शुक्रवारी उशीखाली ठेवा ही 1 वस्तू, माता लक्ष्मी होईल प्रसन्न, 24 तासात मोठा धनलाभ... - Viral Marathi

शुक्रवारी उशीखाली ठेवा ही 1 वस्तू, माता लक्ष्मी होईल प्रसन्न, 24 तासात मोठा धनलाभ…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आपली भरभराट व्हावी, घरात अनेकविध धनाचे स्रोत यावेत, घरात नेहमी धन संपदा असावी असे नेहमीच सर्वांना वाटत असते.

प्रत्येकाला आपली परिस्थिती चांगली असावी, सर्व सुख समृद्धी घरात असावी असे वाटते, तसे प्रयत्नही खूप जण करतात पण बऱ्याचदा अपयश येते, त्याची कारणे आपल्या वास्तू शास्त्रात,

ज्योतिष शास्त्रात, भविष्य शास्त्रात सांगितली आहेत, जर आपण त्याप्रमाणे उपाय केले तर नक्कीच आपली प्रगती होईल व तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. माता लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरात नेहमी रहावे,

आपल्यावर सदैव तिची कृपा बरसावी यासाठी शुक्रवारी हे छोटे छोटे उपाय नक्की करावेत. घरातील धन, पैसा यांची सफाई आठवड्यातून एकवेळ करावी व शुक्रवारी त्याची पूजा करावी.

शुक्रवार हा देवी लक्ष्मी चा असतो, माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण बरेच उपाय करत असतो. त्यानुसार आपल्याला फलप्राप्ती होते. सर्व ग्रहांमध्ये शुक्र ग्रह हा सर्वात चमकदार ग्रह आहे.

जीवनातील यश, कीर्ती, आकर्षण यांच्याशी फार जवळच संबंध या ग्रहाचा असतो. म्हणून शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करून प्रसन्न करून घेतले जाते व त्यामुळे शुक्र ग्रह मजबूत होतो.

शुक्रवारी लवकर उठुन माता लक्ष्मीची पूजा करा व प्रार्थना करा. तसेच कमळाचे फुल किंवा कोणतेही लाल रंगाचे फुल मातेला अर्पण करा. घरात धन येत नसेल, बरकत येत नसेल, पैसा टिकत नसेल ,

नोकरी मध्ये, व्यवसायात पाहिजे तसे काम होत नसेल तर शुक्रवारी काळ्या मुंग्यांना साखर खाऊ घाला, तुम्हाला बढती मिळेल, व्यवसायात एखादी मोठी ऑर्डर मिळेल. शक्य असल्यास पांढऱ्या रंगाचे वस्त्र धारण करा,

पांढऱ्या वस्तू दान करा, जसे की तांदूळ, दूध, दही, पांढरी फुले, पांढरी मिठाई इ. जमलं तर वैभव लक्ष्मीचं व्रत संकल्प करून करा. माता लक्ष्मी तुमची इच्छा नक्की पूर्ण करेल.

तसेच यादिवशी देवघरातील लक्ष्मीच्या मातेची पूजा करा, धने अर्पण करा, श्री सूक्त, लक्ष्मी मंत्र जप करा. यामुळे माता लक्ष्मी घरात वास करेल. तसेच सायंकाळी कधीही झोपू नका,

घरात वाईट, अपशब्द बोलू नये, आपलं काम प्रामाणिक पणे करा ज्यामुळे माता लक्ष्मी सदैव घरी वास करेल.रात्री झोपताना उशीखाली तुळशीचे पान ठेवा, सकाळी ते पान परत बागेत मातीत टाका. यामुळे मातेचा वास आपल्या जीवनावर राहील.

आपल्याला मेहनतीच्या बरोबर नशिबाची साथ मिळाली पाहिजे असं सर्वांना वाटते. त्यामुळे आपण करत असणाऱ्या कामात यश मिळावे, आपली भरभराट व्हावी, घरी धनसंपदा वाढावी यासाठी माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर असणे गरजेचे असते.

माता लक्ष्मीचा आवडता वार म्हणजे शुक्रवारी आपण जर माता लक्ष्मीची पूजा केली तर आपल्याला वैभव प्राप्त होते. हे काही उपाय जर आपण शुक्रवारी केले तर माता लक्ष्मीची कृपा दृष्टी आपल्यावर राहते. आपल्याला जरी धनप्राप्ती झाली तरी ते धन टिकून राहावे यासाठी हा खास उपाय केला जातो.

माता लक्ष्मीच्या वारा दिवशी म्हणजेच शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला गाईच्या तुपाचा दिवा आपल्या घरात लावायचा आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीची पुजा करायची आहे. या पूजेमध्ये विशेषतः लाल रंगाचे फुल माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे.

पूजेचा प्रसाद म्हणून गूळ आणि दूध या पासुन बनवलेला कोणताही पदार्थ अर्पण करावा. याने माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते आणि जर या पूजेमध्ये लक्ष्मी यंत्र , श्री यंत्र किंवा कुबेर यंत्र अशा सर्व प्रकारची यंत्रपुजा करावी.

हिंदु शास्त्रानुसार अशी यंत्रपूजा केल्यास आपल्याला धन प्राप्ती होते आणि तसेच घरामध्ये सुख नांदते. आपल्या घरच्या देव्हाऱ्यात किंवा ईशान्य कोपऱ्यात श्रीयंत्र स्थापन करून त्याची नियमित पुजा करायची आहे. माता लक्ष्मी बरोबर भगवान कुबेर यांनाही धनाचा राजा मानले जाते.

हिंदू धर्मातील पुराणानुसार भगवान श्री कुबेर हे सर्व धनाचे राखणदार आहेत असे सांगितले जाते. त्यामुळे कुबेर देवता आपल्याला जर प्रसन्न झाली तर धनाची कमतरता पडत नाही.

कुबेर देवतेची पूजा करणे हा देखील धन प्राप्तीचा एक मार्ग आहे. शुक्रवारी माता लक्ष्मीच्या कोणत्याही एक मंत्राचा जप किमान 11 वेळा किंवा त्यापेक्षा जास्त करावा. हा उपाय तुम्ही नियमित केल्यास तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

आपण कधीही कोणाच्या धनावर वाईट नजर ठेवू नये. कोणाचीही संपत्ती किंवा धन हिरावून घेऊ नये आणि जास्तीत जास्त दान करावे. या सर्व गोष्टी माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत. || जय माता लक्ष्मी ||

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!