सेवा करताना अनेक अडचणी येतात तेंव्हा काय करायचं? सुंदर स्वामी संदेश…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, अशक्य-ही-शक्य-करतील-स्वामी, श्री स्वामी समर्थ, काही गोष्टींचे काटेकोरपणे पालन करावे लागते. त्या गोष्टी तुम्ही जाणून घ्या ज्यामुळे तुमच्या सेवेत चुका होऊ नयेत. अनंतकोटी ब्रम्हांडनायक योगीराज अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांचा जयघोष ज्या घरी असतो तिथे स्वामींचा वास असतो.

श्री स्वामी समर्थ महाराज यांचा सेवेकरी असणे म्हणजे आपलं सद्भाग्यचं म्हणावं लागेल. अपंगांना, वृद्धांना, संकटात सापडणाऱ्यांना मदत करणे हाच सेवेकाऱ्याचा धर्म असतो, ही सेवा स्वामीच आपल्याकडून करून घेतात, निस्वार्थी पणे प्रत्येक सेवेकरी ती करत असतो.

इतरांना केलेली मदत ही स्तुतिप्रिय जरी असली तर सेवेकऱ्याला त्याच मोल नसते कारण तो सर्व कामे स्वामींना अर्पित करतो व त्यामुळे तो अहंकारी नसतो व मोठेपणा घेण्यासाठी हावरट देखील नसतो.सेवेकऱ्यांचं नातं हे पवित्र, शुद्ध, निस्वार्थी, प्रामाणिक व भोळे असते.

रक्ताच्या नात्यापेक्षा सेवेकऱ्यांचं नातं हेच आपल्या सुख दुःखात मदत करते कारण स्वामींचे सेवेकरी नेहमीच भावाप्रमाणे मदत करतात, त्यामुळे तुम्हीही जाणून घ्या की हे नाते म्हणजे कसे व सेवेकरी कसा असतो. तसेच आपण करत असलेली सेवा स्वामी चरणी अर्पून तो सतत तेच करतो व त्याच्या जीवनात सुखी समाधानी राहतो,

स्वामीजी अशा प्रामाणिक सेवेकऱ्याला भरपूर देतात व त्याच्या प्रत्येक संकटात त्याच्या पाठीशी असतात. इतरांची टिंगल टवाळी न करणे, इतरांना कमी लेखणे, इतरांना त्यांच्या दोषावरून हिनवणे व इतरांना टोमणे मारणे हे एका सेवेकऱ्याचं लक्षण नाहीये.

याउलट तो कोणाची निंदा करत नाही, चुकीचे असेल तर समजून सांगतो, स्वामींची भक्ती कशी करावी याचा प्रसार करतो व सर्वांनी मिळून सेवा कशी करायची याचं ज्ञान देतो.कोणाबद्दलही अजाणतेपणी चुकीचे मत ठरवू नये, तसे त्याला दोषी ठरवू नये व त्यामुळे तुम्हीच स्वतःच्या द्वेषाच्या अग्नीत जळत असता त्यामुळ तुमचं मन सेवेत न रमता इतरत्र भटकू लागते.

मदत करणे व त्यामुळे त्याला सारख बोलून दाखवणे हे चुकीचे असते. तुम्ही जर सेवेकरी असूनही तुम्हाला अडचणी येत असतील तर नक्कीच तुम्हाला आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे कारण स्वामींना चारित्र्यहीन सेवेकरी आवडत नाहीत,

जे लोक सोंग करतात त्यांना स्वामी साथ देत नाहीत, जे लोक त्यांचं काम, चारित्र्य, सेवा प्रामाणिकपणे स्वामींच्या चरणी अर्पण करत नाहीत त्यांच्या सेवेला मोल नसते कारण सर्वकाही करण्यासाठी स्वामीनीच आपल्याला योग्य मार्गदर्शन केलेले असते त्यामुळे या गोष्टी सेवेकरीने लक्षात ठेवायला हव्यात.

अशक्य ही शक्य करतील स्वामी हे स्वामींचे बोधवाक्य लक्षात ठेवून आपण नेहमी सत्कर्म करत रहावे. त्यामुळे स्वामी आपल्याला आशीर्वाद देतात व आपण सेवेत रमून जातो त्यामुळे अहंकार, लोभ, वाद विवाद, स्वार्थीपणा आपल्या आयुष्यात येत नाही. स्वामींचा सेवेकरी हा निर्मळ, स्वच्छ मनाचा, नेहमी पारदर्शी व्यवहार करणारा, कितीही मोठा असेल तरी अहंकार न बाळगणारा असा असतो.

जीवन सुरळीत चालण्यासाठी आपल्या हातून चुका कमी होऊन जास्तीत जास्त चांगले जगता यावे यासाठी काही गोष्टी आहेत त्या पाळल्या पाहिजेत. जेणेकरून कळत नकळत आपल्या कडून स्वामी सेवा नियमित व्हावी.

ज्यामुळे प्रगतीचे मार्ग प्रशस्त होत जातात. कोणतेही चांगले काम करताना अडचणी येणारच तर त्यावर मात करून पुढे चला. कुठलेही काम करताना जर आपल्या अडचणी येत असते काही प्रॉब्लेम येत असते निराश नाही व्हायचं.

जेव्हा काम करताना आपल्याला अडचणी येतात तर याच खरी अडचण म्हणजे आपली परीक्षा असते आणि ती परीक्षा आपण कसे फेस करतो हे खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण यातून मार्ग काढून पुढे जातो तर त्यातून मिळालेले हे यश आहे ते खूपच आनंददायी असते.

त्यामुळे नेहमी अडचणी काही चांगले काम करताना खचून जाऊ नका. त्यातून योग्य मार्ग काढून पुढे पुढे जात रहा. आपले शब्द हे शस्त्र आहे त्यामुळे ते नेहमी जपून वापरले पाहिजे. आपण कोणाशी बोलताना कळत नकळत किंवा आपण काही दुसऱ्या मूडमध्ये आपले कशामुळे चिडचिड होत असेल जास्त काम आहे

किंवा इतर कुठल्या गोष्टीमुळे अशावेळेस आपण पुन्हा तिसर्‍या व्यक्तीची बोलतोय तर त्यांच्याशी बोलताना आपल्याला खूप सांभाळून बोलायचे आहे. आपण नकळत आपला जो राग आहे आपल्या मनाचे फ्रस्ट्रेशन आहे त्यामुळे कधीकधी समोरच्याला काही बोलून जातो तर त्यामुळे शब्द हे शस्त्र आहे त्याचा नेहमी जपून वापर करावा.

आपण जेव्हा समोरच्या माणसाला एखादी गोष्ट बोलतो, ते शब्द आहे ते कधीच मागे घेता येत नाही त्यामुळे बोलताना आपण आधी विचार करून बोलले पाहिजे कारण समोरच्या माणसाला जेव्हा आपण काही बोलतो तर ते त्याच्या मनात राहून जाते

आणि त्या माणसांमध्ये याबद्दल एक व्यक्तिमत्व तयार होते की ही व्यक्ती अशी आहे की कितीही चांगले असू द्या पण स्वामी सेवा करत असू द्या चांगलेच वागायला हवे. कळत नकळत त्याच्या कडून ही गोष्ट जी आहे ती चार लोकांमध्ये सुद्धा बोलले जाऊ शकते की ही व्यक्ती मला अशी बोलली होती

त्यामुळे आपण नेहमी बोलताना सांभाळून बोलले पाहिजे जेणेकरून आपण कोणाशी बोलल्यामुळे कोणाला काही थोडाफार दिलासा मिळतो चांगले आहे त्यामुळे बोलताना चांगले बोलले पाहिजे. कुटुंबाच्या समृद्धीसाठी दर शनिवारी कणकेच्या तेलाचा दिवा लावून श्री हनुमंताचा मंदिरांमध्ये लावून हनुमान च्या पुढे मनोभावे राम रक्षा बोलावी. हा प्रभावी उपाय आहे. यामुळे आपल्या कुटुंबातील समृद्धी वाढते. जगण्यासाठी मदत होते.

प्रगती मध्ये वाढ होते. त्यानंतर आपल्या ज्ञानाच्या दान केले पाहिजे. एखाद्या गोष्टीच जर आपल्याकडे भरपूर ज्ञान असेल तर ते नेहमी सोबत शेअर केले पाहिजे कारण कळत नकळत आपल्या मोठ्या लोकांच्या देखील चांगले होते त्यामुळे आपल्या मध्ये असं काही स्पिरिट्स असते तर ते नेहमी लोकांसोबत तुम्ही शेअर करा

त्यामुळे नक्कीच फायदा होईल . आता सगळेच लोक खूप बिझी असतात त्यामुळे कामाच्या व्यापामुळे त्यांचे बिझनेस नोकरी घर संसार या सगळ्या गोष्टींमुळे प्रत्येकाची आपली भेट होईल अस प्रत्येकाशी बोलणे होईलच असे नाही मग ते नातेवाईक असू द्या की आपले मित्र परिवार असल्यास सगळ्यांच्या पडणार नाही

परंतु म्हणून कोणी नाराज होण्याचे कारण नाही. चांगल्या कर्माचे आपल्या चांगल्या तऱ्हेने आपल्यालाच मिळणार आहे. लक्षात ठेवा सरळ मनाचा माणूस असतो तोच माणूस आपल्या स्वामीना प्रिय असतो. समोरचा व्यक्ती किती पण चांगला असु द्यात की वाईट असतात आपण नेहमी चांगले वागण्याचा ठेवले तर त्यामुळे स्वामींची नेहमी कृपा आपल्यावर आहे.

आपल्या काही संकटे आली तरी त्यातून मार्ग नक्कीच गुरूंचे स्मरण चालवते . तो मनुष्य हा खुप भाग्यवान ठरेल. आपला कधी पण फ्री टाईम मिळाला तरी आपण ट्रॅव्हलिंग करतोय किंवा काही गोष्टी करतो त्या जेव्हा आठवण येईल त्यावेळेस आपण नेहमी स्वामी समर्थांचे स्मरण केले पाहिजे.

नामस्मरणामधे खूप मोठी ताकद आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट जी आहे ती कॉन्सन्ट्रेशन करू शकतो आणि त्यामध्ये आपल्याला यश मिळते त्यामुळे नामस्मरण तुम्ही नेहमी त्याचा खूप फायदा आहे. तुम्ही करून बघा हे ते स्वतः तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील आणि तुम्ही शेअर करा.

नामस्मरण हे प्रत्येकाने केले पाहिजे. खरा सेवेकरी कोण असतो जो आपल्या स्वामींचा निरोप लोकांपर्यंत पोहोचवतो तोच खरा सेवेकरी असतो.

कळत नकळत आपण जेव्हा लोकांना सांगतो की ही गोष्ट आहे तो हे करू नको ती गोष्ट चांगली आहे हे तू करत जा तुझा असा फायदा होईल जेव्हा पण अशा काही गोष्टी लोकांपर्यंत सांगतो स्वामींचे पण संदेश आहे की आपण लोकांपर्यंत पोहोचवतो तर तोच सेवेकरी खरा सेवेकरी असतो.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!