रात्री झोपताना पायाला लावा हे तेल, अप्रतिम फायदे…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री झोपताना अनेक वेळा तणावामुळे झोप येत नाही आणि आली तरी पुन्हा पुन्हा झोपमोड होते.

अनेकदा यासाठी तुमच्या कामासोबतच ग्रह आणि नक्षत्रही याला जबाबदार असतात. ज्योतिष शास्त्रानुसार रात्री झोप वारंवार तुटत असेल तर त्याचा संबंध राहूशी आहे.

तसेच, जर शुक्र त्याच्या दुर्बल राशीत म्हणजेच कन्या राशीत असेल किंवा बाराव्या स्थानी अशुभ ग्रहांनी त्रस्त असेल तर अशा व्यक्तीला चांगली झोप येत नाही.

यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने तुम्ही रात्री पुन्हा पुन्हा होणाऱ्या झोपमोडीच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता.

ज्योतिषशास्त्रानुसार रात्री झोपण्यापूर्वी डोक्याखाली मुळा आणि पाणी ठेवा. यानंतर सकाळी एका भांड्यात पाणी टाकून शिवलिंगाला मुळा अर्पण करा. यामुळे प्रतिकूल ग्रहांचा प्रभाव दूर होईल, ज्यामुळे मानसिक शांती मिळेल आणि झोपही चांगली लागेल.

चांगली झोप येण्यासाठी पलंगाखाली स्वच्छता ठेवा. पलंगाखाली घाण, शूज, चप्पल, विजेच्या वस्तू असू नयेत. आजकाल, बॉक्स बेडचा ट्रेंड बनला आहे, त्यामुळे लोक त्यात निरुपयोगी गोष्टी देखील भरतात.

ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि राहूला शक्ती मिळते. याशिवाय बेडवर तुम्हाला अस्वस्थ वाटते आणि मनात विविध प्रकारचे विचार येतात, त्यामुळे झोप डोळ्यांपासून दूर राहते. जरा झोप लागली तर अचानक तुमची झोप उघडते.

राहूचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी, आठवड्यातून किमान एकदा गादी, उशीला ऊन दाखवा. शक्य असल्यास, बेडशीट किमान दोन दिवसांनी बदलत राहा.

तसेच झोपण्यापूर्वी हात-पाय धुवा आणि पायाच्या तळव्यावर तेलाची मालिश करा. असे केल्याने राहूचा दोष दूर होतो आणि स्वच्छ पलंगावर झोप चांगली येते.

झोपताना बेडरूममध्ये चंदनाचा सुगंधाचा फवारा करू शकता किंवा चंदनाचा सुगंध असलेली कोणतीही वस्तू वापरू शकता.

चंदनामुळे राहू दोष आणि राहूचा प्रभाव दूर होतो. तसेच, राहूची दशा चालू असेल तर चंदनाचा साबण आणि अगरबत्ती वापरावी, असेही सांगितले आहे.

जर तुम्हाला झोपेमुळे त्रास होत असेल किंवा रात्री पुन्हा पुन्हा झोपमोड होत असेल तर ते कुंडलीतील राहूच्या कमकुवत स्थितीमुळे होत आहे.

यासाठी जवाचे काही दाणे रात्री डोक्याजवळ ठेवा. यानंतर, सकाळी ते एखाद्याला दान करा. तुमची इच्छा असल्यास, कबुतरांना देखील खायला देऊ शकता. असे केल्याने झोपेशी संबंधित समस्या दूर होतील.

बैठ्या जीवनशैलीमुळे पायांच्या स्नायुंची पुरेशी हालचाल होत नाही. दिवसभर पायात घट्ट बूट, सॅण्डल घातल्याने, उंच टाचेची पादत्राणे वापरल्यानं पायाकडील रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात.

त्यामुळे पायांचे स्नायू दुखावतात. पाय, पोटऱ्या, घोटे , टाचा दुखतात. यावर उपाय म्हणून रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट तेलानं किमान दहा मिनिटं पायांच्या तळव्यांना मसाज केल्यास पायाकडील रक्तप्रवाह सुधारतो.

संपूर्ण शरीरातील पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा होतो. निरोगा आरोग्यासाठी रोज रात्री पायांच्या तळव्यांना तेलाचा मसाज करणं आवश्यक आहे.

दिवसभर बसून, उभं राहूण, चालून शरीर थकतं, शरीराच्या विविध स्नायुंवर ताण येतो. पायही सूजतात. हा थकवा, ताण घालवण्यासाठी, पायाला आलेली सूज कमी करण्यासाठी पायाच्या तळव्यांना तेलाचा मसाज करावा.

रात्री झोपण्यापूर्वी पायाला मसाज केल्यास रक्तप्रवाह सुधारतो. दिवसभराचा थकवा निघून जाऊन रात्री शांत झोप येते. शांत झोपेसाठी पायांच्या तळव्यांना तेलाचा मसाज आवश्यक आहे.

शरीर दुखत असल्यास, एखाद्या अवयवाचे स्नायू दुखत असल्यास पायांच्या तळव्यांना तेलाचा मसाज करावा. पायाच्या तळव्यांना तेलाचा मसाज केल्यास मानदुखी, डोकेदुखी, पाठदुखी, मायग्रेन या वेदनांवर आराम मिळतो.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!