतो. त्या स्त्रीच्या सर्वांगाला दरदरून घाम फुटतो. त्यातच इतर स्त्रिया ही पुढे होऊन तिचा घाबरत घाबरत मळवट भरतात, नमस्कार करून बाजूला होतात. लहान मुले “तो” अवतार बघून अक्षरशः घाबरून जातात.

आता त्या बाईवर देवीचा चांगलाच ताबा घेतलेला असतो. घुमण्याचा आणि हुंकाराचा सूर टिपेला जातो. आता सर्व उपस्थित भक्तसमुदायाला कडक शब्दात सूचना द्यायला लागते. आपला प्रकोप का झाला तेही असंबद्ध सांगते.

पालखी झाली, आरती झाली की अंगात आलेली हळूहळू बाहेर पडायला लागते. ती बाई शुद्धीवर आली की तिला आपण काय बोले तेही आठवायला येत नाही. तिच्या अंगात काही काळ का होईना पण देवी येते म्हणून ती बाई इतरांपेक्षा उच्च दर्जाची असल्याचाच मानले जातो.

अशा बाईच्या बाबतीत अंगात येण्याच्या प्रकाराची सतत पुनरावृत्ती होताना दिसते.हा प्रकार नेमका काय आहे? याचा खुलासा पूर्णपणे शास्त्रीय पद्धतीने कसा? ही काही अज्ञात, गूढ शास्त्र यामागे लपले आहे का? अनेकजणांचे या संदर्भातले अनुभव वेगवेगळे आहेत. सर्वसामान्यपणे ज्या गोष्टींचा खुलासा होत नाही अशा गोष्टीही यात असू शकतात.

उदाहरणार्थ एका अंगात आलेल्या बाईची प्रकृती इतकी कमजोर होती की तिला धड उभेही राहता येत नव्हते. अशा बायकांच्या अंगात येते आणि त्या पुर्णपणे समजणार नाही अश्या भाषेत बोलायला लागतात, हे कसे शक्य आहे?अंगात आलेली बाई दहा-बारा लोकांना आवरत नाही हे होते कसे हा सुद्धा नेहमी आश्चर्याचा प्रश्न आहे.

त्याचप्रमाणे एखादया खांबावर सरसर चढून जाणारी “झपाटलेली” बाई हेसुद्धा लोकांच्या आश्चर्य आहेत. आणि या गोष्टींचा खुलासा कोणीही करू शकत नाही असे वाटते. आमावस्या किंवा पोर्णिमेला अंगात का येते याचे उत्तर विज्ञानाला देता येणार नाही असा त्यांचा समज असतो.

या सर्व शंका, समज-गैरसमजाचे निराकरण करून “अंगात येणे” या कृतीचा शास्त्रीय अन्वयार्थ लावता येतो हे आता निर्विवादपणे सिद्ध झाले आहे. अज्ञान आणि अंधश्रद्धा यामुळेच याला बळ मिळाले आहे. जसाजसा मानसशास्त्राचा शास्त्रशुद्ध अभ्यास वाढू लागला तसतशा या वेडगळ समजुती मागील शास्त्रीय तथ्ये उलगडू लागली आहेत.

यात पहिली लक्षात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंगात येण्याचा हा प्रकार बायकांच्या च बाबतीत घडतो. तरुण व पोक्त स्त्रियांच्या बाबतीत बहुदा हे घडते. लहान मुली, वृद्ध स्त्रियांच्या बाबतीत नव्हे. याचे कारण असे की मनाचे तणाव, चिंता व यातून बाहेर पडण्याची तीव्र पण अबोध इच्छाच त्या व्यक्तीला घेरत असते.

शिवाय स्त्रियांवर पारंपारिक मतांचा, संस्काराचा पगडा असतो. आपल्या विचारांना मोकळेपणाने बोलण्याचीही त्यांना चोरी असते. अशा सर्व कारणांमुळे अंगात येण्याचे प्रकार बायकांच्याच बाबतीत घडताना दिसतात.

अंगात येणे या प्रकारचे तसेच यातील शारीरिक व मानसिक प्रक्रियेचे विश्लेषण करत असताना असे आढळून येते की जरी “भुताने पछाडले”, असे म्हटले तरी ती एक मानसिक कमजोरी असते. यात मुख्य करून सौम्य मानसिक आजार व तीव्र मानसिक आजार असे दोन प्रकार असतात.

मेंदूतील रासायनिक द्रव्याची कमतरता किंवा जास्त वाढ यामुळे मेंदुमार्फत नियंत्रित क्रिया आणि वर्तनामध्ये बदल होतो.अंगात येणे हा एक सौम्य प्रकारचा मानसिक आजार आहे. त्याला “न्युरॉसीस” म्हणतात. या अंगात येण्याचेही दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे अंगात येण्याचे ढोंग.

हे अंगात येणे म्हणजे अंगात “आणलेले” असते. येथे अंगात येणे हा धंद्याचा भाग असतो. अशा अंगात आलेल्या व्यक्ती जी मागणी करेल पुरवली जाते, ज्या सूचना करेल त्या पाळल्या जातात व त्यातुन त्या व्यक्ती स्वार्थ सहजपणे साधते.

दुसऱ्या प्रकारचे अंगात येणे म्हणजे पारंपारिक वर्तन. विशिष्ठ वेळी, विशिष्ठ ठिकाणी अंगात येणे. पौर्णिमेच्या दिवशी, नदीकाठच्या देवळात तर काहीवेळा पशुहत्या करत असताना त्याचा हा परिणाम असतो. शिवाय आजूबाजूच्या स्त्रिया-पुरुष असे वातावरण तयार करतात की ते पाहून स्त्रीच्या अंगात “देवी” घुमायला लागते.

अनेकदा सासू किंवा तशीच एखादी प्रोढ स्त्री आपल्या तरुण सुनेच्या कपाळावर मळवट भरते, बाकीच्या बायकाही त्याचीच पुनरावृत्ती करतात आणि मग ठराविक वेळेला नेहमीच्या सवयीने त्या मुलीच्या अंगात यायला सुरुवात होते. अशावेळी या अंगात आलेल्या बाईला या वातावरणापासून बाजूला नेले, भाविकांची गर्दी हटवली किंवा सरळ त्या बाईला एक थोबाडीत मारून शुद्धीवर आणली तरी ती देवी अंगातून निघून जाते असा अनुभव आहे.

अंगात येण्याचा तिसरा प्रकार आहे भावनिक उद्दीपन आणि स्वयंसंमोहन. काहीवेळा बाह्य वातावरण किंवा कोणतीही परंपरा नसतानाही एखादी व्यक्ती स्वतः त्या भ्रमिष्टावस्थेत जाऊन व तिच्या अंगात आल्याचा प्रत्यय इतरांना येऊ शकतो. उदाहरणार्थ नवरात्रात देवीचा मंडप, हिरवागार शालू, लालभडक कुंकू, आणि दैत्यावर त्रिशूळ रोखणाऱ्या देवीच्या मुखवट्यावरिल चमकणारे डोळे,

जळणारा, धुर ओकणारा धूप, जोरजोरात म्हटल्या जाणाऱ्या आरत्या, सर्वत्र दिव्यांचा लखलखाट आणि त्यातच काही बायकांच्या अंगात येउन त्या घुमायला लागल्या की आणखी काही बायकांचे मनही त्या वातावरणाने उद्दीपित होते. त्या भारावलेल्या वातावरणामुळे हे घडते. एखादी स्त्री स्वतःच्याच मनाला संमोहित करते. तिच्या डोळे जडावत जातात, तिचे शरीर ढिले पडते. अशावेळी सर्व इंद्रियांचे उद्दीपन होते आणि हातात हात गुंफून अंबाबाईचं चांगभल हा गजर करणाऱ्या इतर बायकांसारखीच स्वतः ही बाई घुमायला सुरुवात करते.

अंगात येण्याचा चौथा आणि गंभीर प्रकार म्हणजे हिस्टेरिया किंवा भ्रमिस्टावस्था. यात मानसिक विघटन महत्वाचे असते. समजा एखादया बाईला लग्नानंतर खूप वर्षे नंतर मुल होत नाही. घरच्यांची बोलणी खावी लागतात, नवरा दारू प्यायला लागतो व मार झोड सुरु होते. चूक बाईची असेच सर्वांना वाटते.

अशावेळी बाईला आरती ऐकली, घंटानाद ऐकला की तिची शुद्ध हरपते आणि केस मोकळे सोडून ती घुमायला लागते. त्यावेळी तिला सासू, शेजारी-पाजारी, नवरा कुणीही त्रास देत नाही. काहीवेळा अंगात देवी आली की शुद्ध हरपल्यासारखी जोरजोरात ओरडते. एरवी सुतासारखी सरळ असली तरी “त्या” वेळी नवऱ्याची अक्षरशः गची धरते. मुळूमुळू रडणारी, कधीही अपशब्द न बोलणारी ही सून शिव्या द्यायला लागते!

हा तिच्या अबोध मनाने धारण केलेला प्रकट अविष्कार असतो.चारही प्रकारच्या अंगात येण्यामागील वैज्ञानिक कारणे एकदा समजली की त्यावरील उपचार करणे ही फारच सोपी गोष्ट असते. मुख्यतः ह्या सर्व प्रकारात ज्यांचे हितसंबंध असतात त्यांना या “अंगात येणाऱ्या” पासून बाजूला ठेवणे ही पहिली पायरी असते. धंदा म्हणून या प्रकाराचा वापर करणाऱ्यांना आणि मानसिक दडपणामुळे मनोविकाराचा बळी ठरणाऱ्या बायकांना एकमेकांपासून दूर ठेवणे हा महत्वाचा उपाय आहे.

अंगात देवी संचारली की त्या व्यक्तीला पूर्णपणे अपरिचित भाषा बोलता येते हा गैरसमज त्यातूनच तयार होतो. प्रत्यक्षात ती व्यक्ती कधीमधी ऐकलेल्या भाषेतलेच काही शब्द बोलत असते. कानडी, संस्कृत, गुजराथी, शब्द कानावर पडलेले असतात तेच तोंडी पडतात. ही व्यक्ती जर्मन, स्पानिश, इटालियन भाषा का बरे बोलत नाही? दुसरे म्हणजे अंगात आल्यावर इतके बळ येते तेही मानसिकतेचा भाग आहे.

परीक्षेच्या वेळी, महत्वाच्या कार्यक्रमावेळी आपण सगळी शारीरिक शक्ती एकवटतो तसाच हा प्रकार असतो हे लक्षात घेतले पाहिजे ही भ्रम झालेली व्यक्ती एका बेभान अवस्थेत झाडावर उंच चढते हे खरे. पण ज्याला प्रशिक्षणाची गरज नाही अशाच गोष्टीच ती व्यक्ती करू शकते

. त्यामुळेच अंगात आल्यावर गुळगुळीत खांबावर चढणे अशी कृत्ये तिला करता येतात. पण पोहणे, सायकल चालवणे याचे जर तिने प्रशिक्षण घेतले नसेल तर अंगात देवीचे कितीही बळ संचारले तरी ती पाण्यात पोहू शकणार नाही, किंवा सायकल चालवू शकणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे!

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!