तारक मंत्राचे महत्व, सगळे प्रॉब्लेम चमत्कार झाल्यासारखे गायब झाले…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ’ हे महाराजांचे नाव नाही, तर ब्रम्हाण्डगस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे. ॐ नमः शिवाय, दूं दूर्गायै नमः, श्री गुरुदेव दत्त हे ज्याप्रकारे षडाक्षरी तारक मंत्र आहेत, त्याचप्रमाणे समानार्थी ‘श्री स्वामी समर्थ’ हा सुद्धा सद्गुरु अनुग्रहीत तारक मंत्र आहे.

श्री – स्वयं श्रीपादविराजीत सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज. स्वामी – स्वाः म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा आहे. मी म्हणजे माझे अज्ञान, अहंभाव, षडरिपु व ईर्ष्या! अर्थात स्वामी म्हणजे माझा मी पणा स्वाः करा.

समर्थ – समर्थ म्हणजे संसाररुपी भवसागर सहज तारुण येण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा. त्यायोगे ‘श्री स्वामी समर्थ’ म्हणजे श्रीपादविराजित भगवान दत्तात्रेय, माझे मीपण भस्म करून स्वयंभू शिव तत्त्व सद्गुरुकृपे अंकित करा.

“जय श्री स्वामी समर्थ ” स्वामींची सेवा म्हणजे आपलं अहोभाग्य च म्हणावं लागेल. त्यासाठी आपण नेहमीच उत्साह दाखवायला हवा. आपल्या जीवनातील घडामोडी या स्वामींच्या मर्जीनेच घडत असतात.

त्यासाठी आपण नक्कीच प्रयत्नशील राहायला हवे. आपल्या जीवनातील आनंद, सुख, समाधान मिळवण्यासाठी आपल्याला स्वामी तेंव्हाच आशीर्वाद देतील जेंव्हा तुम्ही स्वामींची सेवा अगदी मनापासून, पूर्ण श्रद्धेने, भक्तीने कराल.

कारण स्वामींनी असं सांगितलं आहेच की” भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे”. प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या समस्या असतात, कोणाला लग्नाच्या, कोणाला नोकरीच्या,

कोणाला आजाराच्या तर कोणाला घराच्या आर्थिक परिस्थितीच्या. या सर्व समस्या आपण जर मन मोकळं करून स्वामींना बोललो तर आपण नक्कीच यशस्वी होऊ. त्यामुळे घरातील या समस्या,

दूर करण्यासाठी आपण स्वामींची अखंडपणे एक महिना 30 दिवस सेवा करावी. त्यामुळे तुमच्या जीवनातील बदल पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल आणि खरंच स्वामींचा चमत्कार नक्की अनुभवायला मिळेल.

सेवा करताना रोज संध्याकाळी आपण सुरुवातीला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचे आहे. त्यानंतर अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे.आणि यानंतर लगेच आपणाला तारक मंत्र म्हणायचा आहे किंवा ऐकायचा आहे.

तारक मंत्र आपणाला कुठेही प्राप्त होऊ शकतो तो तुम्ही डाऊनलोड करू शकता किंवा ऐकण्यासाठी देखील डाऊनलोड करू शकता. ही सेवा मनापासून करा श्रद्धेने करा तुम्हाला नक्कीच निश्चितच यश प्राप्त होईल.

आजपर्यंत अनेकांनी हा उपाय केला आहे त्यांना निश्चितच यश प्राप्त झाले आहे आणि अनेक जण आता ही सेवा करत आहेत. त्यांचे हे कार्य यशस्वीरीत्या मार्गी लागत आहे. स्वामी अक्कलकोटीचे म्हणजे बुद्धिगम्य आहेत.

ते स्वतःच म्हणाले, अकलसे खुदा पहचानो. निष्क्रिय व जुजबी वागणाऱ्याला आणि चिंतन न करणाऱ्याला स्वामींच्या कृपेचा व शक्तीचा बोध होणार नाही. स्वामी अद्भुत आहेत.

निर्बुद्ध व चंचल असणाऱ्याला स्वामींचे ‘स्व’रूप व त्यांची विलक्षण कृपासत्ता आणि त्यांचे विलक्षण व्यवहार (अघटित लीला) कळणार नाहीत व अनुभवास येणार नाहीत. स्वामी एकमेव चिरंतन सत्य आहेत.

बाकी मायाभ्रम आहे. ते सर्वशक्तीमान असे सर्व विश्वाचे मालक आहेत. स्वामींना समजले तर जीवन समजले व आपल्या इच्छा पूर्ण झाल्या असं समजायचं. तारक मंत्राचे महत्व खूप आहे.

पूजा ताईंना आलेला विलक्षण अनुभव म्हणजे एकत्र आनंदी गोकुळ कुटुंब अचानक खटके उडू लागले ते या ताईंना खूप त्रास करू लागले.

आपले कुटुंब कोसळताना पाहून खूप दुःख झाले पण जेंव्हा तारक मंत्र, स्वामी सेवा याचे महत्व पाहिले तेंव्हा त्यांनी स्वामी सेवा सुरू केली.

यामध्ये त्यांनी स्वामींना प्रार्थना केली. आपल कुटुंब हस्ते खेळते राहो. त्या रोज नियमाने तारक मंत्र म्हणायच्या आणि समोर अगरबत्ती आणि पाणी घेऊन बसायच्या.

स्वामींना प्रार्थना करून तारक मंत्र झाला की ते पाणी जो पिण्याचा पाण्याचा माठ असतो त्यात ते अभिमंत्रित पाणी ओतायच्या झालं असे की इतके होणारे वाद मिटले.

आणि सर्व काही पूर्ववत झालं. श्री स्वामी समर्थ.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!