ज्या स्त्रीच्या देवघरात ही 1 वस्तू असते तिथे गरीबी कधीच राहत नाही…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, प्रत्येकाचे आपल्या घरावर नितांत प्रेम असते. सर्वसामान्य कुटुंबामध्ये गृहसजावटीची स्वप्ने रंगवताना देवघर कसे असावे, कुठे असावे, याचेही नियोजन काटेकोरपणे करत असतो. देवघर ही अतिशय महत्त्वाची आणि विश्वासाची जागा मानली जाते.

देवघराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे देवघराकडे बघितल्यावर शांत आणि प्रसन्न वाटायला हवे. घराबरोबरच देवघराचेही महत्त्व तेवढेच असते.

घराला घरपण येण्यासाठी पूजापाठ, भजन, भोजन या सर्व गोष्टींचा अंतर्भाव असतोच; परंतु देवघर आणि देव्हारा कसा आणि कोणत्या दिशेला असावा.

याचे शास्त्रोक्त मार्गदर्शनही अनेकजण घेत असतात. पूजाघर म्हणजे घरातील सर्वात महत्त्वाची जागा. घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा. घर लहान असो की मोठे, घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात.

भरपूर स्वामी भक्तांना स्वामीसेवा करताना नेहमी एक प्रश्न पडत असतो, ते प्रश्न विचारत असतात की आपल्या घरातल्या देवघरात कोणकोणत्या देवीच्या मुर्त्या ठेवायला हव्यात ? आपल्या घरात कधीही जास्तीत जास्त देवीच्या मुर्त्या कधीच ठेवू नये.

कमीत कमी देवीच्या आपण आपल्या देवघरात ठेवण्याचा प्रयत्न करावा ; कारण आपली सवय असते, आपण कुठेतरी देव दर्शनाला जातो, तर आपण सगळीकडे जाऊन प्रत्येक ठिकाणाहून एक एक मूर्ती घेऊन येतो आणि ती मूर्ती आपण देवघरात आणून ठेवतो व रोज पूजा करतो.

त्याने फक्त दुसऱ्या देवांसाठी देवघरात जागा कमी पडत असते किंवा तिथे सगळा गोंधळ होतो. म्हणून आपल्या देवघरात देवाच्या कमीत कमी मूर्ती ठेवाव्यात.

या तीन देवी आपल्या देवघरात असायलाच हवेत…. अशा फक्त तीन देवी आहेत त्याच्या मुर्त्या आपल्या देवघरामध्ये ठेवायलाच पाहिजेत आणि या मातेच्या मूर्ती असायलाच पाहिजेत.

पहिली देवी आहे ती म्हणजे लक्ष्मी माता … लक्ष्मीची मूर्ती, कारण ती घराची, पैशाची , सुख समृद्धीची देवी आहे.

आणि तिची पूजा तर आपल्या घरात आपण करायलाच पाहिजे, तरच आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी आणि संपदा येऊ शकते. आपल्या घरात लक्ष्मी मातेची मूर्ती असायलाच पाहिजे.

त्यानंतर दुसरी देवीची मूर्ती आहे, अन्नपूर्णा, अन्नपूर्णा ही धनधान्याची देवी आहे, आपल्या घरामध्ये आपण जेवण करतो म्हणून त्याचा साठा करतो, त्यामध्ये कमी पडायला नको,

आपल्याला दोन वेळचे व्यवस्थित सुखात जेवण मिळायला पाहिजे, म्हणून अन्नपूर्णा मातेची पूजा आपल्या देवघरात व्हायलाच पाहिजे . अन्नपूर्णेची मूर्ती आपल्या देवघरात असायलाच पाहिजे.

त्यानंतर आहे आपली कुलदेवी, आपल्या कुलदेवतेची मूर्ती सुद्धा आपल्या देवघरात असायलाच पाहिजे, कारण तीच फक्त आपल्या कुळाची देवी आपल्या परिवाराची देवी असते.

आपले सुख दुख हे फक्त तीच जाणू शकते, तीच आपले दुःख समस्या दूर करू शकते, म्हणून कुळाची देवी कुलदेवीची पूजा सुद्धा व्हायलाच हवी.

धनाची देवी लक्ष्मी म्हणून लक्ष्मी माता ,अन्नपूर्णा माता आणि आपली कुलदेवी या तीन मुर्त्या तुमच्या देवघरात असायलाच पाहिजेत आणि तीन देवीच्या मुर्त्या सोडून तुम्हाला ज्या देवीवरती विश्वास असेल किंवा तुमची श्रद्धा असेल.

तुम्ही त्यांना देवघरात बसवू शकता. या तीन मूर्ती तुमच्या देवघरामध्ये पाहिजेत आणि या व्यतिरिक्त तुम्ही कोणत्याही देवीच्या मुर्त्या नाही सुद्धा ठेवले तरी चालेल.
शुभम भवतु!

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!