नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, शुभम भवतु….तुळशीच्या ज्या काही काड्या असतात या काड्यांचा या वाळलेल्या काड्या या रोपट्याला कोणतीही इजा न पोहोचता आणि न पोहोचता अगदी व्यवस्थित काढून घ्या.
या वाळलेल्या लाकडामध्ये अनेक दैवी गुणधर्म आहेत. या लाकडांची आपण बारीक पूड करून घ्यावी. यासाठी मिक्सर ग्राइंडर चा वापर आपण करू शकता. तुळशीला हिंदू धर्म शास्त्राने माता असे म्हटलेल आहे.
भगवान श्रीहरी श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच तिला विष्णुप्रिया हरिप्रिया असं म्हटलं जातं. ज्या घरात दररोज माता तुळशीची मनोभावे पूजा दररोज सायंकाळी तुळशीसमोर दिवा लावला जातो त्या घरात सुख-समृद्धी नेहमी नांदते.
तुळशीच्या काड्यांची बारीक पावडर तयार करायचे आहे. बाजारामध्ये किंवा एखाद्या मंदिराशेजारी एखाद्या पूजेच्या दुकानात गोपीचंदन नक्की मिळेल.
गोपीचंदन हा चंदनाचा एक खडक जो भगवान श्रीहरी श्री विष्णूंना श्रीहरी ना अतिशय प्रिय आहे. असं थोडंसं गोपीचंदन आपण घ्या आणि ही तुलसी पावडर पुढे त्या गोपीचंद मध्ये व्यवस्थित मिसळून दररोज भगवान श्रीहरी श्री विष्णूंना या मिश्रणाने आपण तिलक करा.
याचा छोटासा तिलक आपण हळदी कुंकू लावतो अगदी त्या प्रकारे गोपी चंदन मिळून ही पावडरचे मिश्रण थोडासा तिलक भगवान श्रीहरींना आपण करायची.
जेव्हा जेव्हा आपण देवपूजा करत आहे ही देवपूजा करताना श्रीहरीना करा. भगवान श्रीहरी विष्णू ची मूर्ती तस्वीर किंवा प्रतिमा फोटो जर तुमच्या घरात नसेल तर ती नक्की स्थापित करा.
कारण भगवान विष्णू जगाचे पालनहार आहेत. सृष्टी कर्ता आहेत. ज्या व्यक्तींचा मृत्यू होतो त्यांना आपण म्हणतो याच्या आत्म्यास शांती प्रदान करण्याचे काम मुक्ती देण्याचे काम पितृ देवता म्हणून प्रत्यक्ष भगवान श्रीहरी श्रीविष्णूस करत असतात.
आणि म्हणून त्यांचे पूजन हे फार महत्त्वाचं ठरतं. म्हणून आपण त्यांच्या मस्तकी हा एक छोटासा तिलक करायचा आहे आणि हा तिलक केल्यानंतर आपल्या घरात जितक्या व्यक्ती आहेत आपल्या स्वतः सकट स्त्री असो वा पुरुष असो प्रत्येकाच्या मस्तकी आपण नक्की करा.
या मुळे जन्मो जन्मीचे पाप आणि कष्ट नष्ट होतात. आपल्या हातून कळत नकळत अशा अनेक चुका होतात. पाप कर्म घडतात आणि त्यातून मुक्ती मिळवण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.
ज्यांना हे दररोज करणे होणार नाही त्यांनी किमान प्रत्येक गुरुवारी तरी हा उपाय अवश्य करावा. गुरुवारचा उपाय हा भगवान श्री श्री विष्णूंचा वार आहे.
सोबतच जर एखाद्या व्यक्तीला खूप राग येतो खूप रागीट व्यक्ती आहे चिडचिड करते किंवा एखादी व्यक्ती सतत दुःखी राहते सतत चिंता करते डिप्रेशनमध्ये आहे.
किंवा कामामध्ये प्रत्येक गोष्टीत सतत अपयशी राहते तर अशा व्यक्तींना सुद्धा आपण हे जे मिश्रण आहे याचा छोटासा तिलक त्याच्या मस्तकी केलं की लाभदायक ठरेल.
भगवान श्री हरी विष्णूंच नामस्मरण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकता. डोकं काम करत नाही किंवा बुद्धी चालत नाही अशा लोकांनी सुद्धा हा उपाय करायला हरकत नाही.
अतिशय साधा सोपा उपाय , जेव्हा जेव्हा तुमच्या अंगणातील तुळस सुकून जाईल किंवा वाळून जाईल तर त्याच्या काड्या आहेत त्या फेकून देऊ नका तर त्याच्यामध्ये व्यवस्थित पावडर बनवून देऊ शकता.
आणि तिचा वापर जसा सांगितलं ना त्या प्रकारे करू शकता. अत्यंत छोटासा उपाय आहे आशा आहे की हा उपाय आपल्या घरी नक्की करा.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.