नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असे स्वामी महाराज सांगतात. स्वामी त्यांच्या सेवेकरीला योग्य ते फळ देतात, त्याच्या भक्तीनुसार त्याच्यावर प्रसन्न होतात. आपण जशी जितकी सेवा करू तितकं आपल्याला त्याचं चांगलं फळ मिळतं. स्वामींची सेवा करणे हे आधी स्वामी केंद्रातून शिकून घ्यावे. त्यामुळे तुमची भक्ती व मनोबल दोन्ही वाढेल ज्यामुळे तुमची भक्ती अखंड होईल.
स्वामी समर्थ महाराज आपल्याला नेहमीच आशीर्वाद देतील जर तुम्ही स्वामींची प्रामाणिकपणे सेवा कराल तर तसेच तुमची मेहनत व कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्यावर स्वामींचा वरदहस्त राहील.. घरातल्या महिलेने दर गुरुवारी हे एक काम करावे, जे हवे ते सगळं काही मिळेल, घरावर कोणतीही बाधा येणार नाही, कि गुरुवारचा दिवस हा स्वामींचा दिवस मानला जातो,
स्वामींना आवडता दिवस हा गुरुवार असतो, म्हणून दर गुरुवारी स्वामींची आरती करून स्वामींना गोड नैवेद्य दाखवाव, त्यात दूध साखर किंवा गोड कोणतेही मिठाई किंवा पुरणपोळी जे ही आपल्याला शक्य असेल.
तसा गोड नैवेद्य गुरूवारच्या दिवशी स्वामींना दाखवावा, जो नैवेद्य तुम्ही दाखवाल तो नंतर घरातल्या सगळ्या लोकांनी प्रसाद स्वरुपात खायचा आहे, हे सगळे झाले की त्यानंतर आपल्या तिजोरीमध्ये जिथेही तुम्ही पैसे दागिने ठेवत असाल तिथे एक रुपया किंवा अकरा रुपये 21 रुपये दक्षिणा स्वरूपात तुम्हाला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे,
असे तुम्हाला दर गुरुवारी करायचे आहे, आणि कमीत कमी अकरा महीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे, तिजोरीमध्ये जमा झालेले पैसे अकरा महिन्यापर्यंत खर्च करायचे नाहीत.
अकरा महिन्यानंतर त्या पैशाची आपल्या देवघरात कोणतीही लागणारी आवश्यक वस्तू किंवा देवाची कोणतीही मूर्ती किंवा स्वामींची मूर्ती तुम्ही घ्यायची आहे. एक रुपया दर गुरुवारी ठेवला तरी चालतो आणि जमत असेल तर दर गुरुवारी अकरा रुपये ठेवले तरी चालतात.
तुमच्या घरात तिजोरी नसेल तर एखाद्या डब्यामध्ये तुम्ही त्यामध्ये एक रुपया, अकरा रुपये एकवीस रुपये टाकून जमा करू शकता, पण हे तुम्हाला फक्त दर गुरुवारी करायचे आहे, अन ज्या गुरुवारी तुम्हाला चालत नसेल, त्या गुरुवारी हा उपाय नाही करायचा, त्याच्या पुढच्या गुरुवारी करायचा.
दर गुरुवारी आठवणीने हे काम अवश्य करावे, 11महिने कंटिन्यू करावे, शुभ वार्ता मिळेल तुमच्या इच्छा पूर्ण होतील. हा उपाय म्हणजे आपल्या जीवनातील अंधार दूर करणे तसेच स्वतःच जीवन हे अध्यात्मिक बनवून संसार व परमार्थ दोघांचा आनंद घेणे होय.
दुसरा उपाय स्वामीसेवा पण अशी करा. अशक्यही शक्य करतील स्वामी, या अगाध श्रद्धेने स्वामी भक्त महाराजांसमोर नतमस्तक होतात.त्यामुळे आपल्याला स्वामींचा कृपा आशीर्वाद मिळण्यास मदत होईल.
यासाठी आपल्याला श्री स्वामी समर्थाष्टक मंत्राचा जप करायचा आहे. याशिवाय आपल्या सुख-समृद्धीसाठी रोज 2 मिनिट हा मंत्र वाचा किंवा ऐका ,यामुळे श्री स्वामी समर्थ अष्टक मंत्र स्वामी कृपेने इच्छा होईल पूर्ण होतील.
हा आहे स्वामी समर्थाष्टक मंत्र- श्री स्वामी समर्थाष्टक || असें पातकी दीन मीं स्वामी राया | पदी पातलो सिद्ध व्हा उद्धराया ||नसे अन्य त्राता जगी या दीनाला |समर्थां तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || १ ||
मला माय न बाप न आप्त बंधू |सखा सोयरा सर्व तू दीन बंधू ||तुझा मात्र आधार या लेकराला|समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ||२||नसे शास्त्र विद्या कलादीक काही |
नसे ज्ञान, वैराग्य ते सर्वथा ही ||तुझे लेकरु ही अहंता मनाला |समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ३ ||
प्रपंची पुरा बद्ध झालो दयाळा |तुझा दास मी ही स्मृती ना मनाला ||क्षमेची असे याचना त्वत्पदाल |समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ||४||मला काम क्रोधाधिकी जागविले |
म्हणोनी समर्था तुला जागविले ||नका दूर लोटू तुझ्या सेवकाला|समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ||५||
नको अंत पाहू त्वरे धाव घेई |तुझ्यावीण नाही दुजी श्रेष्ठ आई ||अनाथासि आधार तुझा दयाळा |समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ६ ||कधी गोड वाणी न येई मुखाला |
कधी द्रव्य ना अर्पिले याचकाला ||कधी मुर्ती तुझी न ये लोचनाला|समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ||७||
मला एवढी घाल भीक्षा समर्था |मुखे नित्य गावी तुझी गुण गाथा ||घडो पाद सेवा तुझ्या किंकराला|समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ||८|||| श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ||
हा श्री स्वामी समर्थाष्टक मंत्र रोज जप किंवा बोलणे शक्य नसल्यास ,फक्त ऐकल्यास आपल्या मनातील सर्व इच्छा श्री स्वामी समर्थ महाराज पूर्ण करतात. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.