नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, अनेकांना अंगठी घालण्याची आवड असते. काही लोक आपल्या राशीनुसार अंगठी परिधान करतात तर काहींना सोन्या-चांदीच्या अंगठ्या घालायला आवडतात. कासवाच्या अंगठीचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.
वास्तुशास्त्रानुसार कासवाची अंगठी घातल्याने व्यक्तीचे भाग्य खुलते, असे मानले जाते. याचा थेट संबंध धनाची देवता लक्ष्मीशी आहे. कोणतीही व्यक्ती ही अंगठी घालते त्याला लक्ष्मी देवीचा विशेष आशीर्वाद मिळतो.
वास्तुशास्त्राव्यतिरिक्त, चीनी फेंगशुईमध्ये, कासवाला संपत्ती आकर्षित करण्याचे आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. लोकांच्या आयुष्यात सुख सुविधांची कमतरता आहे किंवा पैशाची कमतरता असते अशी लोकांनी कासवाची अंगठी परिधान केल्यास विशेष फायदा होतो.
शास्त्रानुसार कासव हे भगवान विष्णूच्या कच्छप अवताराचे रूप मानलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान विष्णूंनी समुद्रमंथनादरम्यान हा अवतार घेतला होता. ही अंगठी धारण केल्यानं सकारात्मक ऊर्जा मिळते. आत्मविश्वास देखील वाढतो.
भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये ज्योतिषशास्त्राला प्राचीन काळापासून महत्त्व असल्याचे दिसून येते. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहमानामुळे त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या भविष्यातील काही घटनांचा अंदाज बांधता येऊ शकतो.
कुंडलीतील ग्रह शुभ असतील, तर व्यक्तीला त्याचा फायदा मिळतो, अशी मान्यता आहे. मात्र, काही ग्रह प्रतिकूल असतील किंवा कुंडतील मजबूत नसतील, तर अशावेळी काही उपाय सूचवले जातात.
गेल्या काही वर्षांपासून कासवाच्या आकाराची अंगठी परिधान करण्याचे प्रमाण अनेक पटीने वाढल्याचे पाहायला मिळते. कासवाची अंगठी परिधान केल्यास धनवृद्धीचे योग प्रबळ होतात.
वास्तुशास्त्रानुसार जो व्यक्ती कासवाची अंगठी घालतो, त्याला जीवनात सर्व प्रकारच्या सुख-सुविधा आणि संपत्ती प्राप्त होते. याशिवाय आर्थिक चणचण दूर होते. धार्मिक मान्यतेनुसार कासव हा भगवान विष्णूचा कच्छप अवतार मानला जातो. हा अवतार भगवान विष्णूंनी समुद्रमंथनाच्या वेळी घेतला होता.
ही अंगठी धारण केल्याने आत्मविश्वास वाढतो, तसेच सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो. ज्योतिष शास्त्रानुसार मेष, कर्क, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांनी ज्योतिषाच्या सल्ल्याशिवाय ही अंगठी परिधान करू नये. असे केल्याने ग्रह दोषांमुळे मोठे नुकसान होऊ शकते. कासव अंगठी कधी खरेदी करावी –
कासवाची अंगठी खरेदी करण्यासाठी शुक्रवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. खरेदी केल्यानंतर घरात माता लक्ष्मीच्या चित्रासमोर ती काही वेळ ठेवा. त्यानंतर ती दूध-पाण्याच्या मिश्रणात धुवावी किंवा गंगेच्या पाण्याने धुऊन पवित्र करावी. त्यानंतर देवी लक्ष्मीच्या मंत्राचा 108 वेळा जप करा आणि नंतर उदबत्ती दाखवून हातात धारण करा.
कासवाची अंगठी घालण्याचा योग्य मार्ग आणि दिवस ? शुक्रवारी कासवाची अंगठी घालणे शुभ असते. ती परिधान करताना, लक्षात ठेवा की त्याचा चेहरा आपल्या दिशेला असावा. त्यामुळे पैसा आपल्याकडे आकर्षित होतो.
कासवाचा चेहरा बाहेरच्या बाजूला असेल तर पैसे खर्च होण्याची शक्यता जास्त आहे. ही अंगठी नेहमी उजव्या हाताच्या मधल्या बोटात किंवा तर्जनीमध्ये घालावी. कासवाची अंगठी उजव्या हाताच्या पहिल्या किंवा मधल्या बोटामध्ये घालण्याचा सल्ला दिला जातो.
ही अंगठी अशा प्रकारे घातली जावी, जेणेकरून कासवाचे मुख, अंगठी धारण करणाऱ्या व्यक्तीच्या दिशेला असेल. त्यामुळे धनवृद्धी होण्याचे योग प्रबळ होतात, असे सांगितले जाते. अनेक व्यक्तींना हातातील अंगठी बोटांनी फिरवत राहण्याची सवय असते.
मात्र, कासवाच्या अंगठीबाबत असे करणे अपायकारक ठरू शकते. अंगठी धारण करताना त्यावरील कासवाचे तोंड, ती अंगठी धारण करणाऱ्या व्यक्तीच्या दिशेलाच असल्याची खबरदारी घेतली जावी. अन्यथा धनहानी होण्याचा धोका वाढतो, अशी मान्यता आहे.
अंगठी कोणती धातूची, चांदीच्या धातूमध्ये कासवाची अंगठी घालणे नेहमीच शुभ असते. त्यामुळे त्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या मनावर होतो. एकदा अंगठी घातली की ती पुन्हा पुन्हा काढू घालू नये.
त्यामुळे त्याची दिशा बदलते आणि पैशाच्या येण्यामध्ये अडचण येते. कासवाची अंगठी वास्तुशास्त्रात शुभ मानली जाते. जीवनातील अनेक दोष दूर करून प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी कासवाची अंगठी परिधान करावी, असे सांगितले जाते.
यामुळे आत्मविश्वास वाढतो. दीर्घायुष्य प्राप्त होऊ शकते. कासवाची अंगठी संरक्षक कवचही मानली गेली असून, ती परिधान केल्यानंतर वाईट स्वप्न पडत नाहीत. तसेच जीवनात स्थैर्य, शांतता, संयम, सुख, समृद्धी कायम राहण्यास मदत मिळते, असे सांगितले जाते.
मात्र, घरातील स्वच्छता करतान किंवा स्वयंपाक घरातील कामे करताना ही अंगठी काढून ठेवावी. यानंतर स्वच्छ हात-पाय धुतल्यानंतर लक्ष्मी देवीसमोर ठेवून पुन्हा परिधान करावी, असे सांगितले जाते.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.