भरपूर कर्ज झाले असेल, मुक्ती हवी असेल तर लगेच सुरू करा या मंत्राचा जप…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, || श्री स्वामी समर्थ || मानवी जीवनात अनेक महत्त्वाच्या गरजा असतात. पण त्यामध्ये काही वेळा त्या गरजा माणूस पैशाच्या अभावी पुर्ण करू शकत नाही किंवा त्याची काही स्वप्ने पूर्ण करू शकत नाही. तेव्हा काही वेळेस आपली गरज कर्जाच्या हप्त्यांच्या शाश्वतीवर पूर्ण करावी लागते.. कर्ज घेण्याची कोणाचीही मनापासून इच्छा नसते. पण आपण अडकलेल्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपण या पर्यायाचा उपयोग करतो आणि कर्ज घेतो.

काही वेळेस अशी परिस्थिती येते की हे कर्ज थकीत पडते, घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, पैसे येण्याचे मार्ग अडून राहतात व घरातील पैसा टिकत नाही. याचा परिणाम असा होतो की या कर्जाच्या डोंगराखाली काही जण दबून जातात.

तुम्ही कर्ज मुक्तीसाठी अजून काही उपाय करा ज्यामुळे तुम्ही कधीही कर्जबाजारी होणार नाही किंवा तुमच्यावर कधी कर्ज घेण्याची वेळ येणार नाही . कर्ज हे माणसाला जीवनात कधी ना कधी घ्यावे लागते मग ते शिक्षणासाठी असुद्या, लग्नासाठी असुद्या, गाडी किंवा घरासाठी असू द्या किंवा कोणत्यातरी आपल्या कामासाठी, आजारासाठी , दवाखान्यासाठी कर्ज घेण्याची वेळ प्रत्येकावर येत असते.

पण ही वेळ खूप वाईट वेळ समजली जाते, एकदा की त्या माणसाने कर्ज घेतलं तर त्या माणसाचे आयुष्य संपूर्ण वाईट परिस्थितीत जाते, समस्येमध्ये जाते, संकटात जाते आणि त्यासोबत त्या माणसाच्या परिवाराला पण हे सगळं सहन करावा लागत.

कर्ज घेतलेला माणूस कमवतो कमी , भागवतो जास्त अशी परिस्थिती निर्माण होते म्हणून जर तुमच्यावर कर्ज आहे तर तुम्ही सुद्धा काही उपाय करा कारण यामुळे कर्ज लवकर मुक्त होईल आणि तुम्ही या संकटातून बाहेर पडाल.

तुमच्यावर जर कर्ज नाहीये तर तुम्ही निश्चिंत आहात तरी तुम्ही हा तोडगा करा कारण त्यामुळे तुमच्यावर जीवनभर कर्ज घेण्याची वेळ कधीच येणार नाही.

यावर आपण श्री स्वामी समर्थ महाराज यांनी सांगितलेला एक उपाय जर केला तर तुमची यातून सुटका होईल. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात की आपण मंगळवारी कधीच कर्ज घेऊ नये. कारण ते लवकर फिटत नाही आणि चुकून कर्ज घेतले तर याचा हप्ता देण्यासाठी हाच दिवस निवडा.

मंगळवार प्रमाणे शुक्रवारी सुद्धा कर्ज फेडण्यासाठी शुभ मानले जाते. याच बरोबर काही ज्योतिष शास्त्रानुसार किंवा उपायानुसार आपण लवकर कर्ज फेडू शकतो. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात की जर या दिवशी कोणाकडून कर्ज घेतले असेल तर त्याला 5 ते 10 हजार रुपये लगेच परत करा.

ज्योतिष शास्त्रामध्ये कर्ज मुक्तीसाठी भगवान गणेश यांचं खूप महत्त्व दिले आहे. जी व्यक्ती गणेशाची रोज पूजा करते आणि याचबरोबर श्री हनुमानाची पुजा दर मंगळवारी केल्याने कर्ज मुक्ती मिळते.

हनुमान भगवंताच्या पुजेच्या प्रसादात म्हणून लवंग अर्पण करावे. लाल मसुरीच्या डाळीचे दान करावे. स्वामी समर्थ सांगतात की बुधवारी कोणालाही पैसे देऊ नये कारण ते पैसे एक तर बुडतात किंवा वसुलीसाठी त्रास करतात.

गुरुवारी हा पैसे देण्यास चांगला आहे. 5 गुलाबाची फुले आपल्या उजव्या हातात घेऊन देवापुढे 108 वेळा गायत्री मंत्रजप करावा आणि त्यानंतर ती फुले जवळच्या वाहत्या पाण्यात सोडावे.

खूप चमत्कारी, खूप शक्तिशाली हा उपाय आहे, तुम्हाला फक्त दर बुधवारी जो गणेशाचा दिवस आहे, बुधवारचा दिवस हा गणेशाचा दिवस मानला जातो तर तुम्हाला दर बुधवारी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपल्या देव घरासमोर बसून श्री गणेश स्तोत्र वाचायचे आहे,

श्री गणेश स्तोत्र जे स्वामी समर्थ नित्यसेवा या पोथीत सुद्धा दिलेल आहे किंवा गणेश स्तोत्राचे एक संपूर्ण पुस्तक, गणेश स्तोत्राचे वेगळे पुस्तक ,पोती सुद्धा मिळते तर तुम्हाला दर बुधवारी श्री गणेश स्तोत्र वाचायचे आहे आणि कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करायची आहे.

सुख-समृद्धीसाठी, बरकतीसाठी प्रार्थना करायची आहे , हा एक उपाय झाला. हे काम तुम्हाला दर बुधवारी करायचे आहे आणि त्यानंतर एक दुसरा उपाय आहे,जो चमत्कारी समजला जातो त्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या घरात अर्धा किंवा एक किलो मसूर डाळ घेऊन यायचे आहे, मसूर डाळ घेऊन या,

रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर मसूर डाळची एक चिमूट घ्यायची , एक चिमूटभर मसूर डाळ उचलायची आणि तुमच्या छतावर ठेवून द्यायची किंवा बाहेर झाड असेल किंवा एखादी जागा असेल तिथे तुम्ही ठेवून द्यायची,

असे सांगितले जाते की मसूर डाळ जो व्यक्ती दान करतो, दानधर्म करतो त्याच्यावर कर्ज घेण्याची वेळ येई नाही पण मसूर डाळ आपण रोज दान करू शकत नाही , पण चिमूटभर आपण पक्षांसाठी ठेवली तरी ते मोठे दान समजले जाते,

म्हणून आपल्याला रोज सकाळी एक चिमूटभर मसूर डाळ छतावर किंवा घराच्या बाहेर तुम्हाला एखाद्या कोपर्‍यात ठेवायची आहे, तुम्हाला हे दोन काम रोज करायचे आहेत ज्यांनी तुमची कर्ज सुद्धा मुक्त होईल ,

तुम्ही कर्जबाजारी सुद्धा होणार नाही आणि जर कर्ज नसेल तर कर्ज घेण्याची वेळ कधीच येणार नाही. यामुळे तुमचं जीवन कर्जमुक्त होईल व तुमच्या घरी येणारे धनाचे स्रोत वाढतील.

हे काही उपाय केल्याने तुमचे कर्ज लवकर फेडायला मदत होते. कारण भगवान श्री गणेशजी आणि हनुमान यांच्या कृपेने आणि तसेच श्री स्वामी समर्थ यांच्या उपायांनी तुम्हाला कर्ज मुक्ती मिळते. श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने तुमची कर्जातून मुक्ती व्हावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!