नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, प्रार्थना आपल्या मनातून निघालेला एक असा भाव आहे तो आपल्या मनात विचारांमध्ये आणि आपल्या आत्म्यामध्ये अद्भुत शक्ती आणि समाधान असतो. प्रार्थनेच्या माध्यमातून आपण परमशक्ती परमपिता परमात्मा बरोबर जोडले जातो.
जसा आहार आपल्या शरीरासाठी महत्त्वाचा आहे तसेच प्रार्थना देखील आपल्या मनासाठी आपल्यातील आत्म्यासाठी महत्त्वाचे आहे. प्रार्थनेने भरलेले मन विश्वास आणि प्रसन्नतेने भरलेले असत. जर तुम्ही चिंता करत असाल तर याचा अर्थ तुम्ही प्रार्थना व्यवस्थित केलेली नाहीये आणि जर तुम्ही मनापासून प्रार्थना केली असेल तर मग तुम्ही चिंता कशाला करत आहात?
कोणत्याही गोष्टीबद्दल तुम्ही विचार का करत आहात? प्रार्थना तुमचे सर्व चिंता तुमच्या सर्व दुखाना संपवून टाकेल. ज्यांच्या मनात प्रार्थना निघत नाही त्यांच्या मनात कधीही प्रसन्नता विश्वास नसतो.
काही लोक फक्त दुःखात आणि संकटात प्रार्थना करतात. फक्त ठराविक वेळी प्रार्थना करतात त्यांच्या आयुष्यातील संकट कधीच कायमची संपत नाहीत. पण जे लोकं रोज प्रार्थना करतात त्यांच्या आयुष्यातील मोठ्यातील मोठे संकट पडू शकत नाही.
तसं पाहायला गेलं तर प्रार्थना कधीही आणि केव्हाही करू शकतो आपण सकाळी आणि पहाटे केलेली प्रार्थना आपल्या आत्म्याला शांती आणि सुकून देते. पूर्ण दिवस आपल्यामध्ये एक प्रसन्नता राहते.
आज आपण परमशक्ती परमपिता परमात्मा यांच्या चरणी प्रार्थना करून अनेक काळापासून शक्तीने भरलेला आत्माने जागृत झालेली लोक करत आहेत आणि आजही करत आहे. या प्रार्थनेने कायम लोकांच्या जिंदगी मध्ये चमत्कार केलेले आहे.
आजही ही प्रार्थना लोकांच्या आयुष्यात चमत्कार करत आहे. या प्रार्थनेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एक महत्त्वाची गोष्ट, प्रार्थना करताना तुमच्या जीवनावर तेव्हाच परिणाम करेल. तेव्हा तुमच्या हृदयातील भावना या शब्दांशी जोडल्या जातील कारण बिना शब्दांचे देखील प्रार्थना केली जाऊ शकते.
करायचं म्हणून करायचं किंवा माझ्या शब्दांमध्ये भावच नाही त्या प्रार्थनेला काहीच अर्थ नाहीये. त्यामुळे ही प्रार्थना आपण रोज मनापासून नक्की करा. आता तुम्ही त्या परम शक्तीला परंपिता म्हणा परमात्मा म्हणा किंवा ईश्वर बोला कृष्णा बोला की बोला भवानी किंवा आपले स्वामी समर्थ किंवा ओंकार बोला काहीही बोला सर्वजण एकाच परमशक्ती मधील आहेत.
आपण सर्वजण मिळून त्या परम शक्तीला प्रार्थना करूया, परमशक्ती स्वरूपा परमपिता परमात्मा जीवनातील भय अशांती दुःख संकट या प्रकाराला तुम्ही दूर करा आणि आमच्या जीवनात सुखाचे आनंदाचे ज्योत लावा.
विचार आणि आत्म्याचे पवित्रता प्रदान करा. हे परमपिता परमात्मा तुम्ही पूर्ण विश्वाला सुख सेवा आणि समृद्धी प्रदान करा. तुमच्या चरणी प्रार्थना करतो कारण माझा प्रार्थनेच्या शक्तीवर पूर्णपणे विश्वास आहे.
ही का करत आहे कारण परमात्म्याने माझ्या प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर आजवर दिलेले आहे. मी प्रार्थना करत आहे कारण तुम्ही माझ्या जीवनातील प्रत्येक दिवस मला दाखवला आहे.
लोक काहीही विचार करू देत किंवा काहीही बोलू देत पण भगवंता आम्ही तुमची प्रार्थना कायम करत राहावे. ईश्वरा तुम्ही माझे प्रार्थना तेव्हा ऐकली आहे जे कामाच्या प्रार्थनेसाठी माझ्याकडे शब्द देखील नव्हते.
ईश्वरा माझ्यामध्ये इतके शक्ती द्या की माझ्या आयुष्यातील सर्व दुःखांवरती भारी अडचणींवर ती मी अगदी सोप्या पद्धतीने मात करू शकतो. माझ्या मनामध्ये एक असं समाधान आणि कृतज्ञता भरा ही माझ्या मनातील शंका आणि तक्रारी दूर होऊन जाऊदेत आणि माझे मन विश्वासाने भरून जावे.
हे ईश्वरा कळत नकळत झालेल्या माझ्या सर्व चुकांना तुम्ही क्षमा आणि माझ्यावर देखील कृपा करा कि माझे मन कायम सुख शांती आणि पवित्र तेणे भरून राहील आणि त्या पवित्र मनाने मी तुम्ही बनवलेल्या जीवांची आणि तिची सेवा करू शकेल. हे ईश्वरा माझ्याकडून कोणाचे मन दुखावलं जाऊ नये.
हे ईश्वरा तुम्ही तुमच्या दिव्य कृपादृष्टीने आणि शक्तीने आयुष्यातील दुःखांना चमत्कार करून पळवून लावला आहे. माझी प्रत्येक चांगली इच्छा सदैव पूर्ण करत आला आहात. माझ्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्ही माझी साथ दिली आहे.
माझा वारंवार तुम्हाला प्रणाम आहे. माझा वारंवार तुम्हाला प्रणाम आहे. प्रार्थना पूर्ण झालेली आहे. ही प्रार्थना रोज सकाळी सुरू होण्याआधी आणि रात्री दिवस संपण्याआधी जरूर बोलावे.
आपल्या जीवनातील प्रत्येक सकाळ या प्रार्थनेचा चावीने उघडली पाहिजे आणि प्रत्येक रात्र या प्रार्थनेचा टाळ्यानेच बंद झाली पाहिजे. माझा पूर्ण विश्वास आहे,
जो व्यक्ती ही प्रार्थना अगदी मनापासून करेल त्या व्यक्तीची प्रत्येक चांगली इच्छा पूर्ण ईश्वर करेल आणि त्या व्यक्तीचे पूर्ण दुःख संकट सर्व काही निघून जातील. फक्त डोळे बंद करून एक मिनिट ही प्रार्थना मनापासून करा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.