बळी देणं योग्य की अयोग्य?

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ,  आपल्या समाजात अनेक श्रद्धा आणि अंधश्रद्धा आहेत. ज्यामुळे जिवनात संभ्रम होतो. काही वेळी गोंधळ, विज्ञान की शास्त्र? काहींच्या मते बळी देणे ही श्रद्धा आहे तर काहींच्या मते अंधश्रद्धा आहे.

त्यामुळे यावरून अनेकदा वादविवाद होत असतात. हा वाद न सुटणार असला तरी देवीला दिल्या जाणाऱ्या बोकडाच्या बळीमागे अनेक आख्यायिका सांगितल्या जातात.

यात पहिली आख्यायिका अशी सांगितली जाते की, देवी ही महिषासुरमर्दिनी आहे. देवीने नवरात्रीचे नऊ दिवस महिषासुरासोबत युद्ध केलं आणि दहाव्या दिवशी त्याचा वध केला होता.

त्या महिषासुराचं प्रतीक समजून दसऱ्याच्या दिवशी देवीला बोकडाचा बळी दिला जातो. अनेक जण परंपरेनुसार दसऱ्याला बोकडाचा बळी देतात. तर दुसरी आख्यायिका लोकपरंपरेशी जुळलेली आहे.

लोकं त्यांच्या पूर्वजांनी सुरु केलेल्या बोकडाच्या बळीच्या परंपरेला श्रद्धेचा भाग मानतात. पूर्वजांनी जी परंपरा सुरु केली केलेली आहे त्यामुळे याचं पालन केलं पाहिजे.

नाही केल्यास देवीचा कोप होईल आणि कुटुंबावर काहीतरी विघ्न येईल अशी त्यांची मान्यता असते. त्यामुळे ते देवीला बोकडाचा बळी देण्याची परंपरा चालू ठेवतात.

जर देवीला रक्ताची धार देण्यात आली नाही तर घरात बिमारी सुरु होतात, लहान बाळांची तब्येत बिघडते. त्यामुळे आमच्याकडे दरवर्षी तीनदा बोकडाचा बळी देण्यात येतो.

जर कार्यक्रम रात्रीचा असेल असेल तर बोकडाचाच बळी दिला जातो आणि दिवसाचा कार्यक्रम असेल तर शेळी किंवा कोंबडा कापला जातो. परंतु बोकडाचा बळी हा महत्वाचा मानला जातो.

नेपाळमध्ये बरियारपूर जिल्ह्यात असलेल्या गढीमाई मंदिरात दर पाच वर्षांनी बळी देण्याची परंपरा आहे. यात रेड्यापासून उंदरापर्यंत अनेक प्रकारच्या प्राण्यांची बळी दिली जाते.

अनेक दिवस चालणाऱ्या या यात्रेत हजारो रेडे आणि त्याच्या दुप्पट संख्येने बोकड, कोंबडे, मेंढ्या, पोपट, उंदीर या प्राण्यांचा बळी दिला जातो.त्रिपुरा राज्यातल्या त्रिपुराश्वरी आणि चतुरदास देवता मंदिरात अनेक प्राण्यांचा बळी देण्याची परंपरा आहे.

तिथे रेडे, मेंढ्या, कबुतरासारख्या हजारो पशु पक्षांचा बळी दिला जात होता. या पशुबळीपूर्वी इसवी सन १४०७ पर्यंत वर्षभरात १००० माणसांचा बळी दिला जात होता. तसेच अलीकडे २०० वर्षांपूर्वीपर्यंत नरबळीचा परंपरा चालू होती असं सांगितलं जातं.

मानवी जीवनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात येणाऱ्या अनेक संकटांची माहिती समाजाला माहित नव्हती. या गोष्टी आकाशातील देवाच्या कोपामुळे होतात असं ते मानायचे. त्यामुळे ते देवाला प्रसन्न करण्यासाठी बळी द्यायचे.

बहुतांश वेळा नरबळी दिले जायचे मात्र हळूहळू त्याची जागा पशूबळीची सुरुवात झाली. संकट टाळावे आणि अतृप्त इच्छा पूर्ण होण्यासाठी ही बळी दिली जायचीमानव हा मिश्र आहारी प्राणी आहे,

त्यामुळे त्याने काय खावे आणि काय खाऊ नये हा त्याचा वैयक्तिक मुद्दा आहे. पण ही गोष्ट देवा-धर्माच्या नावाने करणे हे देव आणि धर्माची प्रतिमा खालावणारं आहे. त्यामुळे ते टाळावे अशी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका आहे.

यासाठीच समिती लोकप्रबोधनाचे काम करत आहेदेवीला बळी देण्यासाठी वेगवगेळ्या भागात वेगवगेळ्या प्राण्यांचा वापर केला जातो. पण महाराष्ट्रात प्रामुख्याने बोकडाचा बळी दिला जातो.

कारण देवीने महिषासुराचा वध केला ही आख्यायिका सगळ्यात जास्त प्रचलित आहे आणि बोकडाला महिषासुर मानलं जातं. असं सांगितलं जातं. त्यामुळे मांढरदेवी, काळूबाई, महाकाली या देवींना मोठ्या प्रमाणावर बोकडांचा बळी दिला जातो.

तर काही जण सांगतात की, ‘पूर्वीपासून बोकडाचा बळी देण्याची परंपरा चालत आलेली आहे त्यामुळे तीच परंपरा कायम ठेवण्यात आलीय.

यात बदल करणे योग्य नाही असं वाटतंबळी बोकडाचा असो की इतर प्राण्याचा शेवटी ती पशुबळीचं आहे. ही पशुबळी काहींच्या मते श्रद्धेचा भाग आहे तर काहींच्या मते ही अंधश्रद्धा आहे. पण यावर कायद्याने बंदी नसल्यामुळे हा सगळा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!