चालता फिरता नाम जप केल्याने काय होते?…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, संपुर्ण विश्व स्पंदनशील आहे, विश्वातील प्रत्येक वस्तू म्हणजेच स्पंदनाचा समूह आहे, मनुष्य हा सुध्दा स्पंदनाचा समूह आहे. .पूर्व जन्मातील कर्मानुसार काही स्पंदन लहरी शुध्द आहेत तर बर्याच अंशी अशुध्द आहेत, तर या व्यक्तीच्या मनातनेहमी चांगल्या वाईट विचारांचा गोंधळ उडालेला असेल,

तो क्षणात भावुक बनेल तर क्षणात क्रोधी बनेल. म्हणून प्राचीन ऋषींनी मानवांना ईश्वर भक्ती म्हणजे नामस्मरण, स्तोत्र पठण,ग्रंथ वाचन, ध्यान, चिंतन व संत सहवास करण्याचा आग्रह केलेला आहे

या गोष्टींनी आपली स्पंदने शुध्द होत असतात, आपल्यातील दोष निघून जाऊ लागतात व आपण शुध्द पवित्र बनतो व प्रसन्नता, सदगुण, सदविचार यांची प्राप्ती होते.श्रीसदगुरु भक्ताची अशुध्द स्पंदने खेचून घेत असतात म्हणून श्रीसदगुरुंच्या सहवासाची आस धरावी.

नामस्मरणामुळे परमशांती मिळते निरंतर नामस्मणामुळे कुळाची परंपरा शुध्द होते नामस्मरण करण्यासाठी विशिष्ट काळ-वेळेचे बंधन नाही. नामाचे महात्म्य इतके अपूर्व आहे की,नाम उच्चारणारा व ते ऎकणारा दोघेही उध्दरून जातात. भक्ताचे सर्व दोष हरणकरुन नाम त्याला दोष मुक्त करते, म्हणून जड- जीवांना तारणारे नामस्मरणच आहे.

एकाच नामस्मरणाची शेकडो-हजारो आवर्तने झाल्यावर आपली स्पंदने त्यादेवतेचा आकार घेऊ लागतात. रामाची भक्ती करणारा राम होतो. कृष्णाची भक्ती करणारा कृष्ण होतो. तसेच सदगुरुंची भक्ती करणारा सदगुरु रुप होतो.

एखाद्या देवतेचे नाव किंवा मंत्र पुनपुन्हा म्हणत राहणे म्हणजे नामस्मरण होय. शिवाचा नामजप -‘ॐ नम: शिवाय।’ हा नामजप करतांना नामजपात तारक भाव येण्यासाठी ‘नमः’ या शब्दावर जोर न देता तो हळुवारपणे म्हणावा.

या वेळी आपण शिवाला साष्टांग नमस्कार करत आहोत, असा भाव ठेवावा.श्रीरामाचा नामजप-‘श्रीराम जय राम जय जय राम।’हा नामजप करतांना तारक भाव येण्यासाठी नामजपातील पहिल्यांदा येणारा ‘जय राम’ व त्यानंतरचा ‘जय जय’ मधील दुसरा ‘जय’ हे शब्द म्हणतांना त्यांवरजोरनदेतातेहळुवारपणे उच्चारावेत व त्या वेळी ‘श्रीरामा, मी तुलापूर्णत:शरण आलो आहे’, असा भाव ठेवावा.

मारुतीचा नामजप, -‘ हं हनुमते रुद्रात्मकाय हुं फट’ हा नामजप हनुमंता साठी करावा. लंकेत राक्षसांचा नाश करणारा मारुति. देवतेप्रति सात्त्विक भाव निर्माण होण्यासाठी तारक रूपाचा नामजप आवश्यक असतो, तर देवतेकडून शक्ती व चैतन्य ग्रहण होण्यासाठी मारक रूपाचा नामजप आवश्यक असतो.

गणपतीचा नामजप -‘ॐ गं गणपतये नम:।’ श्री गणेशाय नम: हा नामजप करतांना नामजपात तारक भाव येण्यासाठी ‘नम:’ या शब्दावर जोर न देता तो हळुवारपण म्हणावा. या वेळी आपण श्रीगणेशाला साष्टग नमस्कार करतआहोत, असा भाव ठेवावा.

दत्ताचा नामजप -‘श्री गुरुदेव दत्त।’ या नामजपातील ‘गुरुदेव’ हा शब्द म्हणतांना संपूर्ण शरणागतीचा भाव ठेवावा आणि ‘गुरुदेव’ या शब्दानंतर थोडा वेळ थांबून ‘दत्त’ हा शब्द म्हणावं.

“ॐ श्रीगुरुदत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभायनमः”नामस्मरणाचे फायदे, एकाग्रता वाढते चित्त शुद्ध होते वाचासिद्धी प्राप्त होऊ शकते. दुष्ट विचारांचा प्रभाव मनावर होत नाही.मन कायम आनंदी राहते.

सदैव देवतेचे स्मरण केल्याने सर्व मनोवांच्छित इच्छा पूर्ण होऊ शकतात.बहुतेक लोकांना असे वाटत असते की, ‘धार्मिक असणे म्हणजे चांगला माणूस असणे व म्हणून पुण्यवंत असणे.’

खरे तर तसे मानण्याचे काहीच कारण नाही. सतत देवाचे नाव घेणारा माणूस, जेवढा धार्मिक असण्याची शक्यता आहे, त्याहून तो दांभिक असण्याची शक्यता प्रत्यक्षात जास्त आहे,

‘नामस्मरण’ म्हणजे नामोच्चाराने किंवा मनातल्या मनात ‘ईश्वराचे वारंवार स्मरण’ करणे होय. नामस्मरणाचा हा उपाय अनेक वेळा मनातील गोंधळावर किंवा भीतीवर,तात्कालिक मानसिक इलाज किंवा अगदी विरंगुळा म्हणूनसुद्धा वापरला जातो.

उदाहरणार्थ कशाची भीती वाटली किंवा मोकळेपण असले तर रामनाम जप करणे वगैरे. ‘नामसंकीर्तन’ शब्दाचा अर्थ ‘ईश्वराचे सातत्याने नामोच्चारण किंवा स्तुतिगौरव करणे’ असा आहे. म्हणजे या दोन्ही शब्दांचे अर्थ साधारण सारखेच आहेत.

अशा या नामसंकीर्तनाला आपल्या महाराष्ट्रात तरी, अध्यात्माचे अभ्यासक व गुरू पराकोटीचे महत्त्व देतात, कारण त्यांच्या मते ‘नामाइतकी ईश्वराने भरलेली दुसरी वस्तू नाही’.

त्यामुळे त्यांच्या दृष्टीने परिणामकारक अशी नामसंकीर्तनाची एक व्यवस्थित प्रक्रिया बनवून तिला ते ‘नामसाधना’ हे भारदस्त नाव देतात आणि अशी ही ‘‘नामसाधना हेच ईश्वरकृपा होण्याचे रामबाण साधन आहे,’’ असे ते म्हणतात.

एवढेच नव्हे, तर नामसाधना करताना, आपला जीव त्यात गुंतविण्याचा अभ्यास केली, तर त्यामुळे ईश्वरकृपा तर होतेच, शिवाय प्रत्यक्ष ईश्वरदर्शनही होऊ शकते, असा त्यांचा दावा आहे.

एखाद्या कागदावर किंवा वहीत एक लाख वेळा ‘श्रीराम जयराम जयराम’ किंवा आणखी कुणा देवाचे नाव (किंवा मंत्र) लिहा, म्हणजे तुमच्या सर्व आधीव्याधी व दु:खे नष्ट होतील, असे सांगणारे गुरुबाबा किंवा महापुरुष आणि गंभीर चेहऱ्याने त्यांचा सल्ला घेणारे महाभाग इथे दिसून येतात. ‘आम्हाला या उपायाचा प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे,’ असे ठासून सांगणारे महाभागही इथे भेटतात.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!