बक्कळ पैसा मिळवण्यासाठी मुख्य दरवाजावर या काढा हळदीचे स्वस्तिक... - Viral Marathi

बक्कळ पैसा मिळवण्यासाठी मुख्य दरवाजावर या काढा हळदीचे स्वस्तिक…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, भाग्याची साथ सगळ्यांनाच हवी असते आणि भाग्याची साथ मिळवण्यासाठी लोकांना वाटेल ते उपाय करतात. पण वास्तूमध्ये भाग्याची साथ मिळवण्यासाठी अतिशय सोप्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.

यामध्ये वास्तुशास्त्रामध्ये असं मानलं जातं की, जर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वच्छता नसेल किंवा बूट- चप्पल विखुरलेले असतील तर तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश थांबतो आणि वास्तुदोष निर्माण होतो.

परंतु मुख्य प्रवेशद्वारावर काही गोष्टी लावल्यास भाग्य साथ द्यायला सुरुवात होते. या गोष्टी कोणत्या आहेत चला जाणून घेऊया..

यामध्ये सर्वात प्रथम कलश हे संपन्नतेचे प्रतीक मानले जातात. अध्यात्मिक दृष्टीकोनातून हे शुक्र आणि चंद्राचे प्रतीक आहे आणि गणेशाच्या रुपात त्याची पूजा केली जाते. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वारावर रोज कलर भरून ठेवल्यात भगवान गणेशाच्या कृपेने शुभ लाभ मिळतो.

पण या कलशाचे तोंड रुंद असावे. तसेच रोज सकाळी आंघोळीनंतर हा कलश पूर्ण भरून ठेवावा आणि तुम्ही त्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकू शकता, असं केल्याने सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल. मात्र हे पाणी रोज बदलत गेलं पाहिजे.

याचबरोबर हिंदू धर्मात कोणत्याही शुभकार्याला पूर्वी किंवा कुठलाही सण आला आपण आपल्या घराला तोरण लावतो.कारण तोरण लावल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि आपली सर्व कार्य अडथळ्याशिवाय पूर्ण होतात.

आंब्याची पाने उत्तम असून अशोकाच्या पानांपासूनही तोरण बनवले जातात. वास्तूमध्ये असं म्हटलं जातं की, प्रत्येक सणा व्यतिरिक्त प्रत्येक मंगळवारी घरात तोरण लावले असता, त्यांचे खूपच शुभ परिणाम प्राप्त होतात.

मुख्य दरवाजावर चीनी नाणी लावणे खूप शुभ मानलं जातं. असं केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि 3 चिनी नाणी एका लाल दोरात बांधा आणि घराच्या आतील बाजूच्या मुख्य दरवाजाच्या हँडलवर ठेवा.

असं केल्याने तुमच्या घरात पैसा जमा होण्याचे प्रमाण वाढते आणि लोकांच्या हातून होणारा अनावश्‍यक खर्च थांबतो. मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लाल आणि पिवळा किंवा निळ्या रंगाचे स्वस्तिक बनवा.

तुम्हाला हव असल्यास बाजारातून बनवलेल स्वस्तिक सुध्दा तुम्ही मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूला लावू शकता. मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूला लाल स्वस्तिक लावल्याने घरातील वास्तु आणि दिशादोष दूर होतात.

दुसरीकडे मुख्य दरवाजाच्या अगदी वर मध्यभागी निळ्या स्वस्तिक लावल्याने घरातील लोक वाईट नजरेपासून दूर राहतात.

घराच्या मुख्य दारावर गणेशाची मूर्ती किंवा चित्र ठेवण्यापूर्वी काही नियम जाणून घेणे गरजेचे आहे. यामध्ये असे म्हणतात की, ज्या बाजूला गणेशाचा पोट असतं तिथे समृद्धी असते.

ज्या बाजूला पाठ असते, तिथे गरिबी विसावते, म्हणून जेव्हा-जेव्हा मुख्य दरवाजावर गणेशजी ठेवाल, तेव्हा ते आतील बाजूने ठेवा. कारण बाहेर लावल्याने तुमच्या घरावर विपरीत परिणाम होतो घरात गरिबी वाढ होईल.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!