मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी चमत्कारिक उपाय…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आपल्याला पटणार नाही पण आपल हिंदू धर्मशास्त्र बऱ्याच गोष्टी सांगते ज्यांच आचरण जर केल तर आपल्या मुलांचं आयुष्य संस्कारी आणि सुंदर होईल.

जसे की रोज बालोपासना करा. स्वामींची सेवा करायला शिकवा. सायंकाळी शुभम करोति म्हणायला शिकवा. तसेच मुलांना रोज तारक मंत्राचा जप करायला शिकवा तसेच गणेशाची उपासना केल्याने बौद्धिक क्षमता वाढते.

सरस्वती मातेची उपासना देखील लाभकारक ठरते. विद्या धनम सर्व धनं असा उच्चार करा.

अनेक पालकांना आपल्या मुलांबद्दल एक वेगळीच चिंता असते आणि ही चिंता असते त्यांच्या बुद्धीची! अनेक मुले जन्मजात: हुशार असतात. सर्व गोष्टी त्यांच्या लक्षात असतात.

त्यांची बुद्धी खूप तल्लख असते. पण काही मुले अशी असतात, जी या सर्व गोष्टीत थोडी पिछाडीवर असतात.

अशा मुलांची पालकांना खूप काळजी असते. पण तुम्ही अगदी साध्या सोप्प्या काही पद्धती वापरून आपल्या मुलांची स्मरणशक्ती वाढवू शकता.

जेणेकरून तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांची बुद्धी अधिक तल्लख करू शकता आणि या तल्लख व हुशारीचा त्यांना नक्कीच आपल्या आयुष्यात फायदा होईल.

कारण एकदा का बुद्धी तल्लख झाली की प्रगतीची दारे आपोआप उघडली जातात.

लहान मुलांची स्मरणशक्ती अत्यंत चांगले असणे खूप गरजेचे आहे कारण यामुळे त्यांना अभ्यासात मदत मिळते. काही मुलांची स्मरणशक्ती जन्मापासूनच उत्तम असते आणि त्यांची बुद्धी तल्लख होते.

तर काही मुलांना हि क्षमता वाढवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तुम्ही काही विशिष्ट उपाय वापरून आपल्या मुलांची स्मरणशक्ती नक्की वाढवू शकता.

मुलांना मेडीटेशन करण्याची सवय लावावी कारण यामुळे मेंदू शांत राहतो आणि आपले चित्त थाऱ्यावर राहते.

मानसिक शक्ती वाढते. तुम्ही तुमच्या मुलाला रोज साउंड मेडिटेशन, लाइट मेडिटेशन किंवा मंत्राचा जप करायला सांगू शकता.

डिजिटल डिटॉक्‍स म्हणजेच स्क्रिन टाईम कमी करण्यासाठी ध्यान लावण्याची सवय लावल्यास सुद्धा खूप मोठा फरक दिसून येतो.

यामुळे मुलाला अनेक गोष्टी जास्त काळ लक्षात राहतील.मेंदू सह शरीराच्या सर्व प्रमुख कार्यांसाठी डाएट अत्यंत गरजेचे असते.

लहान मुलांच्या आहारात तुम्ही हेल्दी गोष्टींचा समावेश करून लहान मुलांची स्मरणशक्ती कमी होण्याला आळा घालू शकता आणि यामुळे मुलाचा मेंदू देखील निरोगी राहील.

तुम्ही यासाठी जाणकारांचा सल्ला घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक परिपूर्ण डाएट प्लान सुरु करू शकता आणि याचा अत्यंत जलद फायदा तुम्हाला दिसून येईल.

बुद्धी तल्लख करण्याचा आणखी एक सोपा मार्ग आहे कोडी सोडवणे. आयक्यू आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठी हि मेंटल एक्‍सरसाइज जगभर वापरली जाते.

लहान मुलांना खेळ खेळायला आवडतात. म्हणूनच त्यांना शाळेत लिहायला आणि वाचायलाही शिकवलं जातं.

अशा परिस्थितीत मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही मजेदार आणि आव्हानात्मक खेळ वापरू शकता.

त्यामुळे खेळातील मुलांची स्मरणशक्ती वाढेल.मुलांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नये.

त्यांना सर्व प्रकारच्या तणावापासून दूर ठेवा. प्रत्येक मुलाची शिकण्याची पद्धत आणि क्षमता वेगळी असते. अशी मुलं शिकतात. त्यामुळे मुलांवर कधीही अभ्यासासाठी दबाव आणू नये.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!