नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, परिसरातील अस्वच्छता कीटक वाढीस पोषकता बनते व तीन ऋतूंमध्ये ही पावसाळ्यात दमट हवामानात कीटकांची पैदास ही जास्त होते. यामुळे धान्य, गोठ्यातील जनावरे, घरी सर्वत्र रोगराई पसरते व आपण अक्षरशः हैराण होतो. तसेच घरी झुरळ,पाली, मच्छर जर खूप झाले तर साथीचे भयानक रोग पसरतात शिवाय विषबाधा झाली तर अजूनच धोकादायक.
यासाठी केमिकल्स वापरून बनवलेले प्रॉडक्ट काही काही वेळेस त्रासदायक ठरू शकतात,त्याचा संसर्ग होई शकतो. म्हणून सोपे व आयुर्वेदिक उपाय केले असता उपद्रव कमी होऊ शकतो. आयुर्वेदात असणारी अतिउच्च दर्जामधील एक वनस्पती म्हणजे कडुलिंब, ज्याचे आपल्या घराच्या परिसरात असणे अतिशय चांगले मानले जाते. ज्यामुळे प्रदूषण होत नाही, ऑक्सिजन पातळी वाढते, परिसर अतिशय स्वच्छ राहतो.
कडू लिंबाचे झाड, निंब व नीम या नावांनी देखील ओळखले जाते.कडुनिंबाच्या विविध भागांमध्ये मागोर्सान, निबिडिन, सोलानिन, निबिन, निबिस्टेरॉल आणि टॅनिन अशी अनेक उपयुक्त रसायनं आहेत. कडुनिंबाच्या बियांना निंबोण्या किंवा लिंबोळ्या म्हणतात. त्यात ५ टक्के अखाद्य तेल असतं.
ते उद्दीपक आणि जंतुनाशक आहे. नायटा, व्रण, खरुज आदी त्वचारोगांवर आणि संधिवातावरही ते गुणकारी आहे. या वृक्षापासून उत्तम प्रकारचा डिंकही मिळू शकतो. अमेरिकेतल्या संशोधकांनी नीम तेलापासून एक इमल्शन करण्याचं पेटंट घेतलंय. या उपायासाठी याच लिंबोळ्या लागणार आहेत.
या लिंबोळ्या गोळा करून उन्हात वाळवून घ्या व त्याच चूर्ण करावे. चूर्ण झाल्यावर गॅस वरती नारळाच्या तेलाचे 3 ते 4 चमचे घेऊन गरम करा व त्यात 1 ते 2 चमचे हे चूर्ण मिक्स करा व परत 1 चमचा नारळ तेल घालून चांगलं गरम करावे.
तेल साधारण गरम असतानाच त्या तेलाचा दिवा तुम्हाला जिथे डास जास्त आहेत, माशा, किडे, पाली उपद्रव जास्त वाटतो अशा ठिकाणी ठेवा व त्यानंतर त्वरित परिणाम पहा, पाली जवळ येणार नाहीत, कीटक मरून पडतील.
त्रासातून तुमची सुटका होईल. तसेच हा दिवा एक स्वच्छ वातावरण निर्माण करत असल्याने सकारात्मक ऊर्जा राहते, तसेच यामुळे कीटकांचा उपद्रव नसल्यामुळे चिंतामुक्त जीवन होईल. कडू लिंबाच्या झाडांचे अनेक उपयोग असून त्याचा प्रत्येक भाग उपयोगी आहे.
डासांना तसेच कीटकांना पळवून लावण्यासाठी त्याच्या पानांचा उपयोग पूर्वीपासून होत आहे. खोडाची तसेच मुळाची साल कडवट असून रक्तस्त्राव थांबविण्यासाठी उपयुक्त आहे. खोडातून पाझरणारा डिंक औषधी असून त्वचारोगावर वापरतात. याच्या डिंकाचे लाडू बाळंतपणात देण्यात येतात.
पाने वातशामक व मूत्रल असून त्यांचा उपयोग श्वासनलिकांमधून स्त्रवणारा कफ कमी करण्यासाठी होतो. पानांचा काढा हिवतापावर उपयोगी असून यकृताचे कार्य सुलभतेने होण्यास मदत करतो. कडू लिंबाची पाने व खोड कुष्ठरोगावर औषध म्हणून वापरतात.
पोटिस बांधणे, वाफेने शेकणे, मलम तयार करून वापरणे इत्यादींसाठीही पानांचा उपयोग करतात. बहुउपयोगी असा हा कडुलिंब आपल्या रोजच्या जीवनात स्वच्छता ठेवण्यासाठी भरपूर उपयोगी होतो. यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहते. हा प्रयोग दररोज करा,किंवा वरचेवर करत रहा, परिणाम नक्कीच चांगला दिसेल.
याशिवाय अजून एक सोपा उपाय तसेच आयुर्वेदिक उपाय करा. बरेच चे प्रॉडक्ट घरामध्ये वापरतो मच्छर किंवा मासे वगैरे घालवण्यासाठी ते केमिकलयुक्त प्रॉडक्ट आपल्या शरीरामध्ये श्वासाबरोबर जातात आणि त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होत असतो.
परंतु ही वनस्पती जी आहे याच चूर्ण जर आपण दिवा लावत असताना तेला मध्ये किंवा तुपामध्ये जर मिक्स केले आणि त्याचा जर दिवा लावला तर शरीराला सुद्धा खूप सारे फायदे होतात. हे चूर्ण ते सहजरीत्या आपल्याला कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये किंवा किराणा दुकानात मिळत असते.
औषधी आणि सुगंधी वेखंड पावडर ही जी पावडर असते ती सुगंधी असते. त्याचबरोबर जे वेखंड आहे ते आयुर्वेदिक दृष्ट्या खूप महत्त्वाच आहे, त्याचबरोबर जे वेखंड चा वास जो असतो कीटक वगैरे याने मरून जातात म्हणून पूर्वीच्या काळापासून घरांमध्ये पिसवा किंवा मच्छर माशा वगैरे झाल्यानंतर घरामध्ये वेखंड जाळण्याची प्रथा होती.
याचा परिणाम आपल्याला या दिव्यामध्ये जाणवतो. घरामध्ये जाळून धूर केल्यास आपल्याला त्रास होऊ शकतो, हे करण्यापेक्षा जर दिवा लावताना दिव्यामध्ये जर आपण तुपाबरोबर याचा वापर केला तर मेंदूसाठी आणि मज्जासंस्था साठी उपाय रामबाण ठरतो आणि आपल्या सभोवतीच्या अनेक अदृश्य अशा कितीतरी गोष्टी असतात.
त्याचा आपल्या शरीरावर आणि मनावर नकळत परिणाम घडत असतो आणि या प्रतिकूल परिणाम मूळे मनावर तसेच शरीरावर ताण पडत असतो की सर्वांनी मेंदू आणि मज्जासंस्थेचे निगडित असतात, त्यामुळे आपल्याला विकार मधुमेह डोकेदुखी अशा प्रकारचे अनेक आजार होत असतात आणि यामागे मानसिक ताणतणाव हे एक मुख्य कारण असते.
किमान सात दिवस जर हा दिवा तुम्ही घरामध्ये लावला तर तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी खूप छान आहे. त्याचबरोबर घर सुद्धा तुमचं पूर्णपणे निर्जंतुकीकरण होतं. तुपामध्ये जर वापर केला तर तो अधिक परिणामकारक ठरतो.
तुपामध्ये ते घ्यायचे, आपल्याला तुपामध्ये एक चमचाभर हे वेखंड चूर्ण टाकायचे. चांगल्या रीतीने मिक्स करून घ्या. त्या तुपामध्ये आपल्याला दिवा लावायचा आणि वेखंड या दोन्हींचा एकत्रित परिणाम खूप चांगला आहे.
आपल्या शरीरावर सुद्धा जाणवतो आणि निर्जंतुकीकरण करण्यासाठी त्याचा चांगला परिणाम होईल. तूप गरम करून जरी घेतलं गरम करत असताना त्यामध्ये एक चमचाभर चूर्ण टाकलं तर हे जे तूप आहे ते आपल्याला कायमस्वरूपी वापरता येतात.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.