नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, जेव्हा आपण रात्री झोपताना स्वप्नलोकात प्रवेश करतो, तेव्हा त्यावर आपले नियंत्रण नसते. स्वप्ने आपल्याला कधीही कुठेही घेऊन जातात. कधी स्वप्ने आपल्या आवडीची असतात तर कधी आपली नावडती असतात.
जेव्हा जेव्हा स्वप्नात एखादी वाईट गोष्ट दिसते तेव्हा बरेचदा आपले मन काही वाईट गोष्टींच्या भीतीने घाबरते, परंतु स्वप्न चांगले की वाईट याचे संकेत वेगळे असतात. कितीतरी पक्षी आपल्या आसपास फिरत असतात.
काही पक्षी दिसणे शुभ मानले जाते, काही पक्षी शुभ संकेत देतात, अनेक लोकांना याची प्रचिती सुदधा आलीय. जसे की कुंभार कावळा दिसल्यास काही वेळात शुभ वार्ता कानी पडते.
संत ज्ञानेश्वरानी कावळा ओरडताना त्याच्यावरती अभंग लिहिला व त्याच्यानुसार असा संकेत मानला की भगवान पांडुरंग त्यांच्या भेटीला येत आहे व त्याचीच तयारी तयार करत आहेत.
आपल्या धर्म शास्त्रात कावळा आपल्या घराजवळ ओरडल्याने शुभ मानले आहे. काहीतरी दैवी शुभ संकेत मानला जातो. तसेच घरातील पितृचे प्रतिक म्हणून सुद्धा कावळ्यांना मानले जाते.
आपल्या संस्कृतीत पितरांना फार महत्व आहे, जर पिंडाला कावळा शिवला नाही तर पितरांना मुक्ती मिळत नाही असे मानले जाते. पितृपक्षात सुद्धा कावळ्यांचे महत्व फारच असते, त्या दिवसात कावळ्यांना खायला दिल्याशिवाय आपण जेवत नाही.
एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर १२ दिवसांचे कार्य केले जाते. यामध्ये मृत व्यक्तीच्या नावाने पिंडदान केले जाते. १० व्या दिवशी पिंड ठेवले जातात आणि काकस्पर्शाची वाट पाहिली जाते.
तेथे काकस्पर्श झाल्यास पूर्वजांनी आपण ठेवलेल्या अन्नाचे ग्रहण केले, असे मानले जाते. अन्यथा मृत पावलेल्या व्यक्तीच्या काही इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत,
असे मानून ते पूर्ण करण्याचा संकल्प बोलून दाखवला जातो. दिवसवाराप्रमाणे श्राद्ध तर्पण विधी करतानाही कावळ्याचा काकबळी काढून ठेवला जातो.
जेव्हा स्वप्नात एखादा कावळा मिठाई खात असल्यास आपल्याला लवकरच धन प्राप्ती होणार आहे. आपल्या घरात आर्थिक अडचण दूर होणार आहे. जर आपल्या डोक्यावरून केस ओढत एखादा कावळा गेला तर तो येणाऱ्या काळात येणाऱ्या संकटाचे संकेत देतो.
जर एखाद्याच्या पगडीवर कावळा घाण करत असेल तर त्याच्या घरी लवकरच संतान प्राप्ती होणार आहे. जर शनिवारी घरावरती बसून कावळा सतत ओरडत असेल तर ते शुभ मानले जाते.
एखादी शुभ बातमी लवकरच तुम्हाला कळणार आहे हे तुम्हाला संकेत असतो. घरावरती किंवा घराबाहेर जर 2 कावळे भांडत असतील तर त्या घरात लवकरच अचानक अडचणी येणार आहेत.
गच्चीवर किंवा छतावर जर कावळा मृत आढळला तर घराच्या विनाशाला सुरुवात होते. एखादा दागिना जर कावळ्याने उचलून घेऊन गेला ते दुर्भाग्य लक्षण मानलं गेलंय.
तसेच नोकरीच्या शोधात जात असताना घाणीवरती एखादा कावळा दिसला तर ते शुभ मानले जाते. सकाळी सकाळी अविवाहित मुलीच्या डोक्यावरून कावळा उडून गेला तर तिचा विवाह योग जवळ आला आहे.
तिचे लवकरच लग्न होण्याची वेळ जवळ आली आहे. कावळा जर नवविवाहित मुलाच्या डोक्यावरून सतत घिरट्या घालत असेल तर त्या तरुणाला पुत्रप्राप्ती होणार असल्याचा संकेत आहे.
जर एखाद्या बेरोजगार व्यक्तीला स्वप्नात कावळा दही खाताना दिसला तर त्याला लवकरच रोजगार मिळतो. स्वप्नात कावळा लोणी खाताना पाहणे खूप शुभ मानले जाते.
असे मानले जाते की कावळा लोणी खाताना दिसल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मोठा आर्थिक लाभ होतो. जर एखाद्या आजारी व्यक्तीला स्वप्नात कावळा दही खाताना दिसला तर त्याला लवकरच आरोग्य सुधारेल.
जर कावळा डोक्यावर घासून गेला तर सावधान, मोठं संकट मग ते मृत्यूचं देखील असू शकतं, यावेळी महामृत्युंजय मंत्राचा जप करा.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.