वैभवलक्ष्मी लक्ष्मी व्रत, 11 किंवा 21 शुक्रवार केल्याने कोणतीही इच्छा पूर्ण होते…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, साधारण 11 किंवा 21 शुक्रवार हे वैभवलक्ष्मी मातेचे व्रत करण्याचे ध्येय ठेवले जाते. आपल्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी हे व्रत केले जाते. शेवटच्या शुक्रवारी या व्रताचे उद्यापन केले जाते.

वैभवलक्ष्मी मातेच्या व्रताचे पुस्तक बाजारात सहज उपलब्ध होते. मराठी आणि हिंदीमध्ये हे पुस्तक मिळते.प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो. तसेच शुक्रवार हा दिवस लक्ष्मीचा दिवस मानला जातो.

शुक्रवारी माता लक्ष्मीशिवाय माता संतोषी आणि वैभव लक्ष्मीची पूजा देखील करण्यात येते. वारंवार कार्यात बाधा येणे, शिक्षणात अडथळे येणे अशा अनेक समस्यांसाठी वैभव लक्ष्मी व्रत करण्याचा सल्ला देण्यात येतो.

फक्त महिलाच नाही तर पुरुष देखील वैभवलक्ष्मीचे व्रत करू शकतात. हे व्रत आपल्या क्षमतेनुसार 11 किंवा 21 शुक्रवारी करता येते. त्यानंतर त्याची सांगता करण्यात येते.

साधारण 11 किंवा 21 शुक्रवार हे वैभवलक्ष्मी मातेचे व्रत करण्याचे ध्येय ठेवले जाते. आपल्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी हे व्रत केले जाते. शेवटच्या शुक्रवारी या व्रताचे उद्यापन केले जाते.

वैभवलक्ष्मी मातेच्या व्रताचे पुस्तक बाजारात सहज उपलब्ध होते. मराठी आणि हिंदीमध्ये हे पुस्तक मिळते. बहुतांश महिला या पुस्तकाच्या आधारे व्रत करतात. पहिल्या शुक्रवारपासून पुढील 11 किंवा 21 शुक्रवार उपवास धरून हे व्रत करतात.

दर शुक्रवार उपवास करणाऱ्यांनी एक वेळचे जेवण घेऊन सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळी विधीवत पूजा मांडून या पुस्तकातील मंत्रोच्चार आणि मातेची महती सांगणारी एखादी गोष्ट वाचावयाची असते.

ही पूजा मांडून आरती केल्यानंतरच जेवण करून उपवास सोडायचा असतो. असे निश्चित केलेले 11 किंवा 21 शुक्रवार झाल्यानंतर शेवटच्या शुक्रवारी व्रताचे उद्यापन केले जाते.

यामध्ये नेहमीप्रमाणे पूजा मांडून मंत्रोच्चार, कथा सांगितली जाते. तस 7 किंवा 11 महिला किंवा कुमारीकांना गोडाचे नैवेद्य, फळं आणि वैभवलकक्ष्मी मातेची पुस्तिका देऊन या व्रताचे उद्यापन होते.

उपवासाच्या दिवशी आपल्या प्रकृतीनुसार आहार घ्यावा. आपण उपाशीच राहिले पाहिजे अथवा फराळाचेच खायला हवे, असा अट्टाहास नसावा. या व्रतातील उपवास कसे करावे याचीही माहिती पुस्तकात दिली आहे.

साधारण 11 शुक्रवारचे व्रत हे तीन महिन्यात पूर्ण होते.चांदीची नाणी आई वैभव लक्ष्मीच्या पूजेसाठी आवश्यक असणारी एक सामग्री मानली जाते. बरेच लोक दिवसभर वैभव लक्ष्मीचा उपवास पकडतात

आणि संध्याकाळी त्यांची पूजा करून व्रत सोडतात. वैभव लक्ष्मीच्या पूजेमध्ये बरेच साहित्य गोळा केले जाते त्यात चांदीच्या नाण्याचा देखील समावेश आहे.

शुक्रवारी संध्याकाळी चांदीची नाणी पूजेमध्ये घेण्याआधी कच्च्या दुधाने धुवून घ्यावेत.शास्त्रानुसार श्रीयंत्र हे मां लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते.

शुक्रवारी वैभव लक्ष्मीच्या पूजेमध्ये या यंत्राचा समावेश करणे बंधनकारक मानले जाते. तुमच्याकडे मूळ श्रीयंत्र नसेल तर तुम्ही ते कागदावर बनवून पूजेसाठी देखील घेऊ शकता.

शुक्रवारी संध्याकाळी लक्ष्मीपूजनामध्ये श्रीयंत्रांची पूजा करावी. असे केल्याने तुम्हाला श्री प्राप्तीबरोबरच विष्णूजींचे आशीर्वाद प्राप्त होतात.आई वैभव लक्ष्मीच्या पूजेमध्ये लाल रंग खूप शुभ मानला जातो.

शुक्रवारी तुम्ही वैभव लक्ष्मीच्या पूजेस बसता तेव्हा लाल वस्त्र घालून लक्ष्मीला कमळ किंवा गुलाबाचे फूल अर्पण करा. वैभव लक्ष्मीच्या पूजेमध्ये लाल गुलाब खूप खास मानले जाते.

असा विश्वास आहे की हे फूल वैभव लक्ष्मीला खूप प्रिय आहे. तुम्हाला कमळ किंवा गुलाबाची फुले न मिळाल्यास तुम्ही लाल जास्वंदाचं फूल देखील वापरू शकता.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *