घरात संकट येण्यापूर्वी प्रत्येकाला मिळतात हे महत्वाचे संकेत, त्यावेळी काय करावे?

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आपल्या हिंदू धर्म शास्त्रानुसार काही असे संकेत जे आपल्याला सावध करतात येणाऱ्या संकटाची चाहूल सांगतात. त्यानुसार आपण येणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी तयार राहू शकतो.

आपण सावध होऊ शकतो जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही. त्यामुळे घरातील किंवा घराच्या आसपास अशा घटना घडतील तेव्हा तुम्ही नक्कीच सावध व्हा.

जर तुमच्या घराच्या परिसरात किंवा घराच्या छतावर खूप सारे कावळे काव काव करत असतील, सतत दंगा करत असतील किंवा घरातील मुख्य महिलेच्या डोक्याला स्पर्श करून एखादा कावळा गेला तर घरावर मोठं संकट येणार आहे.

त्यामुळे तुम्ही काही गोष्टी नजीकच्या काळात करणार असल्यास शक्यतो टाळा. त्यामुळे धोका नक्कीच टळेल. दुसरी गोष्ट अशी की जर घरातील काही काचेच्या वस्तू अचानक तडकत असतील,

फुटत असतील तर तुम्ही सावध राहायला हवे. पुढील संकेत आहे, तुम्ही एखादं महत्वाचे काम आटोपून घरी परत येता तेंव्हा तुम्ही घरात आल्याबरोबर जर मुख्य दरवाजात पालीचे दर्शन झाले तर तुम्हाला चिंतेची बाब ठरेल.

तो संकेत म्हणजे तुम्ही केलेल्या कामात खूप अडथळे येणार असून संकटांची मालिका सुरू होते. अशा वेळी काय करायचे सुचत नाही आणि सर्वकाही मनाविरुद्ध घडत असते.

पण हा संकेत समजून घेऊन शक्य तितके नुकसान होण्यापासून स्वतःला वाचवा. यानंतर सर्वात मोठा संकेत म्हणजे जर तुम्ही नवीन वास्तू खरेदी केली असेल व त्यामध्ये राहायला येत असल्यास किंवा नवीन वास्तू बांधून प्रवेश करत असाल तेव्हा जर तुमच्या घरी एखादी मृत पाल आढळली तर समजून जा की काहीतरी अशुभ,

विपरीत लवकरच घडणार आहे आणि त्यासाठी तुम्ही होम हवन, पूजा पाट लवकर करून घेऊ शकता. त्यामुळे तुमचं आलेलं संकट हरेल व त्यातून तुमची सुटका होईल.

यावरचा हा उपाय त्वरित करून घेतल्यास नक्कीच विपदा टळू शकते. तसेच पालीला लक्ष्मी मानले जाते परंतु हीच पाल जर तुमच्या डोक्यावर पडली तर मात्र ही चिंतेची बाब असते. खूप मोठं संकट येणार असते.

यानंतर पुढील संकेत म्हणजे डोळ्याची पापणी फडफडणे. स्त्रीयांची डावी पापणी फडफडणे शुभ मानले जाते, याउलट उजवी पापणी फडफडणे अशुभ असते.

परंतु पुरुषांची जर उजवी पापणी फडफडली तर मात्र शुभ असते. घरावर संकटाची चाहूल असेल तर अंगणातील तुळस सुखते, तुळशी माता आपल्याला सावध करत असते.

त्यामुळे या संकेताकडे अजिबात दुर्लक्षच करू नका. तसेच जर घरातील लहान मूल अचानक झाडू घेऊन झाडत असेल, तर हा अशुभ संकेत आहे.

रात्री चुकूनही झाडू मारू नका, घरात अलक्ष्मी, गरीबी येते. तसेच झाडू कधीच उभा करून ठेवू नका व इतरांना नजरेला पडेल असे ठेवू नका कारण त्यामुळे घरातील धनहानी होते.

पैसे वायफळ खर्च होतो. तसेच घरातील एखादी व्यक्ती महत्वाच्या कामासाठी गेली असल्यास तिच्या पाठोपाठ लगेच झाडलोट करणे अडथळा निर्माण करते.

अशा प्रकारे हे संकेत नेहमी लक्षात ठेवा. पण संकट टळू देखील शकते कर आपण विशिष्ट गोष्टींची काळजी घेतली तर.

आपण घरी नेहमी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा. भगवान रामरक्षा स्तोत्र बोलावे. हनुमान चालीसा वाचावी.

शक्य असल्यास रोज 5 ओळी पारायण सुरु ठेवावे. ज्यांना बाळू मामांची भीती करायला जमते त्यांनी बाळूमामा ना शरण जावे.

आपण आपल्या आवडत्या देवतेला पूर्ण शरण जावे. त्या देवतेची मनापासून शुद्ध भावाने प्रार्थना करावी.

तसेच घरी रोज देवपूजा, धूप,आरती,सायंकाळी तुळशीत दिवा, सकाळी सडा करणे या गोष्टी करा. महामृत्युंजय मंत्र बोलावा जो आपली वाईट शक्ती पासून रक्षा करतो.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!