नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, आपल्या हातून रोजच्या जीवनात काही न काही छोट्या मोठ्या अशा गोष्टी घडत जातात की त्याचा परिणाम कोणत्या प्रकारे आपल्यावर होईल असं सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याला जर अडचणी येत असतील, दोष निर्माण होत असतील तर या गोष्टी कटाक्षाने लक्षात घ्यायला हव्यात.
नाहीतर जितकं हातामध्ये आहे ते पण निघून जाईल. आपण कितीही कष्ट घेतले, मेहनत घेतली तरी देखील काही उपयोग होणार नाही. म्हणून या ज्या वस्तू आहेत त्या कुणीही मागू द्या चुकूनही देऊ नका.
सूर्यास्त म्हणजे सायंकाळची वेळ व त्यावेळी माता लक्ष्मी घरी प्रवेश करत असते, तेव्हा आपण चुकूनही या वस्तू इतरांना दिल्या तर त्याचा वाईट परिणाम आपल्या सुरळीत, सुखी जीवनावरती होत असतो.
संध्याकाळी सूर्यास्तानंतर या वस्तू दान म्हणून किंवा उधार म्हणून देऊ नयेत. बऱ्याचदा आपल्या शेजारचे किंवा इतर कोणीही संध्याकाळी सूर्यास्तानंतर आपल्याकडे काही वस्तू मागू शकतात. काहीही झालं तरीही या पाच वस्तू चुकूनही कोणाला दान देऊ नका. या वस्तू दान म्हणून दिल्याने आपल्या घरातील बरकत निघून जाते.
घरातील धनात कमतरता येते. जर आपण वारंवार या वस्तूंचे दान केले तर आपल्या घरात आर्थिक तंगी जाणवू लागते आणि घराची बरकत कधीच होत नाही. पहिली गोष्ट हळद. अनेकांना ही गोष्ट माहीत असेल की हळदीचा संबंध हा गुरू ग्रहाशी असतो.
त्याशिवाय हळदीला लक्ष्मी समजले जाते. ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये गुरू ग्रह बलवान असतो त्या व्यक्तीच्या नशिबात अपार धनसंपत्ती येते. जर या लोकांनी सायंकाळी कोणाला हळद दान दिली तर त्यांच्या कुंडलीत असलेला गुरू ग्रह कमजोर पडू शकतो. गुरू ग्रह कमजोर पडल्यामुळे आपल्या घरी पैशांची चणचण जाणवू लागते. पैशांच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
त्यामुळे संध्याकाळी चुकूनसुद्धा कोणाला हळद देऊ नका. दुसरी गोष्ट पैसा किंवा मौल्यवान वस्तू. संध्याकाळी कोणालाही पैसा किंवा कोणत्याही मौल्यवान वस्तू जसे सोने चांदी अजिबात देऊ नका.
आपण पैशाला, मौल्यवान वस्तुना माता लक्ष्मीचा दर्जा देतो. आपण संध्याकाळी आपल्या घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवतो, संध्याकाळी माता लक्ष्मी आपल्या घरी प्रवेश करण्याची वेळ असते.
त्यामुळे माता लक्ष्मीचा दर्जा असलेल्या वस्तू सोने,चांदी,पैसा या वस्तू कोणाला दिल्या तर माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होऊ शकते. त्यामुळे संध्याकाळी चुकूनसुद्धा कोणाला पैसे देऊ नका. तिसरी गोष्ट म्हणजे दही…दह्याचा संबंध हा शुक्र ग्रहाशी असतो.
दही आपल्याला सुख समृध्दी प्रदान करतो. हिंदू धर्मात तसा उल्लेख सुध्दा आहे. त्यामुळे सूर्यास्तानंतर दहीसुध्दा कोणाला देऊ नका. जी व्यक्ती संध्याकाळी दही दान देईल त्याच्या आयुष्यातून सुख आणि वैभव निघून जाते. सुख आणि वैभव या दोन्ही वस्तूपासून ती वंचित राहते. त्यामुळे चुकूनही दही दान देऊ नये.
चौथी गोष्ट अशी की सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दूध,दही,तूप. अनेकांना आश्चर्य वाटेल की दुधाचा थेट संबंध हा भगवान सूर्यदेव व चंद्रदेव यांच्याशी आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या सोबत सुध्दा दुधाचा संबंध आहे.त्यामुळे सूर्यास्तानंतर चुकूनही दुधाचे दान करू नका.
लसूण आणि कांदा. लसूण आणि कांदा यांचा थेट संबंध हा केतु ग्रहाशी आहे आणि केतू ग्रह हा अशा ग्रहांशी संबंधित आहे की जो जादू टोण्याशी संबंधित आहे. आपल्या आसपास असे अनेक लोक असू शकतात की जी कांदा आणि लसूण वापरून आपल्याला त्रास देऊ शकतात.
आपल्यावर अनेक चुकीच्या गोष्टी लागू शकतात. आणि म्हणूनच सूर्यास्तानंतर लसूण आणि कांदा कोणालाच दान किंवा उधार देऊ नये. सूर्यास्तानंतर लसूण कांदा दान देणे हे हिंदू धर्म शास्त्रानुसार अशुभ समजले जाते. तुम्ही या आधी नकळतपणे जर या गोष्टी केल्या असतील तर तुम्हाला नक्कीच समजेल की त्याचे परिणाम हे आपल्याला जाणवत असतातच.
म्हणून अशा गोष्टींची काळजी घ्या. जर तुम्ही मीठ देत असेल तर सावधान, कारण मीठ माता लक्ष्मी च प्रतीक आहे म्हणून सायंकाळी देऊ नका तसेच घरी मीठ संपू देऊ नका, ते खूप अशुभ असते. संपण्या आधीच आणून ठेवत चला.
तसेच घरातील काही वस्तूंमुळे फायदा होत आहे की तोटा हे समजत नसेल तर या वस्तू घरातून बाहेर काढायला हव्या. सध्या प्लास्टिकची फॅशन वाढत आहे. याने नकारात्मकता वाढते आणि आरोग्याला ते हानिकारक असते. त्यामुळे या वस्तु घरातुन बाहेर काढा.
घरात जर कोळ्याचे जाळे असेल तर ते लगेच काढावेत नाही तर घर पुर्ण जाळीत फसते. अनेक लोकांना वाटते की ते जाळे तोडणे म्हणजे घर तोडणे.पण तसे नसून जाळे जळमटे वेळच्या वेळी काढा.
देवपूजा झाल्यावर घरात निर्माल्य ठेऊ नये कारण त्याने आपल्याला अशुभ फळे प्राप्त होतात. घराला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी तुम्ही लिंबु-मिरची लावत असाल तर ते प्रत्येक आठवड्यात ते बदलत रहा.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.