नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, आपले कुटुंब सुखी आणि सुरक्षित रहावे हे कोणाला नाही वाटत. सगळ्यांनाच वाटतं की आपल्या परिवाराचे लोक सुरक्षित राहावेत. सुखी-समाधानी राहावेत.
घरी आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असावा. शांततेत आपले कुटुंब जगावं. असं प्रत्येकाला वाटतं पण आपण आपले कुटुंब सुखी आणि सुरक्षित राहण्यासाठी जीवापाड प्रयत्न करतो त्याच्यासाठी तर आपण काम करतो,
कमावतो परंतु यावेळी देवाचे नाव घेणे, देवाची सेवा करणे, देवाची साधना उपाय करणे सुद्धा गरजेचे असते कारण पैसा कमावून किंवा काम करून आपण सुरक्षित आणि सुखी राहू शकतो असं काहींना वाटतं पण त्यासाठी देवाचा आशीर्वाद सुद्धा हवा.
आपले कुटुंब सुखी आणि सुरक्षित राहण्यासाठी फक्त रोज संध्याकाळी तुम्हाला एक काम करायचा आहे. रोज आपण देव पूजा करतो, देवासमोर दिवा लावतो त्या वेळेस तुम्हाला फक्त हे एक काम करायचा आहे.
हे काम केल्याने आपला संपूर्ण परिवार सुखी राहील, सुरक्षित राहील, समृद्ध राहील, शांततेत राहील आणि आनंदी देखील. आपल्याकडे स्वामी समर्थांची नित्यसेवा स्वामी समर्थांची नित्यसेवा ही पोथी असेल तर त्यामध्ये कालभैरवष्ट्क आहे ते देवा समोर बसून एक वेळेस रोज संध्याकाळी वाचायचे आहेत.
दिवा,धूप, अगरबत्ती सात वाजता लावायची त्यानंतर कालभैरव अष्टक कोणत्याही व्यक्तीने वाचले तरी चालते. कालभैरव अष्टक वाचून झाल्यानंतर अगरबत्ती लावली पाहिजे, प्रत्येक सदस्यांच्या कपाळी टिळा लावायचे आहेत.
संध्याकाळी कालभैरवाष्टक वाचून झाल्यानंतर लगेचच ते प्रत्येकाच्या कपाळी लावायचे आहे आणि हे न चुकता रोज संध्याकाळी तुम्हाला काम करायचा आहे.
कालभैरवअष्टक च्या 11 आवर्तनं केल्याने काहींची हरवलेली मुले,मुली घरी सुखरूप आल्याचे,काहींचे न मिळणारे पैसे ( मोठी रक्कम) परत मिळाल्याचे,सासू सासरे , पती वैगरे स्त्रीला त्रास देताना त्या त्रासातून सुटका केल्याचे,वाईट धमकी तून प्रामाणिक माणसाची सुटका केल्याचे,
बाधे मुळे नोकरीवर अकस्मात न जाणाऱ्या माणसांना नोकरीवर जाण्यास प्रवृत्त करणे,मुलांची,महिलांची ,माणसांची भीती नाहीशी करणे असे विविध अनुभव लोकांना आलेले आहेत.
संकट काळी ,मृत्यू गंडांतर समयी संरक्षण करणे या देवतेचे ब्रीद आहे,त्यामुळे हल्लीच्या धावपळीच्या,धकाधकीच्या युगात स्व संरक्षणासाठी सर्वांनी विशेषतः महिलांनी दररोज 1 वेळा तरी हे काल भैरव अष्टक म्हणून आपणा भोवती काल भैरव या देवतेचे संरक्षण कवच प्राप्त करून जीवनात सुखी आणि यशस्वी व्हावे.हे स्तोत्र रात्री झोपण्यापूर्वी एक वेळा तरी म्हणावे.
महान गंभीर संकटाचे वेळी या स्तोत्राचे रोज 11 किंवा 108 पाठ श्रद्धापूर्वक करावे.पाठ सुरू करण्यापूर्वी पाठ कशासाठी करीत आहोत, त्याचा विधीवत संकल्प सोडावा.संकटमुक्तीचा मार्ग निश्चित सापडतो.
याने तुमचे कुटुंब सुखी सुद्धा राहतील आणि समाधानी आणि सुरक्षित राहतील. भैरवाचे नामस्मरण केल्याने अनेक रोगांपासून मुक्ती मिळते. ते मुलाला दीर्घायुष्य देतात. जर तुम्ही भूत, अडथळे, तांत्रिक कामांमुळे त्रस्त असाल तर शनिवारी किंवा मंगळवारी घरामध्ये भैरव पठण करून सर्व त्रास आणि संकटांपासून मुक्ती मिळवू शकता.
आपण दत्त सेवा सोपी रीतीने करू शकतो. दत्त गुरूंचा, स्वामींचा फोटो नसेल तर घरी घेऊन या.घरी आणि रोज नित्य सेवा करत चला. सकाळी संध्याकाळी पूजा, धूप दीप नैवेद्य,आरती स्तोत्र बोलावे.
मनोभावे प्रार्थना करावी. पूर्ण श्रध्देने शरण जावे. तसेच आपल्या घरादाराच्या सुखासाठी मागणे मागावे. असे जर रोज न चुकता करत रहाल तर यश मिळेल. जरी कितीही त्रास झाला,अडथळे आले तरी सेवा चुकायची नाही. कारण देव आपली परीक्षा पाहत असतो.
जर तुम्ही कुंडलीतील मंगळ दोषांमुळे त्रस्त असाल तर भैरवाची पूजा केल्याने पत्रिकेतील दोषांपासून सहज सुटका होऊ शकते. राहू केतूच्या उपायांसाठीही त्यांची पूजा करणे चांगले मानले जाते.
भैरवाच्या पूजेमध्ये गोड इमरती, दही, दूध आणि काळ्या उडीद, उडीद यांचा सुका मेवा अर्पण केल्यास भैरव प्रसन्न होतो.
भैरव आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतो आणि त्यांच्या आशीर्वादाने त्यांचे कर्म सिद्धी देतो. भैरव पूजेने लवकर फळ मिळते तसेच क्रूर ग्रहांचा प्रभाव नाहीसा होतो. शनि किंवा राहू ग्रस्त व्यक्तीने शनिवार आणि रविवारी कालभैरव मंदिरात जावे. त्यामुळे त्याचे सर्व काम सुरक्षितपणे पूर्ण होते.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.