नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, अतिथी देवो भवः अशी भारतीयांची भावना आहे. आपल्याला लहानपणापासून आग्रह करण्याची भारी सवय असते. विशेषतः जर घरी कोणी जेवायला आलं की, घ्या घ्या करून गरजेपेक्षा जास्त पानात वाढलं जातं.
अनेकदा समोरच्याला तेवढी भूक असेलच असंही नाही. पण तरीही आपल्याला वाढण्याचा आणि आपण कसे बेस्ट होस्ट आहोत हे दाखवण्याचा मोह आवरत नाही. पण तुम्हाला माहित आहे का ताटात तुम्ही काय व किती वाढता यावरून अनेक गोष्टींवर प्रभाव पडत असतो.
धार्मिक मान्यतांनुसार ताट वाढण्यात चुका करणे शक्यतो टाळावे. यातीलच अनेकदा होणाऱ्या चुका म्हणजे भात एकच चमचा वाढणे किंवा ताटात तीन पोळ्या वाढणे.
तुमचा भाव जरी यात चांगला असला तरी त्याचे पडसाद व अर्थ जाणून घेणे ही महत्त्वाचे आहे. शास्त्रात आपण ताटामध्ये ३ पोळ्या एकत्र का वाढू नयेत याविषयी माहिती देण्यात आली आहे. अंकशास्त्रानुसार ३ हा अंक अशुभ मानला जातो.
ही विषम संख्या असल्याने असा समज रूढ झाला असावा. तुम्ही जेवण वाढताना सुद्धा शक्यता २ किंवा २ ने भागाकार होईल अशा संख्येतच पोळ्या वाढण्याचा सल्ला दिला जातो.
हिंदू शास्त्रात जेव्हा एखाद्या माणसाचे निधन होते तेव्हा त्याच्या नावे तेराव्याचे विधी केले जातात. यावेळी त्रयोदशीला तीन पोळ्या वाढण्याची पद्धत आहे असे म्हणतात.
तीन पोळ्यांच्या संदर्भात आणखी एक समज म्हणजे तीन पोळ्या वाढल्यास त्या जेवणाऱ्या व जेवू घालणाऱ्यामध्ये वाद होऊ शकतो असे समजले जाते.
तीन हा शत्रुत्वाचा अंक म्हणूनही ओळखला जातो आहारतज्ञांच्या माहितीनुसार तीन पोळ्या वाढल्यास पोटाची भूकही लगेच मिटू शकते, यानंतर तुम्ही भात खायची इच्छा कदाचितच होऊ शकते. शरीराला पुरेपूर पोषण मिळावे यासाठी दोन पोळ्या व वाटीभर भात उत्तम ठरतो.
केवळ पोळ्याच नव्हे तर भाताच्या बाबत सुद्धा हाच नियम मानला जातो. भात वाढताना आपण एकच चमचा भात कधीही वाढू नये असे म्हणतात.
किंचित का होईना पण निदान दोन किंवा दोनने भागाकार होणाऱ्या संख्येत भात ताटात वाढला जावा असे अनेक वयस्करांकडून सांगितले जाते.जेवणाचे ताट वाढण्यासाठी आहारतज्ज्ञांनी व शास्त्रातही अनेक नियम आहेत,
यातील सर्वात सोपा नियम म्हणजे जे पदार्थ अधिक खाल्ले जातात ते उजवीकडे व तोंडी लावण्याचे पदार्थ डावीकडे वाढले जावे.
ताटात 3 पोळ्या दिल्या जात नाहीत कारण, ज्योतिषशास्त्रात तिसरा क्रमांक चांगला मानला जात नाही. मान्यतेनुसार तिसरा क्रमांक उपासनेपासून किंवा सामान्य जीवनापासूनही दूर ठेवला जातो,
त्यामुळे जीवनातील त्याचा वाईट प्रभाव कमी होतो. असे मानले जाते की मृत व्यक्तीच्या ताटात तीन रोट्या ठेवल्या जातात. त्यामुळे जिवंत माणसाच्या ताटात तीन रोट्या ठेवल्या जात नाहीत.
असे करणे अशुभ मानले जाते. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना 4-5 रोट्या किंवा पुर्या एकत्र ताटात दिल्या तरी चालेल. फक्त तीन टाळले पाहिजेत.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.