3 जुलै, गुरुपौर्णिमा, स्वामींसमोर बोला या विशेष ओळी, स्वामी कृपा राहील…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आषाढ महिन्यातील पौर्णिमा या तिथीला गुरु पौर्णिमा आणि व्यास पौर्णिमा म्हणतात. वेदव्यासांनी संपूर्ण मानवजातीला चार वेदांचे ज्ञान दिल्याने त्यांना प्रथम गुरुचा दर्जा देण्यात आला आहे.

अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञान आणि प्रकाशाच्या मार्गाकडे नेणारा पूजनीय व्यक्ती म्हणजे गुरु. गुरुपौर्णिमा हा भारतातील महत्त्वाचा सण आहे.

गुरुपौर्णिमा हा एक महान सण आहे जेव्हा पृथ्वीवर शुभ उर्जा विपुल प्रमाणात निवास करत असते, त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या घरात अशी दैवी शक्ती, सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर हा छोटासा उपाय करा.

भारतीय संस्कृतीत गुरूला देव मानले जाते. गुरुपौर्णिमेलाही गुरुपूजा केली जाते. भारतात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी केली जाते.

यंदाच्या गुरुपौर्णिमेची खास गोष्ट म्हणजे या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत काल देखील असणार आहे. आषाढ पौर्णिमेलाही गुरूंची पूजा केली जाते.

गुरु मंत्र प्राप्त करण्यासाठी देखील हा दिवस खूप महत्वाचा आहे. या दिवशी आपण ज्यांना आपले गुरू मानतो त्यांचा आदर केला पाहिजे आणि त्यांना नतमस्तक केले पाहिजे.

कारण त्यांनी दिलेल्या ज्ञानाने आपल्या जीवनातील अंधार नष्ट होतो आणि गुरूंच्या माध्यमातून भगवंताची प्राप्ती होते. गुरूंनी दिलेल्या ज्ञानाच्या साठ्यानेच आपण जीवनाच्या प्रत्येक मार्गावर यशस्वीपणे चालतो.

गुरु-शिष्यांची ही परंपरा प्राचीन काळापासून आजतागायत सुरू आहे. या दिवशी केवळ गुरूच नव्हे, तर कुटुंबातील प्रत्येक ज्येष्ठ सदस्य, आई-वडील आणि जीवनातील कठीण प्रसंगी साथ देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गुरूचा दर्जा देऊन त्यांचे आभार मानले पाहिजेत.

या दिवशी गुरुपौर्णिमेसाठी हा खास उपाय घरीच करावा. या दिवशी आपण स्वामी समर्थ महाराजांची अखंड भक्ती केली पाहिजे.

सकाळी लवकर उठून स्नान करून गुरूंच्या प्रतिमेची पूजा करावी. या प्रतिमा पूजेला घरबसल्या सुंदर बनवा.

गुरूंच्या प्रतिमेवर फुले, हार, अक्षतवाह, गंध, फुले याप्रमाणे अक्षतवाहही अर्पण करावा.

गुरुसमोर आरती करावी, रांगोळी काढावी, शक्य असल्यास समई करावी. सकाळपासून मध्यरात्री 12 पर्यंत चालेल अशा पद्धतीने देवघरात आणखी एक विशेष काम करावे.

नवरात्रीत हा दिवा जसा अखंड जळतो, तसाच आता एक दिवस जाळायचा आहे. त्यामुळे घरातील मंदिरात हा दिवा जरूर लावा.

स्वामी मंत्राचा जास्तीत जास्त जप करा. या दिवशी ही तिथी अत्यंत शुभ मानली जाते.

श्री स्वामी समर्थाय नमः मंत्राचा किमान १००८ वेळा जप करा. गुरुचरित्राचे पठण करावे किंवा 14वा अध्याय तरी वाचावा.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!