नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ’ हे महाराजांचे नाव नाही, तर ब्रम्हाण्डगस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे. ॐ नमः शिवाय, दूं दूर्गायै नमः, श्री गुरुदेव दत्त हे ज्याप्रकारे षडाक्षरी तारक मंत्र आहेत.
त्याचप्रमाणे समानार्थी ‘श्री स्वामी समर्थ’ हा सुद्धा सद्गुरु अनुग्रहीत तारक मंत्र आहे. श्री – स्वयं श्रीपादविराजीत सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज. स्वामी – स्वाः म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा आहे.
मी म्हणजे माझे अज्ञान, अहंभाव, षडरिपु व ईर्ष्या! अर्थात स्वामी म्हणजे माझा मी पणा स्वाः करा. समर्थ – समर्थ म्हणजे संसाररुपी भवसागर सहज तारुण येण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा.
त्यायोगे ‘श्री स्वामी समर्थ’ म्हणजे श्रीपादविराजित भगवान दत्तात्रेय, माझे मीपण भस्म करून स्वयंभू शिव तत्त्व सद्गुरुकृपे अंकित करा. “जय श्री स्वामी समर्थ ” स्वामींची सेवा म्हणजे आपलं अहोभाग्य च म्हणावं लागेल.
त्यासाठी आपण नेहमीच उत्साह दाखवायला हवा. आपल्या जीवनातील घडामोडी या स्वामींच्या मर्जीनेच घडत असतात. त्यासाठी आपण नक्कीच प्रयत्नशील राहायला हवे.
आपल्या जीवनातील आनंद, सुख, समाधान मिळवण्यासाठी आपल्याला स्वामी तेंव्हाच आशीर्वाद देतील जेंव्हा तुम्ही स्वामींची सेवा अगदी मनापासून, पूर्ण श्रद्धेने, भक्तीने कराल.
कारण स्वामींनी असं सांगितलं आहेच की” भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे”.
प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या समस्या असतात, कोणाला लग्नाच्या, कोणाला नोकरीच्या, कोणाला आजाराच्या तर कोणाला घराच्या आर्थिक परिस्थितीच्या.
या सर्व समस्या आपण जर मन मोकळं करून स्वामींना बोललो तर आपण नक्कीच यशस्वी होऊ.
त्यामुळे घरातील या समस्या, दूर करण्यासाठी आपण स्वामींची अखंडपणे एक महिना 30 दिवस सेवा करावी.
त्यामुळे तुमच्या जीवनातील बदल पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल आणि खरंच स्वामींचा चमत्कार नक्की अनुभवायला मिळेल.
सेवा करताना रोज संध्याकाळी आपण सुरुवातीला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचे आहे. त्यानंतर अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे.आणि यानंतर लगेच आपणाला तारक मंत्र म्हणायचा आहे किंवा ऐकायचा आहे.
तारक मंत्र आपणाला कुठेही प्राप्त होऊ शकतो तो तुम्ही डाऊनलोड करू शकता किंवा ऐकण्यासाठी देखील डाऊनलोड करू शकता.
ही सेवा मनापासून करा श्रद्धेने करा तुम्हाला नक्कीच निश्चितच यश प्राप्त होईल.
आजपर्यंत अनेकांनी हा उपाय केला आहे त्यांना निश्चितच यश प्राप्त झाले आहे आणि अनेक जण आता ही सेवा करत आहेत. त्यांचे हे कार्य यशस्वीरीत्या मार्गी लागत आहे.
स्वामी अक्कलकोटीचे म्हणजे बुद्धिगम्य आहेत. ते स्वतःच म्हणाले, अकलसे खुदा पहचानो. निष्क्रिय व जुजबी वागणाऱ्याला आणि चिंतन न करणाऱ्याला स्वामींच्या कृपेचा व शक्तीचा बोध होणार नाही.
स्वामी अद्भुत आहेत. निर्बुद्ध व चंचल असणाऱ्याला स्वामींचे ‘स्व’रूप व त्यांची विलक्षण कृपासत्ता आणि त्यांचे विलक्षण व्यवहार कळणार नाहीत व अनुभवास येणार नाहीत.
स्वामी एकमेव चिरंतन सत्य आहेत. बाकी मायाभ्रम आहे. ते सर्वशक्तीमान असे सर्व विश्वाचे मालक आहेत. स्वामींना समजले तर जीवन समजले व आपल्या इच्छा पूर्ण झाल्या असं समजायचं. तारक मंत्राचे महत्व खूप आहे.
या ताईंनी खूप सोसले. मुलाचा अपघात झाला. त्यामुळे मी खचून गेले. काय करावं कळेना. पण स्वामी निष्ठा खूप असल्याने स्वामींनी बळ दिलं.
हार न मानता त्याला पाणी थोड थोड देऊ लागले. ते पाणी अभिमंत्रित केल.
म्हणजे तारक मंत्र स्वामींच्या फोटो समोर बसून एक ग्लास पाणी घेऊन त्यावर हात ठेऊन पूर्ण शुद्ध मनाने प्रार्थना व जप केला. त्यामुळे खूप लाभ झाला.
हळूहळू माझा मुलगा रेकोवर झाला आणि थोड्या दिवसांनी डिस्चार्ज दिला. ही सर्व स्वामी कृपा. दुसरे काही नाही.
मी माझा मुलगा गमावला नाही आणि स्वामींच्या चरणी असणारी निष्ठा आणखीनच दृढ झाली. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.