नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक लीला केवळ अद्भूत आणि अचंबित करणाऱ्या असल्यामुळे,श्री स्वामीं महाराजांचा भक्त परिवार अत्यंत मोठा आहे.
हे भक्त महाराष्ट्रात बरोबरच, देशभरातील अनेक असंख्य ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचे मठ असल्याचे दिसून येते. यातून महाराजांचे चरित्र, त्यांचे संदेश, त्यांची शिकवण, त्यांच्या लीला यांचे श्रवण, कीर्तन, वाचन केले जात असते.
श्री स्वामी भक्तांना नियमित मठात जाता आले नाही, तरी ते घरी राहून स्वामींचे नामस्मरण, उपासना करत असतात.श्री स्वामी समर्थ पाठीशी असल्याचे अनुभव आल्याचे अनेक स्वामी भक्त सांगत असतात.
श्री स्वामी समर्थांच्या लीला असतील, त्यांची कृती असेल, त्यांची वचने असतील, ही कायम समाजाला बोधप्रत ठरत असतात. त्यातून काही ना काही शिकवण संदेश समाजाला मिळत असते.
त्यामुळे फक्त श्री स्वामी महारांजाच्या नामस्मरण आपल्यामध्ये हळूहळू प्रचंड बदल होत असतात. त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे, माणूस समाधानी राहण्यास मदत होते. कारण आपल्या समाजात श्रीमंत किंवा धनवान अनेक लोक असतात,
मात्र यातील समाधानी आणि खऱ्या अर्थाने सुखी असे खूप कमी लोक असतात.
मग अशावेळी आपल्याला नक्की काय हवे आहे, हेच कळत नाही.आपल्यापैकी निम्म्याहून जास्त लोकांचे सुख हे एखादी नोकरी किंवा एखादी वस्तू किंवा धन संपत्ती यांच्यामध्ये असते.
पण यातून दोन गोष्टी होती,पाहिली म्हणजे, ती गोष्ट आपणास प्राप्त होईल किंवा दुसरी गोष्ट प्राप्त होणार नाही. जर ती प्राप्त नाही झाली ,तर त्यातून येणारं दुःख पुढे येणारे सर्व दुःखांचे कारण बनण्याची शक्यता असते आणि जर ती वस्तू प्राप्त झाली, तर काही काळ उपभोग घेतला की तिचा कंटाळा येवू लागतो.
मग आपले मन परत नवीन सुख शोधण्याच्या मागे लागेल आणि परत हे चक्र फिरत राहील.याचा अर्थ असा होत नाही की, स्वप्न बघू नये किंवा कोणतीही गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करू नये, मेहनत करू नये.
तर यामागील सांगण्याचे कारण म्हणजे,हे सर्व करीत असताना आपल्याला समाधानी बनले पाहिजे.कारण साधारणपणे माणसाचे आयुष्य हे 65 ते 70 वर्ष असते. त्यामध्ये 8 तास झोप ,म्हणजे दिवसाची म्हणजे 30 टक्के जीवन हे नित्रेत जाते.
तसेच याशिवाय 8 तास नोकरी किंवा व्यवसाय म्हणजे परत 30 टक्के जीवन हे यामध्ये जात असते आणि राहिलेले 40% यात आपण आपले खाणे-पिणे,टीव्ही किंवा प्रवास यामध्ये व्यथित करीत असतो.
मग या सर्व गोष्टीसाठी आपला जन्म झाला आहे का?,असा प्रश्न आपल्यापैकी अनेक लोकांना पडत असतो.कारण खरंच जगणं दिवसेंदिवस आपण अवघड होतं चालतोय,
त्यामुळे आपण आपला आनंद बाहेरच्या क्षणिक सुखानमध्ये न ठेवता, तो आंतरिक असायला हवा. मग त्यासाठी महत्त्वाचे आणि सोपा उपाय म्हणजे स्वामी महाराजांचे नामस्मरण होय.
त्यामुळे आपल्याला नियमितपणे स्वामींची सेवा केली पाहिजे, त्याना प्रसन्न केले पाहिजे.
तसेच याशिवाय त्यांच्या प्रत्येक मंत्राचा जप केला पाहिजे, यामुळे आपल्याला सुखाची प्राप्ती होण्यास मदत होईल आणि आपल्या सर्व प्रकारच्या इच्छा ,आकांक्षा पूर्ण होण्यास सुरुवात होतील.
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थश्री स्वामी समर्थश्री स्वामी समर्थश्री स्वामी समर्थअस मंत्रजप 108 वेळेस म्हणा आणि रोज बोलत जा मग बघा स्वामी आपल्या पाठीशी नेहमी राहतात.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.