कचरा पेटी या दिशेला ठेवा, एकही अडचण येणार नाही…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, पैसा ही आपल्या जीवनातील अविभाज्य बाब आहे. सगळ्या गोष्टींची सोंग आणता येतात; पैशाचं नाही, अशी व्यक्ती प्रसिद्ध आहे. पैसा मिळवण्यासाठी, कमवण्यासाठी माणूस पडेल ते काम करत असतो.

आताच्या घडीला पैसा हेच सर्वस्व झाल्यासारखे भासते. ज्याला पाहावं, तो पैशांच्या मागे धावताना दिसतो. कारण प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो.

दररोजच्या गरजांपासून ते छान, शौकीपणा करण्यासाठी पैसा असल्याशिवाय भागत नाही.

वास्तुशास्त्रामध्ये आपल्या राहत्या घरात, आपल्या कार्यालयात, कारखान्यात अशा जागांमध्ये कोणत्या वस्तू कोणत्या ठिकाणी ठेवाव्यात, याबाबत सविस्तर विवेचन करण्यात आले आहे.

आपल्या जीवनातील अनेक अविभाज्य गोष्टी योग्य दिशेला ठेवल्यास कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही, असे वास्तुशास्त्रात म्हटल्याचे सांगितले जाते.

याशिवाय त्या गोष्टी आचरल्या, पाळल्या, योग्य पद्धतीने अनुसरल्या, तर घरात सुख, समृद्धी वृद्धिंगत होते, अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते.

घरातील कचरपेटी ठेवण्याची एक दिशा वास्तुशास्त्रानुसार सांगितली आहे, ता दिशेला ठेवल्यास घरात समस्या येत नाहीत, घरात आजारपण येत नाही.

आपल्या घराचा मुख्य दरवाजा खूप महत्वाचा असतो, ज्या दरवाजातून सकारात्मक ऊर्जा घरात येत असते. अशा ठिकाणी कचरापेटी अजिबात ठेवू नका,

यामुळे तुमच्या घरात सतत आजारपण, दोष निर्माण होतील. भांडणे , कटकटी होतील व पैसे नाहक खर्च होईल. घरातील ईशान्य कोपऱ्यात कचरपेटी ठेवल्यास घरातील समृद्धी निघून जाते

व बरकत येत नाही उलट दारिद्रता येते. तसेच घरातील आग्नेय दिशा, अग्नीतत्व, स्वयंपाक करण्याची दिशा मानली जाते, वास्तुशास्त्र या दिशेला कचरपेटी ठेवल्यास आजारपण वाढत अस सांगते.

तसेच घरातील नैऋत्य कोपरा हा नातेसंबंध, सुसंवाद टिकवून ठेवण्यासाठी महत्वाचा मनाला जातो, जर या दिशेला कचरपेटी ठेवली तर नाती बिघडतात, संवाद कमकुवत होतो व वाद होतात.

त्यामुळे कचरपेटी या दिशांना चुकूनही ठेऊ नका. घरातील आणखीन एक महत्वाची, आपल्या जीवनात भरभराट आणणारी दिशा, या दिशेला धन मोठ्या प्रमाणात असते,

संधी खूप असतात अशी उत्तर दिशा, या दिशेला कचरपेटी ठेवू नका. घरातील कचरा ठेवण्याची योग्य दिशा म्हणजे घरातील वायव्य दिशा होय.

या दिशेला कचरपेटी ठेवल्याने कोणतेही नुकसान होत नाही. उलट बरकत येते, वृद्धी होते. तसेच घरात जर दोष असतील,

अडचणी, आजारपण असेल तर पश्चिम दिशेला ठेऊन बघा. नक्कीच परिणाम जाणवेल.

घरातील सुख, शांती जर अबाधित ठेवायची असेल तर नक्की या महत्वाच्या सूचना लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यात असणाऱ्या अडचणी नक्कीच कमी होतील व अडथळे येणार नाहीत.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!