नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, स्वामी सेवा करताना जे मनापासून करतात त्यांना अनेकदा उत्सुकता असते. खूप काही जाणून घ्यायचं असते. भरपूर सेवा करायची असते. पण काही गोष्टी कळत नसतात..
एक सिद्ध आणि अद्भुत मंत्र म्हणजे स्वामींचा तारक मंत्र ज्याचे अनेक फायदे आहेत. अनेक लाभ आहेत. हा मंत्र आपली सर्व परिस्थिती बदलू शकतो पण तितकी श्रद्धा हवी. तुम्ही स्वामी भक्त असाल,
स्वामी सेवेकरी असाल तर तुम्ही स्वामींची सेवा नक्की करत असाल. सेवा करताना तुम्ही तारक मंत्र म्हणत असालच.
आणि तारक मंत्र म्हणत नसाल तर तो तुम्ही आजपासूनच दररोज म्हणायला सुरुवात करा.
कारण तारक मंत्रामध्ये प्रचंड शक्ती असते. तारक मंत्र हा आपल्या स्वामींचा मंत्र जो कि आपल्याला सर्व संकटातून तारून नेहणारा आपल्या प्रेत्येक संकटातून वाचून नेणारा मंत्र आहे.
हा मंत्र म्हणजे साक्षात स्वामींचे बोल आहेत.तुम्ही तारक मंत्र हा अवश्य घरात बोलायला हवा, ह्या तारक मंत्रासोबत करावयाचा सोपा एक उपाय जाणून घेणार आहोत.
ह्यामुळे आपल्यावर स्वामींची कृपाआशीर्वाद आपल्यावर राहतो.
स्वामी आपले रक्षण करतात. चला जाणून घेउयात तो उपाय कोणता ते. जेव्हा तुम्ही बसून तारक मंत्र बोलता
तेव्हा आपण आपल्या समोर आपण तांब्याचा ग्लास किंवा वाटी आपण भरून ठेवायची आहे. त्यानंतर आपण देवासमोर बसून आपण ११ वेळा किमान हा तारक मंत्र आपण म्हणायचा आहे.
तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जास्तवेळा सुद्धा ह्या मंत्राचा जप आपण करू शकता. पण तो जप आपण मनापासून करायचा आहे.
हा जप झाल्यानंतर आपण ते पाणी जे ठेवले होते ते आपण प्याचे आहे तसेच ते पाणी आपण घरातील सदस्यांना देखील द्याचे आहे.
तसेच उरलेले पाणी आपल्या घरातील कोपऱ्यांमध्ये शिंपडायचे आहे, जेणेकरून आपल्या घरातील जे काही वास्तुदोष असतील ते सर्व वास्तुदोष दूर होतील.
सर्व घरातील समस्या आजारपण दूर होते. घरातील व्यक्तींचे आरोग्य देखील चांगले राहते. मित्रांनो स्वामी आपल्या भक्तांचे नेहमीच रक्षण करतात,
स्वामींच्या कृपेचा अनुभव हा स्वामीभक्ताला येतोच येतो. म्हणून तुम्हाला देखील स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्याचा असेल तर घरात तारक मंत्र म्हणायला सुरुवात करा,
तुम्ही कोणत्याही प्रकराची समस्यांनी त्रासलेले असाल, आर्थिक समस्यांनी ग्रस्त असाल ह्या सर्व समस्या स्वामींवर सोडून द्या
व स्वामीसेवा करा स्वामी सर्व काही नीट करतील. सर्व संकटातून बाहेर काढतील.
असाह्य दुर्बल झालेल्या समाजाला स्वामींनी भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा दिला आहे. आज हा दिलासाच कित्येक स्वामीभक्तांना जगण्याचे बळ देतो.
स्वामी प्रेत्येक्ष रूपात नसले तरी स्वामीकृपेने त्यांचे सानिध्य त्यांना भाविकांना पदोपदी जाणवते. स्वामींनी अनेक भक्तांना ताठ मानेने जगायला शिकवले आहे.
स्वामींचा तारक मंत्र हा प्रेत्येक ताणतणाव ग्रासलेल्या व्यक्तीला तणाव नियंत्रणाचे धडे देतो.
तारक मंत्र मधील शब्द हे दिलासादायक आहेत, सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना आपण तारक मंत्र म्हणण्याचा व
समजून घेण्याचा प्रयत्न जर आपण केला तर आयुष्यातील ताणतणव कायमचा निघून जाईल, व जीवन सुखमय बनेल.
असा मंत्र जप बरीच हानी टाळू शकतो.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.