रोडपती देखील बनेल करोडपती असा जालिम उपाय…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्रीमंत होण्याची इच्छा प्रत्येकाला असते. प्रत्येक व्यक्ती पैसा मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो. अनेकवेळा कष्ट करूनही अपेक्षित पैसा हाती येत नाही. यासाठी लोक अनेक प्रकारचे उपाय आणि युक्त्याही करतात. काही झाडे आणि वनस्पती खूप चमत्कारिक आहेत.

त्यांचा वापर करून गरीब माणूसही श्रीमंत होऊ शकतो. तुम्हालाही श्रीमंत व्हायचे असेल तर आमच्याकडे एक उपाय आहे जो तुम्हाला खरोखर श्रीमंत बनवू शकतो. यासाठी तुम्हाला फार काही करण्याची गरज नाही. तुमच्या घरात एक लहान रोप लावा. ती वनस्पती जसजशी वाढत जाईल तसतसे तुम्ही श्रीमंत व्हाल.

गरिबी दूर करण्यासाठी आणि माता लक्ष्मीला आपल्या घरात आमंत्रित करण्यासाठी रुईच्या झाडाचा प्रयोग अगदी प्राचीन काळापासून करण्यात येत आहे. हे रुईचे झाड मंदार, मदार, आर्क, आक अशा विविध नावांनी ओळखले जाते.

आपल्या घराच्या आसपास हे झाड तुम्हाला नक्की दिसेल. या झाडांच्या मुळांचा वापर करून अनेक तांत्रिक क्रिया केल्या जातात.

कोणत्याही प्रकारचे तोटके करताना, तोडगा करताना, उपाय करताना त्याची एक विशिष्ट अशी विधी असते, नियम असतात आणि त्या नियमांनुसार हे तोटके आपण केले तर त्याच फळ हे निश्चित स्वरूपात प्राप्त होत असते.

तोडगा अत्यंत साधा सोपा आहे आणि त्यासाठी आपल्याला आपल्या घराच्या जवळपास किंवा अगदी कुठेही माळरानावरती असेल तरी चालेल. अशी मान्यता आहे की 11 वर्षानंतर या श्वेत रुईच्या मुळांमध्ये भगवान श्री गणेशांचा वास निर्माण होतो. त्यांची प्रतिमा त्या ठिकाणी आपोआप निर्माण होते.

बाजारात सुद्धा अशाप्रकारे श्वेतार्क म्हणजे पांढऱ्या रुईच्या मुळांपासून निर्मित श्वेतार्क गणेश प्रतिमा नक्की मिळतील. फक्त त्या ओरिजनल आहेत की नाही, खरोखर त्या श्वेतार्क म्हणजेच या पांढऱ्या रुईच्या मुळांपासून निर्मिलेल्या आहेत याची खात्री करा

आणि अशी जर गणेश प्रतिमा असेल तर ही प्रतिमा आपण खरेदी करून अगदी चांगल्या मुहूर्तावरती, जेव्हा आपण गणपतींची आपल्या घरी स्थापना करतो त्यावेळी जर हा उपाय केला तर अत्यंत शुभ परिणाम होतात. घर सुख समृद्धीने नांदू लागते, घरात ऐश्वर्य येते.

या झाडाच्या मुळांचा तुकडा आपल्याला कशाप्रकारे करोडपती बनवू शकतो. अनेकजण या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही की करोडपती आपण कसे बनणार. पूर्ण विश्वासाने आपण काही गोष्टी केल्या तर त्याचं फळ आपणास नक्की मिळते.

करोडपतीच काय आपण त्याही पेक्षा धनवान श्रीमंत, ऐश्वर्य संपन्न बनवू शकता. आपण आपल्या जवळपास अशा पांढऱ्या रुईचा शोध घ्यायचा आणि जर रविवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र आलं.

रविवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र असेल तर अशा शुभ संयोगामध्ये एक दिवस आधी आपण या झाडाजवळ जायचं आहे. मनोभावे हात जोडायचे आहेत, प्रार्थना करायची आहे.

त्या ठिकाणी जाताना आपल्या घरातील तांब्याभर पाणी, ते पाणी आपल्या घरातलं असावे, सोबत हळदी कुंकू, थोडेसे अक्षत म्हणजे तांदूळ आणि काही फुले घेऊन गेलात तरी चालेल.

तर ही सर्व सामुग्री आपण थोडंस पाणी अर्पण करायचं आहे, कुंकू वाहायचं आहे, अक्षत अर्पण करायचे आहे, फुले वाहायची आहेत आणि मनोभावे हात जोडून प्रार्थना करायची आहे की हे मंदार वृक्षा आम्ही आपल्याला आमच्या घरी, आमच्या वास्तूमध्ये घेऊन जात आहे.

आमच्या जीवनात आपण प्रवेश करावा आणि आमच्या घरात जी दरिद्री, गरिबी, कंगाली आहे, अलक्ष्मी आहे ती दूर करण्यासाठी आम्हाला साहाय्य करावे, मदत करावे. आपल्या कृपेने आमच्या घरात माता लक्ष्मीचा वास व्हावा. आमचं घर धनधान्याने स्वयंपूर्ण व्हावे.

रविवारच्या दिवशी पुष्य नक्षत्राच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला आमच्या घरी घेऊन जाण्यास नक्की येऊ त्यावेळी आपण आमच्या सोबत येण्याची कृपा करावी. अनेक लोक म्हणतील की झाडाला हे आपण कसे काय करू शकतो.

या ठिकाणी अंधश्रध्दा वगैरे कोणत्याही गोष्टी नाहीत. झाडं सजीव आहेत, त्यांच्यामध्ये जीव आहे, चेतना आहे आणि अशा प्रकारे जेव्हा त्या झाडास प्रार्थना करतो, आवाहन करतो.आदल्या दिवशी सायंकाळी म्हणजे सूर्यास्तासमयी आपण करावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सुर्योदयासोबत स्नान वगैरे करून,

स्वच्छ वस्त्र परिधान करून आपण या श्वेतार्क या वनस्पती जवळ जावं आणि त्या वनस्पतीला कोणत्याही प्रकारे नुकसान न पोहचवता तिच्या मुळाचा छोटासा तुकडा हा कट करून तोडून आपल्या सोबत घेऊन यावा. पुन्हा मनोभावे प्रणाम करावा.

आपल्या घरी घेऊन आल्यानंतर घरात गंगाजल असेल तर त्या गंगा जलाने हा तुकडा व्यवस्थित स्वच्छ करून घ्या. गंगाजल नसेल तरी साध्या पाण्याने हा तुकडा स्वच्छ केला तरी चालेल. त्यानंतर एका लाल रंगाच्या कपडावरती हा तुकडा आपण ठेवायचा आहे आणि एक ताबीज आपल्याला लागेल.

ताबीज आपल्याला माहीत असेल दंडावरती धारण करतो किंवा गळ्यामध्ये धारण करतो. तसा ताबीज आपल्याला एक लागणार आहे.

जर तुमच्याकडे ताबीज नसेल तर काळजी करू नका आपण त्या लाल रंगाच्या कपडात व्यवस्थित तो गुंडाळून मात्र तो व्यवस्थित गुंडाळण्यापूर्वी त्याला धूप दीप दाखवा. एक दिवा प्रज्वलित करा. दोन अगरबत्त्या लावा.

मनोभावे प्रार्थना करा की आपण आमच्या घरात प्रवेश केला आहे आणि आपल्या कृपेने आमचे घर धनधान्याने परिपूर्ण व्हावे अशी प्रार्थना करा आणि लाल रंगाच्या कापडात तो गुंडाळून आपल्या तिजोरीत ठेवू शकता.

तिजोरीत ठेवण्यापूर्वी आपण ताबीज मध्ये तो तुकडा घालावा आणि हा ताबीज आपल्या उजव्या दंडावरती धारण करावा.

महिला असतील, पुरुष असतील उजव्या दंडावरती हा ताबीज धारण करावा. जी व्यक्ती हा ताबीज धारण करते तिच्याकडे लक्ष्मी ओढली जाते. पैसा आपोआप खेचला जातो.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!