वसुबारस तिथी, मोठा सण, काय करावे काय टाळावे??

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, या दिवशी जे व्रत करतात त्यात सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात व पुढील मंत्राने तिची प्रार्थना करतात .यंदा सोमवार , २८ ऑक्टोबर रोजी अश्विन कृष्ण एकादशीला वसुबारस आणि रमा एकादशी आहे, त्यामुळे यंदाच्या वसुबारसला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे .

समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो, अशी मान्यता आहे. आपल्या हिंदु संस्कृतीत ज्या गायीला आपण पूज्य देवता मानतो, त्या गायीच्या पूजनाने दिवाळीच्या उत्सवाचा आरंभ होतो. या दिवसाला ‘गोवत्स द्वादशी’ असेही म्हणतात.

या दिवशी सवत्स धेनूची म्हणजे गाय आणि तिच्या पाडसाची पूजा केली जाते. सवत्स धेनू हे पृथ्वीचेच एक रूप आहे. वसु म्हणजे पृथ्वी. तिच्या अंगाखांद्यावर आपण बागडतो; म्हणून तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. त्यातून वात्सल्य, प्रेम आणि जिव्हाळा प्रतीत होतो.

आपल्या घरात लक्ष्मीचा आगमन व्हावं या हेतूने या दिवशी समस्त धनाची पूजा करतात. वसु म्हणजे द्रव्य धन, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. वसुबारसच्या पूर्वी दिवाळीच्या आगमनाची तयारी सगळीकडे सुरू असते. घर, गोठे सर्व स्वच्छ केलेले असतात.

सगळीकडे आनंदी वातावरण असते. तसेच शेतावर शेतीची इतके दिवस राखण्यासाठी गेलेली गाय आपल्या बछड्या सह वसुबारसेला संध्याकाळी परत येणार असते. तेव्हा तिचे स्वागत करूनच तिच्या मागोमा घेणाऱ्या वासराला दिवाळीच्या वसुबारसेला उंबरठ्यात ओवाळून घरात घ्यायचे असते.

शेती कामात मदत करणाऱ्या सर्व जनावरांविषयी भारतीय संस्कृतीला प्रेम आहे. गाय तर कुटुंबातलीच एक सदस्यच असते. घरातले अखंड मातृत्व म्हणजे गाय. आईसारखेच मायाळू तसेच वासराला गोंजारून बोलणार, तिचा हंबरून ऐकलं की कुणाच्याही हृदयात वचनांना दाटून येतं.

तर अशा या गोमातेचे पूजन तिच्या वासरासह या दिवशी करायचं असतं.पंच म्हणजे पाच, गव्य म्हणजे काय तर पंचगव्य म्हणजे गाईपासून मिळणाऱ्या पाच वस्तू. त्यात गाईचे दूध, दही, तूप, शेण, गोमूत्र याने आंघोळ करणे व पोटात घेणे हे अत्यंत महत्त्वाचे असते.

या दिवशी गुरुद्वादशीही साजरी केली जाते. अखिल मानवजातीस ऐहिक, पारलौकिक, पारमार्थिक आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवून उपदेश करणार्‍या गुरूंच्या स्मरणार्थ वर्षातून गुरुपौर्णिमा, गुरुप्रतिपदा आणि गुरुद्वादशी या ३ तिथी साजर्‍या केल्या जातात.

गुरूंविषयी आदरभाव व्यक्त करणे, हेच त्यामागील उद्दिष्ट आहे. गुरुद्वादशीच्या निमित्ताने त्या दिवशी समाप्ती होईल, अशा पद्धतीने गुरुचरित्राचे सप्ताहपारायण करण्याची प्रथा आहे.दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते.

ह्या दिवशी संध्याकाळी गाय आणि वासरू ह्यांची पूजा केली जाते. गायीच्या पायावर पाणी टाकावे. गायीला हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ घालावी. वासराची अश्यारिती पूजा करावी. निरांजनाने ओवाळून घ्यावे. गायीच्या अंगाला स्पर्श करावे.

गाय- वासराला गोडाचा नैवेद्य दाखवावा. नंतर गायीला प्रदक्षिणा घालावी. जवळपास गाय उपलब्ध नसल्यास घरी पाटावर रांगोळीने किंवा तांदळाने गाय- वासराचे चित्र रेखावे व पूजा करावी.या दिवशी दिवशी गहू, मूग खात नाहीत.

स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. भरपूर कृषी (शेतीत) उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारात, परिसरात दिवाळी सणाच्या प्रारंभानिमित्त पणत्या लावून रोषणाई करण्याची पध्दत आहे.
वसुबारस साजरी करण्यामागची आख्यायिका काय आहे?जेव्हा असुरांमध्ये आणि देवांमध्ये स्पर्धा झाली तेव्हा समुद्र मंथन करण्यात आले. त्या वेळी समुद्र मंथन करत असतांना त्यातून 5 रत्ने बाहेर पडली आणि ह्या रत्नातून पाच गायी बाहेर पडल्या आणि त्यातील एका गायी चे नाव नंदिनी होते.

तिचे प्रतीक म्हणून गोबारस साजरी करण्याची प्रथा आहे. आणि दुसरं म्हणजे गाई पासून आपल्याला खूप सारे फायदे देखील मिळतात . गायीचे तूप , दूध, दही, ताक तसेच , गाईचे पवित्र आणि गुणकारी गोमूत्र आणि गाईचे शेण हे देखील निसर्गाची देणगीच आहे.शेतातील उत्पन्न वाढवण्यासाठी आपण गायी चे शेणखत देखील वापरतो .

अश्या बऱ्याच प्रकारचे गायी चे आपल्यावर उपकार असतात . तर त्या बद्दल गायीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हि वसुबारस साजरी करतो.वसुबारसेची पूजा कशी करतात?वसुबारस दिवशी जे व्रत करतात त्यात सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात.

: सर्वमये देवी सर्वदेवैरलङ्कृते |मातर्ममाभिलषितं सफलं कुरू नन्दिनि ||हे सर्वात्मक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर, असा याचा अर्थ आहे. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते.

या दिवशी तेलातुपात तळलेले पदार्थ आणि गाईचे दूध, तूप व ताक खात नाहीत. उडदाचे वडे, भात व गोडधोडाचे पदार्थ करून ते गाईला खाऊ घालतात. उत्तर प्रदेशात त्या व्रताला बछवाँछ असे म्हणतात. घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी वासरू असलेल्या गाईची पूजा करण्याची पद्धत आहे.

घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. हळद-कुंकू आणि अक्षता वाहतात. ज्यांच्या घरी गुरे, वारसे आहेत, त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. मग गाईला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो.या दिवशी गाईला हिरवा चारा घाला.

शक्यतो गहू आणि मूग खाऊ नका. चाकूच वापर करू नका. गोमातेला मनापासून प्रार्थना करा. गाईला मारहाण करू नका, अपशब्द बोलू नका. तसेच या दिवशी पिवळ्या वस्तूंचं दान करा. गरिबांना दान करा. पुण्य मिळेल, अडचणी दूर होतील. वसुबारण सणाच्या दिवशी गहू, मूग खात नाही.

महिला या दिवशी दिवसभर उपास करतात. बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपास सोडतात. या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले तसेच तव्यावर बनवलेले पदार्थ खात नाहीत, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजला आताच फॉलो करा.

error: Content is protected !!