नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, भारतीय संस्कृती, परंपरा यांमध्ये अनेक गोष्टींना महत्त्व आहे. आपली वास्तू ही आपल्यासाठी सबकुछ असते. आपण ज्या घरात राहतो, ते नीटनेटके ठेवण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो. कोणत्याही घरातील महत्त्वाची जागा म्हणजे स्वयंपाकघर वा आधुनिक भाषेतील किचन.
दररोज पोटाची खळगी भरण्यापासून ते भांड्याला भांड लागण्यापर्यंत अनेक गोष्टी स्वयंपाकघरात केल्या जातात. घरातील महिला ज्या ठिकाणी सर्वाधिक वेळ घालवतात ते स्वयंपाकघर. जीभेचे चोचले पुरवण्यासाठी स्वयंपाकघरात वेगवेगळे प्रयोग केले जातात.
मात्र, ज्योतिष आणि वास्तुशास्त्रातही स्वयंपाकघराला महत्त्वाचे मानले गेले आहे.वास्तुशास्त्रातही स्वयंपाकघराला महत्त्वाचे मानले गेले आहे. अनेक गोष्टी आपण जुनाट म्हणून त्याकडे लक्ष देत नाही. मात्र, पूर्वजांनी योग्य तर्क, शास्त्र आणि नेमक्या आधारावर त्या सांगितलेल्या असतात.
त्यामागे निश्चित काहीतरी कारण असते. स्वयंपाकघरात वास्तुशास्त्राप्रमाणे योग्य बदल केल्यास वास्तुदोष दूर होऊन आपणास धनलाभाचे योग प्राप्त होऊ शकतात. घरात सुख, शांतता, उत्तम आरोग्य प्राप्त होऊ शकते, असे सांगितले जाते.
स्वयंपाकघरात आपण करत असलेल्या काही चुकांमुळे वास्तुदोष वाढू शकतो, असे मानले जाते. स्वयंपाकघर हे लक्ष्मीचे स्थान मानले जाते. स्वयंपाकघरातील अनेक गोष्टींचे योग्य पालन केल्यास, योग्य स्वच्छता, टापटीपपणा, नीटनेटकेपणा कायम राखल्यास लक्ष्मी मातेची कृपा होऊ शकते, असे सांगितले जाते.
अनेक घरातील देवघर स्वयंपाक घरात असते. त्यामुळे आणखीन सावध राहणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात कधीही चप्पल-बूट घालून जाऊ नये.
असे केल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते. याशिवाय कात्री, सुरी यांसारख्या धारदार वस्तू भींतीवर अडकवू नये. असे केल्यास प्रगती मार्ग खुंटतात, अशी मान्यता असल्याचे वास्तुशास्त्र सांगतात.
वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात बसून भोजन केल्यास अनेक प्रकारच्या ग्रह-दोषांपासून मुक्तता मिळते, अशी मान्यता आहे. मात्र, स्वयंपाकघरात भोजन करताना योग्य दिशांचे विशेष भान ठेवले पाहिजे, असे सांगितले जाते.
स्वयंपाकघरात बसून जेवताना पश्चिम आणि दक्षिण दिशेकडे तोंड करू नये. तसेच स्वयंपाकघराच्या केंद्रभागी बसून जेऊ नये, असे सांगितले जाते. असे केल्यास त्याचे अनुकूल परिणाम पाहायला मिळतात, अशी मान्यता आहे.
याशिवाय आपल्या स्वयंपाकघरातील शेगडी, गॅस बाहेरील व्यक्तीला दिसू नये, अशा पद्धतीने ठेवावी, असे वास्तुशास्त्र सांगते.किचन आणि शौचालयांची भिंत एक नसावी. तसेच दुमजली घरांमध्ये किचनच्या वर शौचालय नसावे.
तसेच घरात मुख्य प्रवेशद्वारासमोर किचनची खोली नसावी, असेही सांगितले जाते. वास्तुशास्त्राप्रमाणे किचनची खिडकी ही उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेल असायला हवी. स्वयंपाक घरातील खिडकी बहुतांश वेळ उघडीच असावी.
यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. घरातील सदस्यांमधील आपलेपणा वाढतो. तुमच्या घरात जो तवा आहे जर तो इथे असेल तर तुमच्या घरावर गरिबी येईल आणि म्हणूनच मित्रांनो असे होऊ देऊ नका.
तवा या दिशेला ठेवा तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. जर तुम्ही इथे तवा ठेवला तर तुमचे संपूर्ण घर तर बरबाद होऊ शकते. मित्रांनो तवा ही आपल्या स्वयंपाक घरातील सर्वात महत्त्वाची वस्तू आहे.
तवा नसेल तर चपाती, भाकरी, पोळी बनू शकत नाही. आपण तव्याबद्दल काहीतरी शास्त्र नक्कीच ऐकलं असेल. वास्तुशास्त्रानुसार तव्याचे काय महत्त्व आहे हे देखील आज आपण पाहणार आहोत.
तुमच्या तुमच्यापैकी अनेक लोकांना हे माहिती नसेल की स्वयंपाक घरातील तवा आणि कढई हे राहू केतू ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात. जे तुमचे नशीब बिघडवू शकते आणि म्हणूनच मित्रांनो यामुळे असा हा तवा आपण चुकूनही घरात या दिशेला ठेवू नये.
तव्याला उलटा ठेवणे हिंदू धर्मशास्त्रामध्ये अपशकुनी मानले जाते. अशुभ मानलं जातं. तवा उलटा ठेवणे हे चुकीच आहे. तवा कधीही उलटा ठेवायचा नाही. एखादा व्यक्ती मृत्यू झालेला असतो तेव्हा तवा उलटा ठेवलेला असत.
विनाकारण तवा उलटा ठेवणे हे अशुभ मानल जात म्हणून चुकूनही तवा उलटा ठेवू नये. खूप दिवसापर्यंत एकच तवा आपण वापरू नये. कारण जुन्या तव्याला गंज चढलेला असतो त्याचे अवशेष जेवणामध्ये मिसळल्याने जेवण दूषित होते.
त्यामुळे घरातील व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात. फुटलेल्या तव्या मध्ये कधीही जेवण बनवू नये या कारणामुळे रोग लागतात. या कारणामुळे कधीच श्रीमंत होऊ शकत नाही. अशामुळे आपल्या घरात दरिद्रता येऊ शकते.
तवा किंवा कढई यांना कधीही उष्ट करू नये म्हणजे त्याच्यावर खरकटी भांडी ठेवू नयेत. दोन गोष्टींची पवित्रता ठेवून हे आवश्यक आहे. तवा किंवा कढई आपण जास्तीत जास्त स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्वयंपाक घरातील स्वच्छतेकडे आपण लक्ष ठेवले पाहिजे.
या दोन वस्तूंच्या स्वच्छतेकडे आपण लक्ष ठेवले पाहिजे. तवा आणि कढई या दोन वस्तू आपण जितक्या स्वच्छ ठेवून तेवढे आपल्या घरामध्ये धनसंपत्ती पैसाअडका जास्त प्रमाणात येऊ लागेल. आपल्या घरामध्ये देवांची भगवंताची स्वामींचे वास्तव्य, माता अन्नपूर्णेचे वास्तव्य कायम स्वरूपी राहिल.
जी व्यक्ती पहिली चपाती गाईसाठी बनवते आणि गाईला स्वतःच्या हाताने खाऊ घालते त्यांच्या घरी माता लक्ष्मी अन्नपूर्णा सदैव वास्तव्यास रहाते. कारण गाई मध्ये सर्व देवी-देवतांचे वास्तव्य असत. आणि या जी व्यक्ती ही मनापासून करते त्या व्यक्तीची पापातून मुक्ती होते.
तसेच संपूर्ण कुटुंबाला त्याचं पुण्य मिळत असतं.तसेच कधीही गरम तव्यावर पाणी टाकू नये यामुळे घरामध्ये भांडण, वाद-विवाद, आजारपण येत राहतात. म्हणून तवा थंड झाल्यावरच पाणी टाकावं. तवा आणि कढई या दोन वस्तुंची स्वच्छता नेहमी ठेवली पाहिजे.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.