नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, सध्या नवरात्रौत्सव सुरू आहे. वर्षभरात चार वेळा नवरात्री पर्व साजरं केलं जातं. त्यापैकी सध्या शारदीय नवरात्रौत्सव सुरू आहे. देवीचा हा उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट म्हणजेच कलशाची स्थापना केली जाते.
त्या दिवसाला घटस्थापना असं म्हणतात. त्या घटात विविध बिया पेरल्या जातात आणि हा घट अत्यंत पवित्र मानला जातो. अखेरच्या दिवशी या कलशाचं उत्थापन (विसर्जन) केलं जातं. यावेळी शारदीय नवरात्रीचा उत्सव 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर पर्यंत असेल.
पंचमी, अष्टमी आणि नवमी या तिथींबाबत मतभेद असल्याने नवरात्रीचा उपवास कधी सोडावा हे जाणून घ्यायचे आहे. पारण म्हणजे उपवास कधी सोडावा, कारण अष्टमीसोबतच ११ ऑक्टोबरला नवमी आहे आणि १२ ऑक्टोबरलाही नवमी आहे.
घटची स्ठापना केल्यानंतर 9 दिवस त्याची आराधना केली जाते. घटला रोज एक माळ अपर्ण केली जाते. 9 दिवस घटस्थापना केल्यावर 10 व्या दिवशी दसरा साजरा केला जातो. म्हणजे याच दिवशी दसऱ्याला घट विसर्जन केलं जातं.
तर काही जण कुळाचाराप्रमाणे 9 वीला तर कोणी दशमीला घट विसर्जन करतात. घट कधीही स्त्रीयांनी उठवू नये. घट कायम पुरुषांनी उठवावा, असं शास्त्रात सांगितलं आहे. शास्त्रानुसार घट उठवण्यासाठी 5 पुरुष किंवा 5 लहान मुलं बोलवायला पाहिजे.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट म्हणजेच कलशाची स्थापना केली जाते. त्या दिवसाला घटस्थापना असं म्हणतात. त्या घटात बीज पेरलं जातं आणि हा घट अत्यंत पवित्र मानला जातो. दुर्गादेवीसह नऊ दिवस या कलशाची विधिपूर्वक पूजा केली जाते.
असं केल्याने घरात सुख-समृद्धी येते. तसंच घरात संपत्ती वाढते. नऊ दिवसांच्या पूजनानंतर अखेरच्या दिवशी कलशाचं विसर्जन केलं जातं. त्यासाठी शुभमुहूर्त पाहावा लागतो आणि ते विधिवतच करावं लागतं. कलश विसर्जनात काही चूक झाल्यास दुर्गामाता नाराज होऊ शकते, असं म्हटलं जातं.
दुर्गामाता आणि कलशाचं नऊ दिवस मनोभावे पूजन केल्यानंतर अखेरच्या दिवशी मूर्ती आणि कलशाचं विसर्जन केलं जातं. ते योग्य रीतीने केलं, तरच त्याचं फळ मिळतं. विसर्जन करताना सर्वांत आधी ‘ऐं हीं क्लीं चामुंडायै विच्चे..’ हा मंत्र म्हणत भक्तिभावाने कलशावरचा नारळ सावकाश उचलावा.
तो नारळ लाल ओढणी किंवा कापडात बांधून आपली आई, पत्नी, बहीण किंवा मुलीकडे द्यावा. आंब्याच्या पानांनी त्या कलशातलं पाणी घरात सर्वत्र शिंपडावं. हे पाणी खूप पवित्र असतं.
त्याच्यामुळे घरात समृद्धी, संपत्ती येते. तसंच घरात सकारात्मक ऊर्जाही येते.कलशातलं पाणी सर्वांत आधी स्वयंपाकघरात शिंपडावं. त्यानंतर बाकीचं घर आणि मुख्य प्रवेशद्वारावरही शिंपडावं.
हे पवित्र जल बाथरूम, टॉयलेट किंवा अपवित्र स्थळी शिंपडलं जाणार नाही याची काळजी घ्यावी. उर्वरित पाणी तुळशीला किंवा कोणत्या तरी झाडाला घालावं, कुठे तरी फेकून देऊ नये.
कलशात असलेलं नाणं आपली तिजोरी किंवा पर्समध्ये ठेवावं. त्यामुळे धनवृद्धी होते, असं म्हणतात. तसंच, कामकाजात प्रगती होते. जीवनात कधीही पैशांची कमतरता भासत नाही.
मातीचा कलश घराच्या बाहेर एखाद्या झाडाखाली किंवा मंदिरात ठेवावा. जवाच्या उर्वरित बीजापैकी थोडं बीज तिजोरी किंवा पर्समध्ये ठेवू शकता. त्यामुळे दुर्गामातेची कृपा कायम राहते असं म्हणतात. नवरात्रीमध्ये जवरेचे विसर्जन करण्याची वेळ नवमी तिथी संपल्यानंतर केली जाते.
ज्या लोकांच्या घरी सप्तमीची पूजा केली जाते, त्यांनी सप्तमी पाळावी.ज्या लोकांच्या घरी अष्टमीची पूजा असते ते अष्टमी साजरी करतात. ज्या लोकांच्या घरी नवमीची पूजा असते ते नवमी साजरी करतात.
अष्टमी तिथी शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 12:06 पर्यंत राहील, त्यानंतर तुम्ही अष्टमीचे पारण करू शकता. नवमी तिथी शनिवार, 12 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10:58 पर्यंत राहील. यानंतर नवमी साजरी करता येईल. उदयतिथीनुसार या दिवशी नवमी असेल.
नवरात्रीच्या उपवासाचे पारण , जे पूर्ण 9 दिवस उपवास करत असतील तर ते शनिवार, 12 ऑक्टोबर रोजी नवमीच्या संध्याकाळी पारण करू शकतात. नवरात्रीचे व्रत १२ ऑक्टोबरला संपणार आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजला आताच फॉलो करा.