नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, भारतातल्या प्रत्येक घरामध्ये सहजपणे आढळणारा आणि अडीनडीला औषध म्हणून आजीच्या बटव्यातून येणारा औषधी गुणांनी युक्त मसाल्यांचा पदार्थ म्हणजेच ओवा अगदी बालपणापासून आपण पाहत आलो आहोत.
जेव्हा घरांमध्ये कोणाचे पोट दुखते किंवा पोटामध्ये गॅस होतो अशा वेळी आपली आई किंवा आजी आपल्याला ओवा खायला येते किंवा ओवा व मीठ भाजून आपल्याला खायला देते आणि काही मिनिटांतच आपली पोटदुखी छूमंतर होते !
ओव्यांमध्ये फायबर, कार्बोहायड्रेट, प्रोटीन देखील अगदी अल्प प्रमाणात आढळते. पोटासंबंधी अनेक आजारांमध्ये ओव्याचा घरगुती उपचार म्हणून उपयोग केला जातो. ओवा चावुन खाल्याने लाळेसोबत मिश्रण होऊन पाचक रस तयार करत होतो,
ज्यामुळे अगदी पचायला जड वाटणारे पदार्थ देखील पचणे सोपे होते. आपल्या प्रत्येकाच्या घरांमध्ये विकेंडला तळणाचा बेत असतो, भजी हा भारतीतांचा सर्वांत आवडता बेसनाचा पदार्थ!
भजी असो किंवा बटाटेवडे, अळू वडी, कोथिंबीर वडी ज्या पदार्थामध्ये बेसनपीठाचा वापर केला जातो, बेसनपीठ पचण्यास खुप जड असते.
तसेच बेसनपीठामुळे भरपूर गॅस-एसिडिटीच्या समस्या वाढतात. भजी,वडे या पदार्थांमध्ये ओव्याचा वापर करावाच लागतो. ओवा वापरल्यामुळे बेसनाचे पदार्थ पचण्यासाठी मदत होते.
अतिप्रमाणात जेवण झाल्यास किंवा सोडायुक्त पदार्थ खाल्यास पोटात गॅस होतात आणि अस्वस्थ वाटायला लागते. अशावेळी गोळ्या घेण्यापेक्षा ओवा तुपात भाजून तो कोमट पाण्यासोबत घ्यावा.
यामुळे पोटदुखीवर त्वरित आराम मिळतो. लहान मुलांचे पोट दुखत असेल तर ‘ओवा अर्क’ बेंबीभोवती गोलाकार चोळून पोट शेकवावे.
ओव्याचे पाणी पोट कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. एका ग्लास पाण्यात एक मोठा चमचा ओवा घालून ते पाणी उकळा. नंतर ते पाणी कोमट करून प्या.
आपण इच्छित असल्यास, ते एकाचवेळी मोठ्या प्रमाणात तयार करू शकता आणि ते एका भांड्यात ठेवू शकता. त्यानंतर,
आपण दिवसभरात कधीही हे पाणी पिऊ शकता असे केल्याने, लवकरच आपल्याला चांगले परिणाम दिसतील. जर, आपण दिवसभर हे पाणी पिऊ शकत नसाल, तर किमान सकाळी रिक्त पोटी आणि जेवणानंतर नक्की प्या.
पित्ताचा त्रास होत असेल तर ओवा खाणे अत्यंत हितकारक आहे. ओवा व सुंठ हे भाजून त्याची पावडर तयार करून ती दुधातून किंवा पाण्यातून घ्यावी.सांधेदुखीचा त्रास होत असल्यास ओवा गरम करून त्याचा शेक घेतल्यास फरक जाणवेल.
वातावरणातील बदलांचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. सर्दी, खोकला किंवा कफ झाल्यास ओव्याची धुरी घ्यावी.
तव्यावर ओवा भाजून कापडाच्या पुरचुंडीत तो बांधून त्याचा छातीवर शेक द्याव्या. यामुळे नक्कीच आराम मिळेल.दात दुखत असल्यास कापसाच्या बोळ्याने ओव्याचे गरम तेल दातांवर लावावे.
तसेच ओव्याच्या कोमट पाण्याने गुळण्या केल्यास फरक पडतो.वारंवार लघवीला होत असल्यास गूळ आणि ओवाचूर्ण समप्रमाणात घेऊन त्याची लहानशा गोळ्या कराव्यात.
या गोळ्या दोन वेळा खाव्यात.पोट दुखणे, शौचास न होणे किंवा पोट फुगणे या तक्रारींमध्ये चिमुटभर ओवा आणि थोडसं सैंधव मीठ आणि सुंठ एकत्र करुन खावे.
एका ग्लास कोमट पाण्यात एक चमचा जिरे पावडर मिसळा आणि रिकाम्या पोटी प्या. जिरे केवळ अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मांनीच भरलेले नसून ते अँटीऑक्सिडंट्सचा एक उत्कृष्ट स्त्रोत देखील आहे.
दीर्घ काळापासून लठ्ठपणामुळे होणारी जळजळ हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांशी जोडली गेली आहे आणि यामुळे स्वयंप्रतिकारक परिस्थिती देखील उद्भवू शकते. जिरे पाणी पाचन फायद्यासाठी देखील ओळखले जाते.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.