नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ , गुरुचरित्र आणि गुरुलीलामृत हे दोन्ही ग्रंथ दत्तसंप्रदायात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणून गणले जातात. त्यांचे पारायणही उपासना म्हणून केले जाते. पारायणाचे वेळी सप्ताहाचे बंधन असण्याने अर्थ-चिंतन करायला अवसर नसतो.
म्हणून उपासनेचाच एक भाग या दृष्टिकोनातून ग्रंथाचा अभ्यासही करायला हवा. श्रीपादश्रीवल्लभ, श्रीनृसिंहसरस्वती, श्रीस्वामी समर्थ या दत्तावतारी-सत्पुरुषांनी भक्तांवर कृपादृष्टी टाकून त्यांच्या पाठीमागे कृपाशक्तीही उभी केली. तिला चमत्कार असे म्हटले गेले आहे.
पण हे चमत्कार श्रद्धेच्या वाढीसाठी असून त्यायोगे भक्तांची मनोकामना पूर्ण होते हा एक भाग; पण मनोकामना पूर्ण झाल्यावर त्यांनी गुरुसेवा/ गुरूउपासना अखंडपणे चालू ठेवून आत्मज्ञानप्राप्ती करून घेतली पाहिजे.
म्हणूनच गुरूंनी केलेल्या चमत्कारांमागील भक्तिसूत्र शोधून घेऊन त्यांतील गुरुबोध जाणून घ्यायला हवा. गुरु-शिष्य संवाद हा त्यासाठीच असतो.
दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेल्या मूळ ग्रंथाचा १४८०च्या सुमारास सरस्वती गंगाधरांनी केलेला विस्तार म्हणजेच ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे.
वारकऱ्यांना ‘ज्ञानेश्वरी’ व ‘दासबोध’ प्रिय, नाथपंथीयाना जसा ‘नवनाथ भक्तिसार’ प्रिय, तसा दत्तभक्तांना ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे.
या प्रासादिक ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत व त्यांची विभागणी ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे.
विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान-कर्म-भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरूचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने ओघवत्या भाषेत केले आहे.
सर्वसामान्य मनुष्याने ईश्वराप्रत पोहोचण्यासाठी कशा प्रकारचे आचरण ठेवावयास हवे याचे मौलिक मार्गदर्शन ‘गुरुचरित्रा’च्या माध्यमातून केले असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्तभक्ताच्या हृदयात ‘पाचवा वेद’ असेच आहे आणि यात यत्किंचितही अतिशयोक्ती नाही.
पू. श्री. टेंबेस्वामी नेहमी सांगत की, “दुसरी काही उपासना तुम्हाला शक्य झाली नाही तरी चालेल; परंतू गुरुचरित्रातील किमान पाच ओव्या नित्य वाचनात असू द्या.”
कोणतीही उपासना ही काहीतरी प्राप्त व्हावे, अशा इच्छेनेच बहुधा केली जाते. तसेच उपासनेचे फळ हे निश्चितपणे मिळते, असे अभिवचन ग्रंथात दिलेले असतेच.
तुम्ही-आम्ही सर्व प्रापंचिक माणसे आहोत. प्रपंच म्हटला की, सुख-दु:ख आलेच! मग सुखप्राप्ती व्हावी आणि दु:खनिवृत्ती व्हावी ही सर्वाचीच अपेक्षा असते.
तसेच पारायण सेवेने देवदर्शन घडावे अशीही मनिषा असते. आपण राहतो ती वास्तू आपणास लाभ-आनंद देणारी असावी असेही प्रत्येकास वाटत असते.
या सर्व गोष्टी ग्रंथपठण-पारायण सेवेने प्राप्त होऊ शकतात. दासबोध, तुकारामांची गाथा, ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी एकनाथांचे भागवत अशा विविध ग्रंथाच्या पारायण सेवेने भक्तांना त्यायोगे फलप्राप्ती होतच असते.
श्रीगुरुचरित्र ग्रंथातही फलश्रुती सांगितली गेली आहे. तर ती अशी (१) त्रिपदा गायत्रीमंत्राचे पठण (१०८ मण्यांची माळ किंवा त्यापर्यंत जप) करावे, तसेच गुरुचरित्र वाचावे. त्रिपदा गायत्रीमंत्र असा,
‘ॐ भू:ॐ भुव:ॐ स्व: मह:ॐ जन ॐतप: ॐसत्यम ॥१॥ ॐ तत्सवितुर्व रेण्यं भर्गोदेवस्य धीमहि धियोयोन: प्रचोदयात ॐ ॥२॥, ॐ आपोज्योती रसोमृतम ब्रह्मभूर्भव: स्वरौम ॐ विष्णवे नम: ॥३॥
पारायण म्हंटल की निएम आलेच पण जर तुम्ही शांतपणे सगळ काही विचारपूर्वक करा. यामुळे काय होत की मन शांत राहते आपण पारायण सुरू करण्यापूर्वी दत्त माऊलीला प्रार्थना कळकळीची विनंती करा की
तुम्हाला काही अडचण येऊ नये सर्वकाही सुरळीत पार पडुदेत आणि आपल पारायण संलकप पुर्ण होऊदेत जर तुम्हाला काही अडचण तरी देखील आलीच तर मात्र माफी मागा व ती उर्वरित सेवा ब्राम्हण व्यक्तीकडून यथाशक्ती यथदान पुर्ण करा.
मग तुम्हाला कोणतेही पाप लागणार आणही कारण स्वामी दत्त माऊली आपली परीक्षा घेत असतात.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.