नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, 8 ते 10 ग्लास पाणी पिणे शरीरासाठी खूप महत्त्वाचे असले तरी दिवसातून तीन वेळा गरम पाणी पिण्याची सवय लावल्यास शरीराला आजारांपासून वाचवता येते. गरम पाण्याने पाचनशक्ती वाढते.
जे खाणे पचण्यासाठी जड असते ते पचवण्यासाठी गरम पाण्याचा फायदा असतो. यामुळे पोट स्वच्छ राखण्यास मदत होते. तसेच पाचनसंबंधी कोणतीही समस्या सतावत नाही.
पाचनशक्ती तंदुरुस्त असेल तर वेट लॉस करण्यातही मदत होते. यासोबतच गरम पाण्यामुळे फॅट लॉसही होतो.
पोटदुखीचा त्रास होत असेल अथवा पोटात मुरडा पडत असेल तर गरम पाण्याने आराम मिळतो. दरम्यान गरम पाणी एकदम पिऊ नये थोडे थोडे प्यावे. तसेच दररोज सकाळी रिकाम्या पोटी असे पाणी प्यायल्यास हा त्रास होणार नाही.
स्किन ग्लोसाठी दररोज सकाळी उठल्यावर एक ग्लास गरम पाणी प्यावे. सकाळी गरम पाणी प्यायल्यास ब्लड फ्लो आणि रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदत मिळते. तसेच बीपीही नॉर्मल राहतो.
नाक आणि घशाला त्रास होत असेल तर अशावेळेस कोमट पाणी प्यावे. याने नक्कीच फायदा होतो. यामुळे घसा स्वच्छ होण्यास मदत होते. रक्ताभिसरण वाढवण्यासाठी दररोज गरम पाण्याचे सेवन करावे.
गरम पाण्याने बॉडी डिटॉक्स होण्यास मदत होते. शरीरातील सर्व अशुद्ध द्रव्ये बाहेर फेकली जातात. ज्या लोकांना भूक न लागण्याची समस्या असते अशा व्यक्तींनी एक ग्लास गरम पाण्यात काळी मिरी, मीठ आणि लिंबूचा रस टाकावा.
हे पाणी प्यायल्याने भूक वाढते. त्यामुळे ज्यांना वजन वाढवायचे असेल अशा व्यक्तींनी हे पाणी जरूर प्यावे.
काहीतरी वेगळे खाल्ल्याने शरीरात विषारी पदार्थांचे प्रमाण वाढते. यामुळे शरीर आतून कमकुवत होते. यामुळे व्यक्ती लवकर म्हातारा होण्यास सुरूवात होते. ही समस्या रोखण्यासाठी सकाळी गरम पाणी प्यावे. यामुळे त्वचेवर सुरकुत्या येत नाहीत. तसेच पोटही साफ राहते.
पीरियड्सदरम्यान अनेक महिलांना पोटदुखीचा त्रास होतो. अशा महिलांनी यावेळेस गरम पाणी प्यायल्यास पोट दुखी बरी होते. अशावेळेस एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने पोटदुखीचा त्रास बरा होण्यास मदत मिळते.
तसेच गरम पाणी प्यायल्याने पिंपल्सपासून सुटका मिळते. जर तुमचे वजन सतत वाढत असेल आणि लाख प्रयत्न करूनही काही फरक पडत नसेल तर कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिसळा आणि ते तीन महिने सतत प्या.
तुम्हाला नक्कीच फरक … गरम पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते आणि त्यामुळे शरीरातील सर्व अशुद्धी सहज साफ होतात. गरम पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान वाढू लागते.
चेहऱ्यावरील सुरकुत्या तुम्हाला त्रास देऊ लागल्या तर काळजी करण्यासारखे काही नाही. आजपासूनच गरम पाणी पिण्यास सुरुवात करा आणि काही आठवड्यांत त्याचे परिणाम दिसून येतील.
गरम पाणी प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहते आणि गॅसच्या समस्येतही आराम मिळतो. जेवणानंतर एक कप गरम पाणी पिण्याची सवय लावा. असे केल्याने अन्न लवकर पचते.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.