नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, मनुष्याला लाभलेला ‘चेहरा’ ही त्याला मिळालेली एक प्रकारची नैसर्गिक देणगीच समजली जाते. कारण माणसाचे हास्य, दु:ख, लोभ, पाप, पुण्य, क्रोध यांसारख्या भाव-भावना या चेहऱ्यावरूनच समजतात. चेहऱ्यावर आपले व्यक्तिमत्व अवलंबून असते आणि चेहऱ्यावरूनच बऱ्याच वेळा माणसांची पारख केली जाते.
एवढे महत्व असणाऱ्या चेहऱ्यावर पिंपल्स, सुरकुत्या आणि सर्वात महत्वाचे म्हणजे काळे डाग जर दिसू लागले तर त्या व्यक्तीला अवघडल्यासारखे वाटते, त्याचबरोबर त्याचा आत्मविश्वासही कमी व्हायला लागतो.
अशावेळी अनेकजण बाजारात उपलब्ध असणाऱ्या विविध क्रीम्स, पार्लर किंवा इतर औषधांचा सर्रास वापर सुरु करतात पण या सगळ्या प्रयोगात शरीराला किंवा चेहऱ्याला त्यांचे साईड इफेक्ट्स भोगावे लागु शकतात. चेहऱ्यावर काळे डाग येण्याची प्रमुख कारणे अनुवंशिक, सतत उन्हात फिरणे, हार्मोनल बदल, वाढते वय, प्रदूषण ही कारणे असू शकतात, असे अनेक तज्ज्ञांनी अभ्यासातून सिद्ध केले आहे.
आपल्या शरीरामध्ये काही असे घटक असतात त्यानें आपल्या शरीराचा रंग चमकदार बनतो. परंतु हा घटक कमी पडल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर तेज कमी होत असतं. सर्वात आधी आपल्याला हा घरगुती उपाय करण्यासाठी एक पेस्ट तयार करायची आहे. त्यासाठी टोमॅटो कापून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी मग त्यानंतर यामध्ये चिमूटभर हळद मिक्स करून घायची आहे.
त्यामध्ये थोडे बेसन पीठ घालून हे मिश्रण एकजीव करून घ्यावे.कारण हे हळद ,बेसन पीठ आणि टोमॅटो या तीनही पदार्थांमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असे पोषक द्रव्ये असतात त्यामुळे आपल्या त्वचेला ही पोषक द्रव्ये मिळून तिला चमकदार बनवतात.
तसेच यामध्ये चिमूटभर मीठ टाकायची आहे. मिठामध्ये सुद्धा अशा काही प्रॉपर्टीज असतात ज्या आहेत त्या शरीराला मदत करत असतात .हे मिश्रण एकजीव करून त्यामध्ये कोरफडीचे जेल टाकायचे आहे कारण कोरफड ही आयुर्वेदात औषधी वनस्पती मानली जाते. जिचे गुणधर्म आपल्या चेहऱ्यासाठी खुप उपयुक्त असतात.
हे मिश्रण तयार करून आपल्या शरीरावर आपल्या चेहऱ्यावर हलक्या हाताने मालिश करावी. केल्यानंतर आपल्याला दहा ते पंधरा मिनिटानंतर चेहरा थंड पाण्याने धुवायचा आहे. हा उपाय आपल्याला सलग एक महिना करायचा आहे. आपल्याला ही पेस्ट आठवड्यातून एक वेळेस लावायची आहे. यामधील हळद ही शरीरासाठी खुप उपयोगी ठरते. तसेच फक्त कोरफडीचा उपयोग आपली त्वचा चमकवण्यासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त ठरते.
आजकालच्या प्रदूषण युक्त वातावरणात आपल्या त्वचेवरती खासकरून आपल्या चेहऱ्यावर काळे डाग, वांग, पिंपल्स येणे याची समस्या वाढली आहे. स्कीन एक्सपर्टनुसार पिगमेंटेशन महिलांमध्ये दिसून येणारी एक साधारण त्वचा समस्या आहे. ज्याला घाबरण्याची काहीही गरज नाही.
पण तरीही पिगमेंटेशन हे महिलांच्या सेल्फ कॉन्फिडंस आणि सेल्फ एस्टीमसाठी मात्र हानीकारक आहे. ही एक अशी परिस्थिती आहे ज्यामुळे त्वचेच्या रंगात असमानता दिसू लागते. आपल्या त्वचेत रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या पेशींमुळे आपल्याला रंग प्राप्त होत असतो.
आपलं शरीर सूर्याच्या हानीकारक किरणांपासून सुरक्षा करण्यासाठी जास्त प्रमाणात मेलनिन या घटकाची निर्मिती करतं. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर डार्क स्पॉट्स किंवा सन स्पॉट्स येऊ शकतात.
या समस्येमुळे तुमच्या चेहऱ्याचा स्किन टोन असमान आणि खराब दिसू लागतो. ही समस्या बरेचदा वयाच्या चाळीशीतही अनेक महिलांना झाल्याचं दिसून येतं. काळे डाग आणि पिंपल्समुळे चेहऱ्यावर खूणा दिसू लागतात.
यामुळे साहजिकच तुमचा चेहरा थकल्यासारखा दिसू लागतो. वांगमुळे तुमचा चेहरा वय वाढण्याआधीच जास्त वयस्क वाटू लागतो. यासाठी काही घरगुती उपाय आहेत जे केल्यावर तुमची त्वचा नक्कीच चमकदार होईल.
चेहऱ्यावरील डाग हळूहळू निघून जातील. घरगुती आयुर्वेदिक उपाय जर आपण केले तर त्याचे कोणतेही साईड ईफेक्ट होत नाहीत.
होतात ते फक्त चांगले परिणाम. तुमच्या या समस्येवर नक्कीच हा रामबाण उपाय ठरेल. त्यासाठी तुम्ही फक्त काही ताजी कडुलिंबाची पाने घ्यायची आहेत, ही पाने कोवळी व ताजी असावीत जेणेकरून त्यातून जास्त रस निघेल. कडुलिंब ह खूपच औषधी मानला जातो. कोणत्याही जखमेवरती, डागांवरती याचा उपाय केला जातो. यासाठी तुम्हाला लागेल ती म्हणजे हळद.
अतिशय गुणकारी, औषधी, जंतुनाशक अशी बहुउपयोगी हळद यासाठी लागणार आहे. ओल्या किंवा सुकलेल्या जखमेवर हळद लावली तर ती लवकर बरी होते. म्हणून आपल्याला हळद वापरायची आहे.
ती कडुलिंबाची पाने खलबत्त्यात बारीक करायची आहेत, ती बारीक केल्यावर तुम्हाला त्यातील रस गाळून घेतला तरी चालतो किंवा जशास तसे मिश्रण घेतले तरी चालते.
त्यामध्ये गुणकारी अशी हळद फक्त चिमूटभर घ्या व त्यात मिक्स करा. त्यांनंतर हे मिश्रण तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता. जर तुम्हाला चेहऱ्यावर फक्त काळे डाग असतील तर कापसाचा बोळा घेऊन त्याने चेहऱ्यावर लावा व ते चेहऱ्यावर सुकल्यावर साध्या पाण्याने धुवून टाका.
जर तुमच्या चेहऱ्यावर वांग असेल तर त्यासाठी हे मिश्रण कापसाच्या सहाय्याने मसाज करा. त्यांनंतर तसेच थोडा वेळ ते सुकू द्या व चेहरा धुवून घ्या. हा उपाय वरचेवर करा ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाग लवकरात लवकर निघून जातील.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.