नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते , दिवाळी जवळ आली आहे, सध्या सर्वजण खरेदी करण्यासाठी बाहेर पडत असेल, घराची स्वच्छता करत असाल तर तुम्ही खरेदी करतेवेळी ही 1 वस्तू आणायला विसरू नका.
दिवाळी म्हणजे सण आनंदाचा, सण उत्सवाचा यावेळी माता लक्ष्मीचे आगमन प्रत्येक घरी होत असते. अशावेळी घरातील या वस्तूंचे असणे फार महत्वाचे ठरते. म्हणून दिवाळी येण्याच्या आधी घरात एक वस्तू नक्की आणा,
साक्षात त्या वस्तूमध्ये लक्ष्मी माता येईल. तुमच्या घरातील तुमच्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहील. घरांमध्ये सुख-समृद्धी नांदते.
घरामध्ये पैसा टिकत नसेल तर पैसा कधीच कमी पडणार नाही. आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते, प्रत्येक कामात आपले अखंड लक्ष्मीचे संकेत राहतात. यासाठी दिवाळी येण्याच्या आधी ही वस्तू आणणे गरजेचे आहे.
काहीच दिवसांमध्ये दिवाळी येईल, कोजागिरी नंतर लगेच दिवाळीचे वेध लागतात. तीन वस्तू आहेत, त्या तीन मधून तुम्हाला कोणतीही एक वस्तू फक्त एकच घरात आणायचे आहे . लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्या वस्तूचे पूजन करायचे आहे.
त्या वस्तूला आपण आपल्या तिजोरीत गल्ल्यात दुकानात ऑफिस मध्ये कोठेही स्थापन करू शकता किंवा देवघरात सुद्धा त्या वस्तूला स्थापन करू शकता आणि मनोभावे त्या वस्तूचे पूजन करायचे आहे.
पहिली वस्तू आहे ते म्हणजे श्रीयंत्र, जर तुमच्या घरात श्रीयंत्र असेल तर तुम्ही आणायची गरज नाही, त्याच श्रीयंत्राचे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजन करायचे. दुसरी वस्तू आहे ती म्हणजे लक्ष्मीची छोटीशी मूर्ती.
मग ती चांदीची, पितळाची, तांब्याची कोणत्याही धातूची असू शकते. तर ती मूर्ती तुमच्या घरात आधीपासूनच लक्ष्मी मातेची मूर्ती आहे तर तुम्हाला ती मूर्तीसुद्धा आणण्याची गरज नाही. त्याच मूर्तीचे पूजन लक्ष्मी पूजनाच्या दिवशी करायचे आहे.
तिसरी आहे चांदीचा शिक्का , यावर गणपती आणि लक्ष्मी कोरलेले असतात . खास करून दिवाळीमध्ये मिळतात . तुम्ही एक छोटासा चांदीचा शिक्का आणायचा आहे. ज्यावर लक्ष्मी माता आणि गणपती महालक्ष्मी माता असेल.
तसेच खासकरून, धनतेरसच्या दिवशी आणावा. कारण असे समजले जाते की, या गोष्टींना आपल्या घरात लक्ष्मी येते, तसेच धन आणि संपत्ती येते. चांदीचा शिक्का घेतानाही गोष्टीची काळजी घ्यावी,
त्या शिक्क्यावर माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पा असायला पाहिजे. आज-काल दिवाळी येण्याआधीच असे शिक्के बाजारात येत असतात की, त्याच्यावर लक्ष्मी माता आणि गणपती विराजमान असतात.
हे तुम्हाला बाजारपेठमध्ये उपलब्ध केले जातात, तर तुम्ही धनतेरसच्या दिवशी किंवा त्या आधीही तुम्ही असा शिक्का विकत घेऊ शकतात आणि धनतेरस लक्ष्मीपूजनला त्याची पुजा करू शकतात
आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी त्याची पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला लगेच आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यावे किंवा तुमचे दुकानातील बिजनेस असेल तर त्याच्या गल्ल्यांमध्ये ऑफिसच्या तिजोरीत सुद्धा तुम्ही तो शिक्का ठेवू शकता.
तीन वस्तूंमधून तुम्ही ठरवा की तुमच्याकडे वस्तू आहे की नाही तुमच्याकडे नसेल तर ती एक वस्तू आणायची. बहुतेक लोकांच्या घरात लक्ष्मीची मूर्ती असतेच, तुमच्या घरात जर श्रीयंत्र नसेल तर दुसर यंत्र आणा,
चांदीचा शिक्का नसेल तर तो आणा, तुम्ही आणायचे आहे आणि आणल्यानंतर ठेवून द्यायचा आहे. एका ठिकाणी त्याची स्थापना करायची पण फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायची आहे. तुम्ही आता पॅकिंग आणणार ,
आल्यानंतर कुठेतरी कपाटात कुठे तरी व्यवस्थित जागेवर ठेवून द्या आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याला बाहेर काढा. त्याचे दुधाने पाण्याने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजन करा आणि मग देवघरात ठेवून तुम्हाला रोज जसे इतर मूर्तीचे पूजन करायचे आहे तसे करा.
अशा रितीने ही वस्तू दिवाळी येण्याच्या आधीच तुम्हाला आणायची आहे हे लक्षात ठेवायचं. याचा परिणाम असा होईल की घरात सुख,समृद्धी,ऐश्वर्य नांदेल,भरभराट होईल कारण या तीनही वस्तू माता लक्ष्मीच्या अतिशय प्रिय आहेत त्यामुळे तुमच्या जीवनात मांगल्य व माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहील.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजला आताच फॉलो करा.