ही एक वस्तु घरात ठेवल्याने येते गरीबी, ती वस्तू लगेच काढा घराबाहेर…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, वास्तुशास्त्राच्या नियमानुसार काही वस्तू घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा तयार होते. त्या गोष्टी अधिक दिवस घरात राहिल्याने तुम्ही गरीब होण्याची शक्यता अधिक असते.

राहत्या घरी, बेडरूम किंवा घराच्या प्रवेशद्वाराजवळ काटेरी वनस्पती लावली तर तुमच्या वैवाहिक सुखात बाधा येते.तसेच ते झाड आर्थिक समस्या निर्माण करू शकतात. त्यामुळे तुम्ही अशा झाडांना शेतात किंवा घराबाहेर लावू शकता.

जर तुमच्या कोणत्याही कप किंवा प्लेटमध्ये क्रॅक असेल तर त्याचा वापर करू नका. असे करणे अशुभ मानले जाते. तुटलेल्या ताटात अन्न खाल्ल्याने जीवनात संकटे आणि अपयश येऊ शकतात. अशा भांड्यांमध्ये स्वयंपाक केल्याने तुमच्या आरोग्यावर आणि आर्थिक स्थितीवरही परिणाम होतो.

बेडरूमच्या मध्यभागी टिव्ही ठेवू नये. हे देखील परस्पर संघर्षाचे कारण बनू शकते. पण जर तुम्हाला या खोलीत टीव्ही ठेवायचा असेल तर तुम्ही तो दक्षिण-पूर्व कोपर्यात ठेवू शकता.

वास्तुशास्त्रानुसार घरात बंद घड्याळ ठेवणे अशुभ मानले जाते. थांबलेले घड्याळ हे दर्शवते की तुम्ही आयुष्यात अडकले आहात आणि पुढे जात नाही आहात. यामुळे तुमचे नातेसंबंध, करिअर किंवा आर्थिक प्रगती होऊ शकते.

वास्तुशास्त्रानुसार सुकलेली झाडे घरात ठेवू नयेत. ते नकारात्मकता पसरवतात. तुमची सर्व घरातील रोपे चांगल्या स्थितीत असल्याची खात्री करा. हिरवीगार झाडे सकारात्मकतेचा संचार करतात. तुमच्या घरातील रोपांची काळजी घ्या.

त्यांना आवश्यकतेनुसार पाणी द्या. तुटके फुटके भांडी, काच, आरसा, इलेक्ट्रिक सामान, फोटो, फर्निचर, पलंग, घडी, दिवा, कुंचा, कप व इतर असे कोणतेही सामान घरात ठेवणे उचित नाही.

याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि व्यक्तीला मानसिक त्रास झेलावा लागतो. या वस्तूंमुळे वास्तू दोष उत्पन्न होत असून अश्या ठिकाणी लक्ष्मी वास करत नाही.

महाभारताच्या युद्धातील चित्र, नटराजची मूर्ती, ताजमहालाचे चित्र, बुडत असलेली नाव किंवा जहाज, फवारे, जंगली जनावरांचे चित्र, काटेदार झाडांचे चित्र घरात लावू नये. याने मनावर वाईट परिणाम होते आणि सतत या फोटोंना पाहिल्यामुळे नकारात्मक भाव विकसित होतात.

ज्याने जीवनात चांगल्या गोष्टी घडणे बंद होऊन जातं. असे म्हणतात की महाभारताच्या चित्रामुळे घरात क्लेश वाढतो. नटराजची मूर्ती ठेवणे विनाशाचा प्रतीक आहे.

ताजमहाल एक कबर आहे त्यामुळे याने मानसिकता नकारात्मक होते. बुडत असलेल्या जहाजाचे चित्र आपले सौभाग्य बुडवून देतं. याने संबंध बिगडतात.

फवारेजात चित्र लावल्याने घरात येणारा पैसा वाहत्या पाण्यासारखा वाहून जातो. तसेच जंगली जनावरांचे चित्र लावल्याने घरातील लोकांचे स्वभावही तसेच होऊ लागतात. आणि काटेदार झाडं आपल्या जीवनात काटे पेरतात.

म्हणूनच फोटो किंवा पेंटिंग लावताना वास्तूकडे लक्ष द्यायला हवे. वाळलेले झाडं, उजाडलेले गाव, पसरलेले घर व इतर चित्र कलात्मक वाटतं असले तरी त्याने नकारात्मकता पसरते.

फाटक्या चादरी आणि कपड्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्मित होते. असे वस्त्र दान केले पाहिजे किंवा त्यांचा तात्काळ इतर कामांमध्ये वापर केला पाहिजे.

कधीही फाटलेला पर्स वापरू नये. पर्स किंवा तिजोरीत पवित्र वस्तू ठेवाव्या. पर्समध्ये किल्ली किंवा कोणत्याही प्रकाराची अपवित्र वस्तू ठेवू नये.

पर्स आणि तिजोरीत देवाचे चित्र ठेवू शकतात. पूजेची सुपारी, श्रीयंत्र, कुबेर यंत्र इतर वस्तूदेखील ठेवू शकतात.लोकं घरात अटाळा किंवा भंगार जमा करून ठेवतात.

यासाठी वेगळी भंगार खोली असायला हवी. जुने- तुटके फुटके जोडे चपला आपल्या पुढे वाढण्यापासून थांबवतात. यांना आ‍धी घरातून बाहेर काढा.

देवी देवतांचे खंडित फोटो किंवा मूर्ती ठेवल्याने आर्थिक कष्ट होतात. म्हणून,: त्यांना पवित्र नदीत वाहून दिले पाहिजे. तसेच देवी देवतांचे फोटो घर सजवण्यासाठी कामास घेऊ नये.

त्याची संख्या आणि स्थान निश्चित हवं. अनेक लोकं आपल्या घरात डेकोरेटिव दगड, नग, अंगड्या किंवा ताबीज अश्या वस्तू कुठेही ठेवतात.

पण या वस्तूमुळे फायदा होतं आहे की नुकसान हे माहीत नसलं तर अश्या वस्तू आधी घरातून बाहेर काढायला हव्या. सध्या प्लास्टिकच्या वस्तूंचा क्रेझ वाढला आहे.

किचनमधील डबे, पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या पूर्ण घरात जागोजागी प्लास्टिकच्या वस्तूंचा ढिगारा दिसतो.

पण याने नकारात्मकता तर पसरतेच पण हे आरोग्यासाठीही हानिकारक आहे. या वस्तू वापरण्याने त्यातील विषारी तत्त्व शरीरात पोहचतात आणि कँसर सारख्या भयावह रोगाला कारणीभूत ठरतात.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!