सलग 11 दिवस ही सेवा करा, पहा कसा हळूहळू बदल घडतो…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आपण स्वामींची भरपूर सेवा केली असेल तरीही तुमची एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही हे एक सोपे काम करा व चमत्कार पहा. लगेचच तुमची इच्छा पूर्ण होईल.

आपण बऱ्याच वेळेस आपल्या इच्छेसाठी किंवा जी गोष्ट आपल्याला हवी आहे त्यासाठी आपण सेवा करतो, भरपूर उपाय करतो आणि हे जे उपाय असतात, सेवा यातून काहींना लाभ होतो तर काहींना होत नाही, परंतु कळतच नाही की काही लोकांना त्यांच्या सेवेचं फळ मिळत नाही.

काही लोकांना लगेच लाभ मिळतो परंतू जर तुमच्या सोबत असं झालं असेल की तुम्ही भरपूर उपाय झाले, भरपूर सेवा करून झाली तरी तुमच्या इच्छा पूर्ण होत नाहीत, तरी तुम्हाला काही लाभ होत नाहीये, तरीही तुम्हाला अनुभव येत नाहीये तर तुम्ही एक सोपे काम करा.

लगेच तुमच्या सोबत चमत्कार होईल. अनुभव येतील आणि इच्छा सुद्धा तुमच्या पूर्ण होतील. यासाठी तुम्ही कोणत्याही गुरुवारी कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही हे काम सुरू करा.

फक्त गुरुवारपासूनच तुम्हाला हे काम सुरू करायचे आहे , मग ते सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस तुम्ही स्वामींसमोर बसा, देवघरासमोर बसा आणि संकल्प करा.

संकल्प करताना तुम्हाला एक ताम्हणात हातात पाणी घ्या पाणी घेतल्यानंतर त्या ताटावर आपला हात धरून ठेवा आणि त्यानंतर स्वामींसमोर तुमची जी इच्छा आहे ती बोला, स्वामींना प्रार्थना करा की माझी ईच्छा लवकरात लवकर पूर्ण करा.

आपला आशीर्वाद माझ्यावर राहुदेत. आपकी असिम कृपा माझ्यावर बरसुदेत. त्यानंतर ते पाणी ताम्हणात किंवा ताटात सोडून द्या आणि नंतर तुम्ही ते पाणी तुळशीमध्ये ओता.

परंतु संकल्प झाल्यानंतर तुम्हाला लगातार 21 दिवस ही सेवा करायचीच आहे. तुम्हाला श्री स्वामी समर्थ नामाचा जप रोज 21 दिवसांपर्यंत अकरा माळी जप करायचा आहे. अकरा पेक्षा कमी नको 11 पेक्षा जास्त नको, अकरा माळ जप तुम्हाला रोज एकवीस दिवसापर्यंत करायचा आहे

आणि संकल्प फक्त पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारी तुम्हाला सोडायचा आहे. गुरुवारपासून एकवीस दिवस लगातार स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे आणि रोज संकल्प सोडण्याची गरज नाही.

जर तुम्ही हे काम पूर्ण श्रद्धा,विश्वास,भक्ती ठेवून केलं पाहिजे, रोज एकवीस दिवसापर्यंत अकरा माळी श्रद्धेने विश्वासाने जप केला तर काही दिवसातच चमत्कार होईल आणि जो संकल्प तुम्ही केला आहे तो पूर्ण होईल.

संकल्प करताना तुम्ही इच्छा बोलली आहे ती स्वामी पूर्ण करतील परंतु ही सेवा करताना काही अडचणी येतील, तुमचे मन लागणार नाही, तुम्हाला वाटेल की आता बस झाल, आता मी नाही करत, काही अडचणी येतील, असे काही नकारात्मक घडू शकते,

सभोवताली असणारी नकारात्मक ऊर्जा हे घडू देणार नाही ,परंतु स्वामींवर आणि स्वतःवर विश्वास ठेवून खंड न पाडता करा. किंवा काही वेळेस स्वामी सुद्धा आपली परीक्षा बघतात, आपल्याला खूप थकवा येईल, झोप येईल,

अकरा माळी एकाच वेळी होणार नाही तर अशा वेळेस आपण त्यात काहीच नाही करायचं , आपण फक्त लक्ष केंद्रित करायचं. अकरा माळी रोज पूर्ण करायचाच. तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा,

पण रोज कराच,एकाच वेळी सलग 11 वेळेस करा. अगरबत्ती लावा आणि अकरा माळी जप स्वामींच्या समोर बसून करा. स्वामींच्या फोटोसमोर बसून गप्पा मारा,ध्यान करा, जप हळुवार करा,

सावकाशपणे करा परंतु अकरा माळी जप झालाच पाहिजे. एक माळ कमी सुद्धा नको एक माळ जास्त सुद्धा नको. लगातार 21 दिवसांपर्यंत करा. जर तुम्ही व्यवस्थित ही सेवा पूर्ण केली तर स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. स्वामी तुमचा जो संकल्प आहे तो पूर्ण करतील.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!