नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ … स्वामीं समर्थ महाराजांना त्रिवार वंदन. समर्थ अक्कलकोटचे एक अवतारी पुरुष होऊन गेले , तसेच स्वामींना दिगंबर दत्ताचा अवतार देखील मानतात. पद्मासनात बसलेली एक प्रसन्न व्यक्ती, हाती एक मणी, चेहऱ्यावर युगायुगांच्या खुणा, असीम तेज असे ते स्वामींचे रूप पाहून भक्त प्रसन्न राहतात. स्वामींची अनेक रुपं आपल्याला पाहायला मिळतात.
माऊलीच्या रुपात देखील स्वामी शांत व आपल्याला आधार देणारे वाटतात. परंतु त्यांचे रूप ने मूळ स्वरूपात आहे ते म्हणजे पद्मासनात चैतन्यमूर्ती व शरीरावर तेजस्वी वलये, साधनेचे अमोघ तेज पाहायला मिळते.
स्वामींच्या प्रतिमेसोबत एक वाक्य कायम असते जे आपले भय, चिंता दूर करते ते म्हणजे “भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे”.
संकटांचा काळ हा आपली कठीण परीक्षा घेत असतो त्यावेळी भिऊ नकोस पुढे चाल अस म्हणणारं कोणीतरी लागत , आपल्याला त्यावेळी आधाराची खूप गरज असते. स्वामीजी भक्तांना सांगतात की तू थांबू नकोस पुढे चालत रहा, प्रयत्न सोडू नकोस, निराश होऊ नकोस कारण मी तुझ्या पाठिशी आहे,
तू पडलास तर तुला हात देईन, तू प्रयत्न करशील तर यश देईन पण जर तुला काहीच न करता फळ हवे असेल तर तसे होणार नाही. तसेच स्वामी समर्थ हे खरंच भक्तांना आधार देतात, त्यांना परिस्थितीवर मात करण्यासाठी बळ देतात, त्यांना समर्थ करतात म्हणून ते स्वामी समर्थ आहेत.
स्वामी तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण करू देत ,नेहमी तुम्हाला आनंदात सुखात ठेवू देत हीच स्वामी चरणी विनम्र प्रार्थना. स्वामी भक्तांनो आपण सहज बोलून जातो की आपली काळजी आहे देवाला, परंतु आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर आपल्याला दिव्यत्वाची प्रचिती येते. आपण त्याकडे सहजतेने पाहत नाही.
याबाबतचा एक दृष्टांत तुम्हाला सांगावा वाटतो. विष्णुसहस्त्रनाम पारायण सुरु होते. अनेक लोक नित्य पारायणाला येत असत आणि भंडाऱ्याचा प्रसाद घेऊन जात असत. अशा एका दिवशी एक व्यक्ती प्रसाद मिळवण्यासाठी धडपड करु लागली.
सेवेकर्यांनी तिला रांगेने ये असे सांगितले परंतु ती व्यक्ती अरेरावी करू लागली आणि त्याचे पर्यावसन वाद विवादात निर्माण झाले. त्या व्यक्तीला मठाधिपती यांच्याकडे घेऊन आले. स्वामींनी त्या व्यक्तीला अभय दिले आणि त्यांच्या गैरवर्तणूक याबद्दल विचारणा केली.
स्वामींना शरण येऊन ती व्यक्ती म्हणाली माझ्या घरात सहा लहान लहान मुले आहेत. ती उपाशी आहेत. त्यांना या प्रसादाची जास्त गरज आहे. स्वामी म्हणाले अरे पण प्रसाद तर सर्वांनाच मिळणार होता ना ? काय सांगाव भलीमोठी रांग संपेपर्यंत प्रसादही संपला असता तर ?
अशी ती व्यक्ती म्हणाली. मी आणि माझी मुले उपाशी राहिलो असतो म्हणून मी घुसखोरी केली. मला प्रसाद हवाय. स्वामींनी सेवकांना सांगून व्यक्तीसाठी प्रसाद बांधून दिला. प्रसाद सोपवताना स्वामीजीं म्हणाले, विष्णुसहस्त्रनाम म्हणायला येत होतास ना ?
थोडेसे मलाही बोलून दाखवशील का ? तोंडघशी पडणार या भीतीने त्या व्यक्तीने स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. अर्धा स्तोत्र म्हणून ती व्यक्ती थांबली कारण पुढच्या स्तोत्र त्यांना पाठ नव्हते. त्या लोकांच्या शेवटच्या शब्दाचा आधार घेत स्वामीजी म्हणाले तुला एक हजार नावांपैकी सहाच नावे पाठ आहेत.
या सहाव्या नावावर लक्ष केंद्रित कर. भूतबल म्हणजे अशी व्यक्ती जे अखिल विश्वाचा सांभाळ करते. पोषण करते. तुला जर हा अर्थ उमगला तर तू अशी कृती केली नसती आणि परमेश्वरावर भार टाकला असता म्हणून प्रत्येक नामाचे महत्त्व समजून घेणे आणि संपूर्ण विष्णुसहस्त्रनाम पाठ करून दररोज भगवंताचे नामस्मरण कर ,
इतके समजून घेऊन स्वामींचा आशीर्वाद घेवून प्रसाद घेऊन निघून गेली. स्वामीजींच्या सांगण्याप्रमाणे भक्तिभावाने विष्णुसहस्त्रनाम पठण करू लागली. सामूहिक पठण आणि प्रसादाचे वाटप सुरू होते. मात्र काही दिवसात एक अजबच घटना घडू लागली. भंडारा वाटून संपेपर्यंत भगवान कृष्णा समोर ठेवलेला नैवेद्य गायब होऊ लागला.
सेवकांनी ही बाब स्वामीजींच्या कानावर घातली. स्वामींना अचानक त्या दीन व्यक्तीची आठवण आली आणि विचारपूस केल्यावर त्या व्यक्तीचे येणे बंद झाले असे कळले.
सेवेकऱ्यांना त्या व्यक्तीवर संशय आला. स्वामीजींनी त्या व्यक्तीची भेट घ्यायची असे ठरवले. ती व्यक्ती नदीच्या पलीकडे असलेल्या गावात राहत होते.
स्वामीजी येताच ती नम्रपणे आणि नतमस्तक झाले, विचारले आणि मठात न येण्याचे कारण विचारले. स्तोत्र पठण करतो असे ते म्हणाले.
पालन पोषणाच काय असे विचारले असता ती व्यक्ती म्हणाली स्वामी विष्णुसहस्रनाम याचे पठण सुरू केल्यापासून एक तरुण रोज प्रसाद पात्र घेऊन येतो
आणि तो आपला सेवक आहे असे सांगतो. आपण एवढे कृपादृष्टी ठेवली तर मी धन्य झालो. यावर स्वामीजी म्हणाले की मी कोणीही सेवक पाठवला नाही.
स्वयम् परमात्मा तुमची काळजी करण्यासाठी सेवक रूपाने तुझ्या द्वारी आला. हे तुझ्या श्रद्धेचे आणि भकयीचे फळ आहे.
भगवंतावर अशी श्रद्धा कायम ठेव कारण तो या जगाचा पालन करत आहे. लहान मुलं निरागस असतात ते भगवंतांना लगेच एकरूप होतात.
एका ताईंना हा अनुभव आला. पती बाहेरगावी कामा निमित्त गेला असता घरी भीती वाटत होती पण मुलगी धीट होती.
आईसोबत जप करीत होती. तिला समोर एक प्रतिकृती दिसली. त्यामुळे जिवनात स्वामी दर्शन होतेच. फक्त भक्ती पूर्ण शुद्ध भावाने करायला हवी.
श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो आजच्या दृष्टांत यावरून एक गोष्ट सांगावीशी वाटते आपण आपल्या भगवंतावर ठाम विश्वास ठेवला की भगवंत आपल्याला कोणत्याही संकटात धावून येतात .
तुम्हाला दृष्टांत नक्कीच आवडला असेल, तुमचाही दृष्टांत नक्की शेअर करा.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.