नेहमी पर्समध्ये ठेवा ही वस्तू, पर्स कधीही रिकामी राहणार नाही…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आजकाल फॅशन म्हणून मोबाईल व पैशांसोबत पर्समध्ये अनेक वस्तू ठेवल्या जातात ज्याचा थेट परिणाम पैशांवर होतो व सर्व पैसे संपून फक्त वस्तूच शिल्लक राहतात. पैसे टिकत नाहीत.

त्यामुळे पर्स बद्दल या गोष्टी तुम्ही नक्की जाणून घ्या व त्या करून जरून पहा. तुम्हाला योग्य परिणाम भेटतील व पर्स मध्ये पैसे भरून राहतील. काळ्या किंवा निळ्या रंगाची पर्स कधीही असू नये, यामुळे राहू आणि शनीचा वाईट प्रभाव पडतो. क्रिम कलर किंवा लाइट गुलाबी रंगाचे पॉकेट असेल तर अतिउत्तम असते.

या 5 खास वस्तू किंवा यातील 1 जरी वस्तू तुम्ही तुमच्या पाकिटात, पर्स मध्ये ठेवली तर तुम्हाला धन कधीही कमी पडणार नाही. तसेच कितीही खर्च झाले तरी तुमच्या पर्स मध्ये पैसे राहतीलच.

देवी लक्ष्मीची उत्पत्ती समुद्र मंथनावेळी झाली व कवड्या या समुद्रात मिळतात त्यामुळे कवड्यांचा वापर आपण देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी करतो. कोणत्याही 5 कवड्या घेऊन त्यात थोडे थोडे कुंकू टाकून त्या पूजन घ्या

व एका लाल कागदात बांधून तुमच्या पैशांच्या पर्स मध्ये ठेवा. असे केल्याने नेहमी भरभराट राहते, घरातील पैसे संपत नाहीत.

देवी लक्ष्मी व गणपतीचा एकत्र प्रतिमा असणारा छोटा फोटो हा पूजा करून नेहमी पर्समध्ये ठेवा. परंतु देवांचे पावित्र्य राखले जाईल याची काळजी घ्या. घरातील देवघरात दक्षिणावर्ती शंख जो सर्वात छोटा असेल असा आणून पूजा करा,

रात्रभर देवघरात ठरवा व सकाळी तो पर्समध्ये ठेवा. श्री विष्णूंना शंख अतिशय प्रिय आहे, व त्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर अखंड राहील.

एकाक्ष नारळ जितक्या छोट्या आकाराचा जमेल तितक्या छोट्या आकाराचा घाई व त्याचे पूजन करून तो आपल्या पैशांच्या पर्समध्ये ठेवा. हा एकाक्ष नारळ खूप दुर्मिळ असतो व तो फक्त भाग्यवान लोकांना भेटतो.

तो खूप ऐश्वर्य देणारा असतो. थोडा परफ्यूम आपल्या पर्समध्ये शिंपडा त्यामुळे शुक्र ग्रह मजबूत होऊन धनाचा वर्षाव होतो. तसेच छोटी अत्तरची किंवा परफ्यूम ची बाटली पर्समध्ये नेहमी ठेवा ज्यामुळे तुमच्या कुंडलीतील शुक्र मजबूत होईल.

हल्ली चोरीचे प्रमाण खूप वाढले आहे, तसेच पर्स चोरी, पर्स रिकामी करणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे हा उपाय व वस्तू तुमच्या पैशांचे व पर्सचे संरक्षण नक्की करेल.

चांदीच्या छोट्या वस्तू ज्या त्रिशुळ व तलवार अशा असतील त्या छोट्या स्वरूपात तयार करून घ्या व महादेव मंदिरात किंवा लक्ष्मी मंदिरात थोडा वेळ ठेवून त्यांची पूजा करून घरी आणून पर्समध्ये ठेवा.

तुमचे पाकीट कधीच चोरीला जाणार नाही, ही शस्त्र तुमच्या पैशांचे रक्षण करतील.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *