नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ . || श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ || || अनंतकोटी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय || महाराज आपल्या भक्तांना वेगवेगळ्या रुपात भेटत असतात, आशीर्वाद देत असतात.
स्वामींची महती काय वर्णावी, त्यांचे उपदेश, त्यांची शिकवण ही अप्रतिम आहे. स्वामींचे प्रवचन, सेवा, प्रार्थना, भजन सारं काही मनाला प्रसन्न करून सोडतं. असे आपले स्वामी आपल्या भक्तांना नेहमीच मदत करतात व आपल्या पाठीशी उभे राहतात.
स्वामींची सेवा हीच आपली ईश्वर सेवा होय. स्वामींबद्दल बऱ्याच भक्तांना बरेच चमत्कारिक अनुभव येत असतात, तसेच असे अनुभव अभूतपूर्व असतात. असाच एक अनुभव म्हणजे बुलढाणा येथील एका ताईंचा आहे. या ताईंचं नाव नेहा जास्कर आहे.
11 मे 2021 या दिवशी त्यांना हा अभूतपूर्व असा स्वामींचा अनुभव आला. त्यांच्या घरी त्या स्वतः, त्यांची आई व त्यांचा मोती नावाचा श्वान राहतो. रोज अगदी दंगा करणारा मोती मात्र प्रत्येक संध्याकाळी अगदी शांत बसून पूजा पाहत असतो.
तो त्यांच्या घरातील एक सदस्या प्रमाणेच आहे. आम्ही पूजा, जप आवरून बसलो होतो, मोतीची गंम्मत करायची म्हणून नेहा व आई खोटं भांडण करत होत्या, नेहाची आई तिला मोतीसमोर तिला मारहाण करत होती, त्यांना अस वाटलं की मोती त्यांच्या भांडणात मध्ये पडेल व नेहाला वाचवेल,
पण झालं काही वेगळंच. मोती अगदी घाबरून पहिले जागेवरच बसला व नंतर तो पळू लागला. तेव्हा त्यांनी गंमत बाजूला सारून मोतीला जवळ घेतले व त्याचे लाड केले, पण अजूनही ती थोडा घाबरलेला होता. मोतीला त्या दोघीजणी देवाचंच रूप मानत असत.
त्यामुळे त्याची काळजी घेत असत. नंतर त्या दोघीजणी पोळी बनवायला गेल्या, नंतर नेहाने गुरुचरित्र वाचन केले तेव्हाच मोतीने स्वामींना प्रसादासाठी ठेवलेली साखर खाल्ली. तेव्हा त्याच्या धक्क्याने स्वामींच्या समोर लावलेला दिवा विझला, नेहाला थोडं वाईट वाटलं,
नेहाने स्वामींची क्षमा मागितली व तिला असे वाटले की स्वामी तिच्यावर रागावले आहेत. त्यानंतर आणखीन एक वेळ क्षमा मागत नेहाने स्वामींना प्रार्थना केली व म्हणाली स्वामी मला क्षमा करा, मक इथून पुढे मुक्या प्राण्यांना त्रास होईल असे वागणार नाही.
आपण मला क्षमा केल असे मी समजेन जर तुम्ही रोजच्या प्रमाणे माझा नैवेद्य ग्रहण केला तर. नेहाची, तिच्या आईची स्वामींवर खूप श्रद्धा आहे. नंतर नेहा बेडरूम मध्ये गेली व तिची आई हॉल मध्ये मोती सोबत खेळत होती.
जेव्हा नेहा किचन मध्ये गेली व देव्हाऱ्या जवळ गेली तेव्हा थक्क झाली कारण तिच्या देवघरातील स्वामींना नैवेद्य म्हणून ठेवलेलं दूध संपलं होतं. तिची हाक स्वामींनी ऐकली होती. जरी मोतीने ते दूध प्यायलं असेल तरीही ती स्वामींनी त्याला बुद्धी दिली असंच वाटलं, पण देवघरातील सामान थोडही हलले नव्हते.
दिवा सुद्धा लागलेला होता व तसेच मोतीची त्यावेळी बाहेर होता. स्वामींना नेहाने खूप धन्यवाद दिले, त्यांना परत प्रार्थना केली व स्वामींच्या चरणी परत लोटांगण घातले. नरह रोज स्वामींशी संवाद साधायची, तिच्या मनातील अनेक प्रश्नांना स्वामींनी काही न काही मार्गाने उत्तर दिलेच होते.
तिला प्रत्येक गोष्टीत, अडचणीत स्वामींनी मदत केली होती. अजूनही करत आहेत. म्हणून हा एक चमत्कार जो स्वामी भक्ताला झाला. स्वामी समर्थ महाराज सांगतात की आपण झोपण्यापूर्वी ही कामे करायला हवीत. रात्री जेवण झाले की आपण मोबाईल घेऊन बसतो व तसेच झोपी जातो.
त्यामुळे जीवनातील ताण तणाव आणखीनच वाढतो. आपल्या जीवनातील समस्या या अपूर्ण व अशांत झोपेमुळे सुद्धा असतात कारण आपलं शरीर जे थकते त्याला पूर्ण आराम न मिळाल्याने ते अशक्त बनते, कमजोर बनते व त्यामुळे आपला स्टॅमिना कमी होतो.
म्हणून स्वामींनी आपल्या शिष्यांना जो उपदेश केला आहे तो जाणून घेणं फार महत्वाचे आहे. स्वामी सांगतात की आपण रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करावा, जेवण झाल्यानंतर हात पाय स्वछ धुवून देवघरात देवासमोर थोडा वेळ शांत बसावे, दिवस भरातील सर्व गोष्टींचे चिंतन करावे,
आपण कोणत्या चुका केल्या, कोणत्या प्रकारचे पाप केले तर नाही ना, तसेच कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या यबाबत स्वामींसामोर कबुली द्यावी, तसेच तुमच्या अडचणी दूर व्हाव्यात, अडलेली कामे मार्गी लागावीत यासाठी देखील प्रार्थना करा.
तसेच जितका जमेल तितका स्वामी नामाचा जप ,तारक मंत्र जप करावा. तुमचे मन अगदी शांत होईल, सर्व गोष्टी सकारात्मक दिसू लागतील, तुमची कार्यक्षमता वाढेल व तुमच्या जीवनात आनंद येईल.
त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा. तसेच रात्र शांत व भयमुक्त राहूदे व उद्या येणारा दिवस चांगला जाऊदे अशी प्रार्थना करा. अशा प्रकारे आपण स्वामी नामाचा जप करावा, त्यामुळे आपले विचार शुद्ध होतात,
आपल्या विचारांना गती मिळते, घरातील बऱ्याच गोष्टींना सकारात्मक प्रभाव मिळतो. आपल्या चुकांना सुधारण्याची शक्ती मिळते, आपलं आयुष्य हे अतिशय छान बनते व आपले जीवनातील अनेक प्रॉब्लेम नक्कीच सुटण्यासाठी मदत होईल.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.