स्वामी आपल्या भक्ताला असे संकेत देतात…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, स्वामींची सेवा मनापासून केली की फळ हे मिळतेच. इतकंच नव्हे तर स्वामी लीला घडते. अनेक चमत्कार घडतात. स्वामींची सेवा जर तुम्ही विना अपेक्षा केली, पूर्ण श्रद्धेने केली तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्की लाभेल.

श्री स्वामी समर्थाची पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभुतांवर सत्ता होती. श्री समर्थ हे जगद्गुरू जा त-पात-ध र्म या सर्वाच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाज उद्धाराचे अजोड काम केले.

स्वामीभक्त असणाऱ्या व्यक्तींना, सेवेकरिंना त्यांच्या भक्तीच्या फळाची खुपदा अनुभूती येते. त्यांच्या सं-कटाच्या काळात स्वामी त्यांना मदत करतातच.

काही जणांचे अनुभव ऐकून अंगावर शहारे येतील, की स्वामी भक्ती इतकी श्रेष्ठ की साक्षात स्वामींनी त्यांना वाचवलं, अगदी मृत्यच्या दारातून.

असे भक्त खूप प्रामाणिकपणे भक्ती करतात व त्याचे योग्य फळ देव त्यांना देतच असतो. अशाच एका स्वामी भक्ताला आलेला अनुभव वाचून तुम्हालाही छान वाटेल, कारण प्रत्यक्ष प्रचिती या स्वामीभक्ताला आली आहे.

जी मागे पुढे तुम्हा आम्हाला येऊ शकते कारण जर आपण श्रद्धेने, मनापासून जर भक्ती केली तर ईश्वर नक्कीच प्रसन्न होतो व साथ देतो.ही गोष्ट आहे सातारा येथील एका मनुष्याची.

त्यांचं नाव अमित भोसले असून ते सातारचे रहिवाशी आहेत. त्यांनी त्यांना स्वामींचा आलेला अनुभव सांगितला आहे.

त्यांचं घर ते त्यांचं कामाचं ठिकाण यामध्ये सुमारे 55 किमी अंतर आहे, रोजच ते प्रवास करतात. हे दादा असेच एके दिवशी ऑफिस वरून घरी येताना त्यांनी उशीर झाला म्हणून सायंकाळी 6 वाजता घा ई केली.

थंडीच्या दिवसांमध्ये अंधार लवकर पडतो. त्यांना दररोज खंबाटकी घाटातून यावे लागते. खंबाटकी घाट जसा उतरला तशी त्यांना अचानक खिशातील मोबाईल ची रिंग ऐकू आली.

त्यासाठी त्यांनी बाईक थांबवली व कडेला घेतली, हे सारं एका क्षणात घडलं त्याच सोबत त्यावेळी मागून भरधाव वेगाने ट्रक आला.त्यांच्यापासून साधारण 10 फूट अंतरावरून तो ट्रक पुढे 35 ते 40 फूट घसरत गेला.

हे सारं क्षणिक पण खरं खुर दृश्य त्या दादांच्या डोळ्यासमोर घडलं, दादांनी विचार केला की जर त्यांनी बाईक थांबवली नसती तर त्या अपघातात नाहकरित्या त्यांनाही सामोरं जावं लागलं असतं.

ज्यामुळे तिथे अक्षरशः काहीही घडू शकलं असतं. जेव्हा सर्वजण तिथे अपघात झाल्यावर एकत्र आले तेव्हा समजले की ट्रक चे ब्रेक फेल होते, सुदैवाने या दादांचा जीव वाचला होता.

दादा स्वामी भक्त आहेत. या साऱ्या गडबडीत ते कोणाचा फोन आला ते पाहायचं विसरून गेले,जेव्हा त्यांनी पाहिले तेव्हा त्यांना ध क्का बसला. त्यांना कोणाचाही फोन आला नव्हता.

गेल्या अडीच वर्षात त्यांनी कडेला अशी गाडी कधीच थांबवली नव्हती, यामागे माझ्या स्वामींची प्रेरणा व आशीर्वाद आहेत असे दादा सांगतात,तीथे थांबण्याची बुद्धी, तो विचार जर माझ्या मनात आला नसता तर काय झाले असते काय ठाऊक.

विलक्षण आणि पवित्र स्वामी भक्तीचा अनुभव. रोज एक ताई स्वामी केंद्रात सेवेसाठी जायच्या. सेवेला जाताना घरातील सर्व काम आवरून जायच्या. त्या दिवशी गडबडीत कमी बांगड्या घालून गेल्या.

सेवा अगदी मनापासून करायच्या त्या. त्या दिवशी त्यांचं हाताकडे तितकं लक्ष नव्हते. सेवा पारायण प्रसाद आरती झाली.

जेंव्हा हाताकडे पाहिलं तेंव्हा एक वेगळी बांगडी हातात होती जी तुम्ही फोटोत पहिली असेल. हा तर स्वामींचा खूपच मोठा चमत्कार झाला.

भक्ती मध्ये तल्लीन झालं की स्वामी दर्शन देऊन जातात. आपल्याला ते ओळखता यायला हवं इतकंच.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!