स्वामी आपल्या भक्तांना संकटातून सोडवतात…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ,श्री स्वामी समर्थ स्वामींचे शिष्य, स्वामींचे भक्त हे स्वामींवर अपार प्रेम,भक्ती करतात, स्वामी भक्तीशी एकनिष्ठ राहणे आणि स्वामींचा सतत जप करणे हेच जर जीवनाचे उद्दिष्ट मानले तर आपण जीवनातील सर्व अडचणी सहज पार पाडू शकू, कारण स्वामी नेहमी सांगतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.

स्वामीं प्रत्यक्ष आपल्या सोबत असतात, आपल्या सर्व सुख दुःखात आपल्या सोबत राहतात, असाच एक स्वामींचा अनुभव एका स्वामीं भक्ताला आला तो ऐकून तुम्हालाही तुमचा स्वामी अनुभव आठवेल व भक्तीची ताकद, बळ व प्रचिती येईल. स्वामी जयंतीच्या दिवशी तिला दिवसाच मठात जायचं होतं.

कारण तिला आज ज्या मठात जायचं होतं तिथे संध्याकाळी खूप गर्दी असते. शिवाय संध्याकाळी गेलं की घरी जायला उशीर. म्हणून तिने ऑफिस मधून अर्धी सुट्टी काढली आणि ताईच्या घरी गेली तिथे डब्बा खाल्ला आणि मठात गेली.

तरीदेखील बऱ्यापैकी गर्दी होतीच. भक्तांची रांग हळूहळू पुढे सरकायला लागली पुढे गेल्यावर तिला समजलं की मठात जेवणाचा प्रसाद आहे म्हणून लोक उशिरा खाली येत आहेत.

काही भक्तांना त्यांच्या साधनेत तल्लीन व्हायला ,रमून जायला खूप आवडतं. अगदी तसच काहीसं तिच्या बाबतीत घडत होतं. ती देखील स्वामींशी मनसोक्त गप्पा मारायची जशी एखादी जवळची व्यक्तीच जणू,

वेळ मिळेल तेव्हा फोटोसमोर बसून पूर्ण व्यक्त व्हायची, मनसोक्त संवाद साधायची. कधी हसायचं कधी रडायचं असं सगळं स्वामींना सांगायचं. मठात आता जेवण आहे हे समजल्यावर तिची मनस्थिती द्विधा झाली, कारण तिने दुपारचं जेवण उरकून दर्शनासाठी आली होती.

मनातच ती स्वामींना म्हणाली ,”स्वामी आई… ऐक ना मी आत्ताच जेवली ग आणि तुलाही माहिती आहे की मला आता अजिबात भूक नाही. तु मला माफ कर मी काही जेवण करणार नाही. त्या बदल्यात तू मला तुझ्या जवळचा एखाद फुल दे मला खूप आनंद होईल.

माझं जेवण कोणा तरी भुकेल्या व्यक्तीला मिळू दे.” अशी बडबड मनातच ती स्वामीं सोबत करत होती.. आत गेल्यावर सेवेकरी काका सगळ्यांना म्हणत होते चला चला आधी जेवणाचा प्रसाद घ्या मग दर्शन घ्या आणि तसेच बाहेर पडा.

अरे देवा आता काय करणार ती. त्या काकांना तिने आवाज दिला, काका मला कृपया दर्शन घेऊ द्या. मी जेवू शकत नाही .”

यावर ते काका जोरात ओरडले,” प्रसाद नको? जेवण नको ?

काही लोक प्रसादासाठी वेड्यासारखी गर्दी करतात” मग काय तीला जेवायला बसावं लागलं. तिच्या शेजारी एक काकू बसल्या होत्या त्यांनी सगळा आमटी-भात पिशवीत भरला.

तिला वाटलं मलाही पिशवी मिळाली तर किती बरं होईल. तिने त्या काकुंना हळूच विचारलं की काकू तुमच्याकडे अजून एक पिशवी आहे का? तर त्यां नाही म्हणाल्या. पण तेवढ्यात एक आजी तिच्या पासून खूप दूर बसल्या होत्या.

त्यांनी लांबून आवाज दिला ये ताई हे घे तुला पिशवी पाहिजे ना? आमच्या मध्ये जवळ जवळ सहा ते सात जण बसले होते सगळे आजीकडे बघायला लागले.

तेव्हढ्यात तिने क्रॉस चेक पण केलं की आजी नक्की तिलाच पिशवी देत आहेत ना? तर त्या आजी म्हणाल्या,”हो ग तूच घे पिशवी.” पिशवी त्यांनी तिच्या कडे मध्ये बसलेल्या लोकांकडून पास केली.

पिशवी तिने नीट पाहून घेतली, कारण त्यातून प्रसाद न्यायचा होता तिला. आजीच तिच्याकडे लक्ष होतेच, अचानक तिच्याकडे पाहून आजी तिकडून ओरडून पिशवी स्वच्छ आहे ग काळजी करू नकोस म्हणाल.

पिशवीत तीला काहीतरी असल्याची जाणीव झाली म्हणून तिने पाहिलं तर त्यात एक फुल होतं. ताज ताज लाल गुलाबाच फुल होतं.

तिने त्या आजींना आवाज दिला,”आजी तुमचं फुल आहे यात हे घ्या.” असं म्हणून ती ते फूल परत करणार तेवढ्यात त्या आजी तिला म्हणाल्या,” राहू दे गं तुझ्यासाठी आहे.”

बाकीची मंडळी या दोघींकडे पाहून अचंबित झाली आणि ते लोक बिचारे विचार करत होते की काय सुरुय या दोघींमध्ये! तिला आतून भरून आलं,

मनात लक्ख प्रकाश पडला आणि क्षणात उमगलं की हे स्वामीच आहेत ! ती सारख त्या आजी कडे बघत होती. पंगत उठली की आजींना जाऊन भेटूया अस तीन ठरवलं.

पण सगळे उठल्यावर आजी काही दिसेना कुठेच. तिने सगळीकडे शोधलं पण आजी कुठेच दिसत नव्हती. असा हा तिचा स्वामी अनुभव ज्यामध्ये तिला तिचा प्रसाद आणि आशीर्वाद दोन्ही मिळाले.

एका आजींचा नातू हॉस्पिटल मध्ये गंभीर होता. पण आजी खचल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी स्वामी भक्ती सुरूच ठेवली. स्वामींना साकडे घातले व सेवा केली. नातवाची प्रकृती हळूहळू सुधारू लागली.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!