नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ,ही आपल्याला जगण्यासाठी अत्यावश्यक गोष्ट आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. म्हणूनच पाण्याला जीवन म्हटले जाते. पाण्याविना आपण जास्त काळ जगू शकत नाही.
उन्हाळ्याच्या दिवसांत तर पाणी आपल्यासाठी अमृतासारखेच असते. बाहेर कडाक्याचे ऊन असताना शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवायचे असेल तर पाण्याला पर्याय नाही. उन्हाळ्याच्या दिवसांत अंगाची लाहीलाही होत असताना जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक असते.
भर उन्हात थंडगार पाणी प्यायल्यावर मन आणि शरीर शांत आणि तृप्त होते. पण हेच जर उन्हाळ्यात आपल्याला कित्येक तास पाणी मिळाले नाही तर आरोग्याच्या विविध तक्रारी निर्माण होण्याची शक्यता असते.
त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी नुसते पाणी पिणे पुरेसे नसते, तर ते पाणी पिण्याची पद्धत योग्य असायला हवी.
अनेकदा बाहेरुन आल्यावर किंवा घाईगडबडीत आपण उभे राहून पाणी पितो. पण अशाप्रकारे उभे राहून पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले नसते. उभं राहून पाणी प्यायल्याने शरीराच्या नसांवर ताण येतो.
यामुळे अपचन तर होतेच पण शरीरातील पाण्याची पातळी योग्य प्रमाणात राहण्यास यामुळे अडचणी येतात.
उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्याला खूप जास्त तहान लागलेली असते. त्यातच आपल्याला कुठे जायची किंवा कामांची घाई असेल तर आपण खूप गटागटा पाणी पितो.
पण असे करणे योग्य नाही कारण त्यामुळे पोटातील स्नायूंना ताण येतो आणि अपचनाच्या तक्रारी उद्भवतात. त्यापेक्षा शांतपणे बसून दोन दोन घोट पाणी प्यावे.
तुम्हाला तहान लागली आणि तुमची जेवायची वेळ झाली तर अगदी एखादा घोटच पाणी प्या. कारण जेवणाच्या आधी पाणी प्यायल्याने तुमचे पोट भरल्यासारखे होते आणि तुम्हाला जेवण जात नाही.
जेवण न गेल्याने तुमच्या शरीराचे योग्य तसे पोषण होत नाही. त्यामुळे शरीराचे चांगले पोषण व्हायचे असेल तर जेवणाच्या आधी पाणी पिणे टाळलेले बरे.
अनेकदा आपण नुसते पाणी पिण्याऐवजी त्यामध्ये काहीतरी घालून पितो. परंतु हे घटक आपल्या आरोग्यासाठी चांगले नसतात. या स्वीटनर्समध्ये कॅलरीजचे प्रमाण अतिशय कमी असते असे म्हणतात.
पण तरीही त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता असल्याने पाण्यात अशाप्रकारचे स्वीटनर्स घालू नयेत. जेवताना पाणी पिण्याची सवय असेल तर लगेच बंद करा. कारण,
यामुळे छातीत जळजळ आणि अपचन होऊ शकते. वास्तविक, जेवण करताना पाणी प्यायल्याने पोटात अन्न पचवणारे आम्ल पातळ होतात आणि अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. जेवताना तहान लागली असेल तर तुम्ही 1-2 घोट पाणी पिऊ शकता.
अनेकवेळा आपल्याला असे वाटते की, शरीराला फक्त द्रवपदार्थाची गरज असते, मग ते पाणी असो वा थंड पेय, चहा, कॉफी किंवा सोडा. पण असे करणे ही चूक आहे.
कारण कोणत्याही द्रवामध्ये पाण्यासारखे हायड्रेटिंग गुणधर्म नसतात. याउलट चहा, कॉफी, सोडा, कोल्ड्रिंक्स तुमच्या शरीराला डिहायड्रेट करण्याचे आणि शरीरातील पाणी काढून टाकण्याचे काम करतात.
उन्हाळ्यात फ्रीजमध्ये ठेवलेले पाणी किंवा बर्फाचे पाणी प्यायल्याने खूप छान वाटतं. पण या आरामामुळे दीर्घ आजार होऊ शकतात.
कारण, अति थंड पाण्यामुळे शरीरातील व्हॅगस नर्व्हला इजा होऊ शकते, जी शरीरातील सर्वात लांब आणि महत्त्वाची नस आहे.
घाईघाईत नळाचे पाणी पिण्याची चूक करणेही महागात पडू शकते. कारण, या पाण्यात क्लोरीन आणि फ्लोराईडसारखे घातक विषारी घटक असू शकतात.
ज्यामुळे आपण आजारी पडू शकतो. त्याच वेळी, फिल्टर न केलेल्या जमिनीच्या पाण्यात आर्सेनिक असू शकते, ज्यामुळे कर्करोगही होऊ शकतो.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.